History Of Swings Ai Image Generator
गोंयकाराचें मत

History Of Swings: वेलींपासून झोक्यापर्यंतचा प्रवास... जाणून घ्या झोक्याच्या प्राचीन परंपरेचा रंजक इतिहास

Traditional Indian Swing: आदिम काळात मानवाने, जंगलात वावरताना आपल्या परिसरात महाकाय वृक्षावर लोंबकळणाऱ्या वेलींचा अथवा वटवृक्षाच्या पारंब्यांना घट्ट पकडून झुलण्याचा आनंद घेत असताना, त्याने झुल्याची निर्मिती केली असावी.

गोमंतक ऑनलाईन टीम

राजेंद्र पां. केरकर

आदिम काळात मानवाने, जंगलात वावरताना आपल्या परिसरात महाकाय वृक्षावर लोंबकळणाऱ्या वेलींचा अथवा वटवृक्षाच्या पारंब्यांना घट्ट पकडून झुलण्याचा आनंद घेत असताना, त्याने झुल्याची निर्मिती केली असावी. खरंतर झुला हे रंजनासाठी साधन मानले जात असले तरी कधी काळी त्याचा वापर आपणाला भेडसावणाऱ्या ताणतणावांतून मुक्त होण्यासाठी माणसाने केला असावा. माता आपल्या बाल्याविषयी वात्सल्य, प्रेयसी आपल्या अंतरीचे प्रेम अभिव्यक्त करण्यासाठी, त्याचप्रमाणे आराध्याविषयीचा भक्तिभाव व्यक्त करण्यासाठी झुल्याचा वापर केला जात असावा.

झुल्याचा वापर जगातल्या जुन्या संस्कृतीत होत असे. ग्रीक परंपरेत झुल्याचा संबंध लोकविश्वासाशी जोडलेला होता. ग्रीक वैद्यक शास्त्राचा जनक हिपोक्रेट्स आणि तत्वचिंतक प्लेटो यांनी आंतरिक ताणतणाव व भयातून मुक्त करण्यात झुला उपयुक्त ठरत असल्याचे म्हटले आहे. इसवी सनाच्या पाचव्या शतकातल्या अजंठा लेण्यांतील गुंफा क्रमांक दोनमध्ये बौद्ध परंपरेतील जातक कथातील नाग राजकन्या इरांदती झुल्यावर बसल्याचे नैसर्गिक रंगातल्या चित्रातून दाखवलेले आहे.

इजिप्त, चीनच्या जुन्या काळात झुल्यांचा वापर होत असल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. ओडिशाच्या धर्म आणि संस्कृतीत झुल्याला विशेष लाभलेले आहे. तेराव्या शतकातील कलिंग नरेश नरसिंघ देव प्रथम याचे झुल्यावर बसलेले चित्र ओडिशात आढळलेले आहे. ओडिशात मॉन्सूनात येणाऱ्या मिथुन संक्रांतीला धरित्री माता रजःस्वला असल्याचे मानून, तीन दिवसांचा जो उत्सव साजरा केला जातो, त्यात युवती आणि स्त्रिया झाडांच्या फांद्यांना झोपाळे बांधून, त्यावर झोके घेतात. होळीत उडिया भाविक आपले आराध्य जगन्नाथ, सुभद्रा व बलराम यांना झुल्यावर बसवून दोला उत्सवात झोके देतात.

गोव्यात झुल्याचा वापर शेकडो वर्षांपासून होत असून, जुन्या ऐतिहासिक वास्तूत शिसम लाकडाच्या फळ्या आणि तुळईला लोंबकळणाऱ्या लोखंडी साखळ्यांचा वापर करून झोपाळे लावण्याची परंपरा होती.अशा झोपाळ्यावर निवांतपणे बसून घरातला प्रमुख वा अन्य वेळी घरातली मंडळी उत्साहाने झोके घ्यायची. असे झोपाळे जुन्या वास्तुचे वैभव असायचे सर्वसामान्य कुटुंबात रानातल्या बेतांचा उपयोग करून, तयार केलेल्या झोपाळ्यावरती घरातले आबालवृद्ध, तरुण झोके घ्यायचे. दोरखंडावरती आयताकृती लाकडाचे तुकडे ठेवून वा केवळ दोऱ्यांचा एखाद्या आंब्याच्या फांदीवर झोपळा टांगून, मस्त झोके घ्यायचे.

