Google AI: ‘रोजच्या कामात एआयचा वापर करा, अन्यथा…’, गुगलचा कर्मचाऱ्यांना सल्ला

AI In Google: काही महिन्यांपूर्वी सुंदर पिचई यांनीही एआयच्या वापराचे महत्व अधोरेखित केले होते.
Google employees AI usage | Google AI work guidelines
Google
Published on
Updated on

डिजिटल युगात कृत्रिम बृद्धीमत्ता (एआयची) या तंत्रज्ञानाची क्रांती झाली असून, सर्वच क्षेत्रात त्याचा वापर वाढला आहे. गुगलने देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांना रोजच्या कामात एआयचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. एआयचा वापर न केल्यास कर्मचारी इतर स्पर्धकांच्या तुलनेत मागे पडतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

बिझिनेस इन्साईंडरने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, कार्यक्षमता वाढविण्यासाठी गुगलने कर्मचाऱ्यांना नियमित कामात एआयचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. गुगलच्या या सूचनेमुळे कंपनीतीला काही कर्मचारी आनंदीत झाले आहेत तर, काहींनी मात्र चिंता व्यक्त केली आहे. असे असले तरी कर्मचाऱ्यांना एआयचा वापर बंधनकारक असेल, असे कंपनीच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

Google employees AI usage | Google AI work guidelines
Viral Video: 'हा मूर्खपणा नाही तर काय?', पठ्ठ्यांच्या धोकादायक स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्सकडून टीकेचा भडिमार

सिलिकॉन व्हॅलीत देखील एआयच्या वापरासाठी कर्मचाऱ्यांवर असलेल्या दबावाची चर्चा आता केली जात आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी सुंदर पिचई यांनीही एआयच्या वापराचे महत्व अधोरेकीत केले होते.

गुगलमध्ये कर्मचाऱ्यांनी एआयचा वापर वाढवला नाही तर इतरांच्या तुलनेत ते मागे पडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती. जगातील इतर कंपन्यांशी आपण स्पर्धा करत आहोत, याची आठवण देखील त्यांनी करून दिली.

Google employees AI usage | Google AI work guidelines
Online Gaming Bill 2025: Dream11 ते MPL… देशात 'पेड गेम्स'वर बंदी, पण ज्या यूझर्सचे पैसे जमा आहेत त्यांचं काय होणार?

यापूर्वी मायक्रोसॉफ्टने देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांना एआय वापरासाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात केलीय. एआय आता ऑप्शन नसल्याचे त्यांनी नमूद केले होते. अमेझॉनने देखील एआय अधिक काम करत असल्याने कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी होईल, असे स्पष्ट केले आहे. शॉफीफायने देखील कर्मचाऱ्यांना एआय वापर करण्याची सूचना केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com