गोव्यातल्या काणकोण श्रीस्थळ येथील मल्लिकार्जुन मंदिरात सोमवारी किंवा पर्वदिनी भक्तिरसपूर्ण झुलागीते गाण्याची परंपरा होती. शतकोत्तर परंपरा असलेल्या या लोकगीतांतून गोण्यातील मराठी भाषा आणि संस्कृतीची प्रचिती येते. पूर्वीच्या काळी श्रावणात जेव्हा सूर्याचे कोवळे ऊन ढगातून खाली यायचे, तेव्हा गावातल्या कुमारिका झाडाच्या फांदीला टांगलेल्या झोपाळ्यावर बसून, गाऊ लागायच्या -

आट्यावयले, आट्यावयले भागलशी कोणाची तिया वाट बदलशी गे बघतूय, बघतूय माज्या मामाची..... अशा झुला गीतांतून कुमारिका आपल्या मामाची प्रतिक्षा करणारे गीत गायच्या. मामाविषयाचा जिव्हाळा, प्रेम व्यक्त करणारी ही झुलागीते कुमारिकांच्या अंतरीची सामाजिक, कौटुंबिक भावस्पंदने अभिव्यक्त करायची.

ह्या आट्यापोंदसून, त्या आट्यापोंदसून कोळशे लोटयाले, कोळशे लोटयाले

खंयच्यान मामा येयशी

केगदी पोंदसून, केगदी पोंदसून ....

केगदीच्या केगदा हाडून

तुऱ्याक मरे लायशी ...

अशी झुलागीते मामाविषयी भाचीच्या अंतकरणात असलेली प्रेम आणि आदराची भावना व्यक्त करतात. गोव्यातील ही पारंपारिक झुलागीते नात्यागोत्यांचे आणि एकमेकांत असणाऱ्या जिव्हाळ्याच्या अनुबंधांचा आविष्कार घडवायची आणि बालिका, कुमारिका मोठ्या आवडीने त्यांचे झोपाळ्यावर बसून झोके घेत गायन करायच्या, मुलाला झोपण्यासाठी आई पाळण्यात घालून, झोके द्यायची, तेव्हा ती सुरेल आवाजात गाऊ लागायची.

मुलाला झोपण्यासाठी आई पाळण्यात घालून, झोके द्यायची, तेव्हा ती सुरेल आवाजात गाऊ लागायची. पयल्या मयन्या पयला मासोळा

गर्भ नारीचा रंग पिवळा, जो बाळा जो रे . . . . दुसऱ्या मयन्या पदर बांधा

हिरव्या चोळीवर काडीला चांदा, जो बाळा जो रे .... श्रावणातली वद्य अष्टमी म्हणजे बाळकृष्णाचा जन्मोत्सव आणि तो साजरा करताना, बाळकृष्णाच्या मूर्तीला पाळण्यात घालून, महिला गाऊ लागायच्या -

नमिली शारदा यजाची माता

कृष्णाचा पाळणा गाई मी आता

कृष्णाचा पाळणा ज्यो नारी गाती

गातीया ऐकतीची पापा फिटती

वडाच्या लोंबकळणाऱ्या पारंब्या तसेच वृक्षावरून खाली झेपावणाऱ्या वेली पाहून, आदिम काळापासून माणूस झोके घ्यायचा आणि असे झोके घेण्याच्या प्रवृत्तीतून लोकमानसाने झोपाळ्याची संकल्पना निर्माण केली आणि अशा झोपाळ्यावर बसून झोके घेताना, त्याने झुला गीतांची निर्मिती केली. अशा झुलागीतांच्या समृद्ध परंपरेतून कष्टकरी समाजाचे भावविश्व प्रतिबिंबित होत असलेले पहायला मिळत असते. सत्तरी तालुक्यात प्रचलित असलेली अशी साध्या, सोप्या आणि भावमधुर शब्दांनी रचलेली झुला गीते आट्यावयली गीते म्हणून नावारूपाला आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT