Goa vs Rajasthan culture tourism Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Vs Rajasthan Tourism: पधारो म्हारो देस! संस्कृती दाखवणारे राजस्थानचे पर्यटन; गोव्याने ही कला शिकण्यासारखी..

Rajasthan tourism culture: गोवा हे देशात पर्यटनासाठी सर्वाधिक प्रसिद्ध असलेले राज्य आहे. गोव्याला निसर्गाने भरभरून दिले आहे त्यामुळे येथे बारामाही पर्यटन होते.

गोमन्तक डिजिटल टीम

गंगाराम आवणे  

दै. गोमन्तकचा प्रतिनिधी म्हणून पत्र सूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या राजस्थान दौऱ्यावर जाण्याची संधी लाभली आणि जोधपूर, जैसलमेर, जयपूर, सम वाळवंट आणि महत्वाचे म्हणजे भारत-पाक सीमावर्ती भाग पाहण्यची संधी मिळाली.

गोवा हे देशात पर्यटनासाठी सर्वाधिक प्रसिद्ध असलेले राज्य आहे. गोव्याला निसर्गाने भरभरून दिले आहे त्यामुळे येथे बारामाही पर्यटन होते परंतु ओसाड वाळवंट, असंतुलित हवामान याचा सामना करत ‘पधारो म्हारो देश’ असे गोड आर्जव करणार्‍या राजस्थानचे स्वागतही मनाला सुखावणारे असते.

पहाटे हुडहुडी भरविणारी थंडी, दुपारी रखरखणारे ऊन असे असूनही येथील संस्कृती, संगीत, गड, किल्ले, खाद्यसंकृती सर्वच भुरळ पाडणारे आहे. इथले पर्यटन प्रामुख्याने केवळ चार महिने- हिवाळ्यात चालते परंतु संस्कृती, वारसा संवर्धन या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याची त्यांची कला वाखाणण्याजोगी आहे, जी गोव्यासारख्या पर्यटन राज्याने स्विकारणे गरजेचे आहे. 

ब्लू सिटीतील मेहरानगड 

 राजस्थानमधील ‘ब्लू सिटी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जोधपूर शहरातील घरांचा रंग निळ्या रंगातील असल्याने त्याला ब्लू सिटी नाव पडले आहे. येथील भव्य असा मेहरानगड सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. येथे ठेवण्यात आलेल्या राजांच्या पालख्या, कपडे, विविध अस्थापने पाहण्याजोगी आहे. आपल्या पतीच्या निधनानंतर सती गेलेल्या महिलांच्या हाताचे ठसे तसेच हा गड बांधण्यासाठी राजाराम मेघवाल यांनी आपल्या जीवाची आहूती दिल्यानंतर उभारण्यात आलेली समाधी आणि गडावर निळ्या रंगाने नटलेली घरे पाहिल्यानंतर ना गड चढून गेल्याचा थकवा जाणवतो, ना उष्म्याची जाणीव होते. हे विहंगम दृष्य कायमचे मनात साठवून ठेवावे हीच अनुभूती येत राहते.

गोल्डन (सुवर्ण) सिटी जैसलमेर 

राजस्थानमधील जैसलमेर परिसराला सुवर्ण शहर (गोल्डन सिटी) असे संबोधले जाते ते येथील सुवर्णरंगी दगडामुळे. येथील दगडाचा रंग सोन्यासारखा पिवळसर. त्यामुळे या दगडात बांधलेली घरे, मंदिरे, आस्थापने सुर्यप्रकाशात सोन्यासारखी उजळून निघतात. येथील जैसलमेर किल्ल्यात आजही लोकवस्ती आहे. या किल्ल्यामध्ये तेथील ब्राह्मण, राजपूत व इतर समाजाचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. इतिहास आणि वर्तमान सामावलेला जैसलमेर किल्ल्याला एकदा तरी भेट द्यायलाच हवी. 

पिंक सिटी जयपूर 

जयपूर ही राजस्थानची राजधानी त्यामुळे लोकांचा गजबजाट, ऑफीस काळात वाहतूक कोंडी हे सर्वकाही आहे परंतु त्यात देखील जयपूरने आपले जुनेपण अबाधित राखले आहे. येथील गड-किल्ले पाहण्यासाठी आजही पर्यटकांची गर्दी होत असते. येथील घरे ही गुलाबी दगडात बांधण्यात आली असल्याने सर्व शहर गुलाबी रंगात न्हावून निघाल्याचा भास होतो. येथील हवामहल पाहण्यासाठी तर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या परिसरात खरेदीचा आनंद खुपजण घेताना दिसतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Unity Mall: 'युनिटी मॉल स्थानिकांसाठी महत्वपूर्ण'! खंवटेंचे प्रतिपादन; रोजगारांच्या संधी निर्माण होणार असल्याचा केला दावा

GMC: ‘गोमेकॉ’च्या विद्यार्थ्यांची ऐतिहासिक कामगिरी! 4 IMA MSN सन्मान मिळवणारे ठरले पहिले महाविद्यालय

Bicholim Crime: 2 महिला, एका बालिकेची निर्घृण हत्‍या! एक मृत्‍यू संशयास्‍पद; महिलांसोबतच्या वाढत्या घटनांनी डिचोली हादरले

Fishermen Pele: 'चर्चवरील हल्ल्याने मन व्यथित झाले'! मच्छीमार पेलेने व्यक्त केली खंत; दोषींवर कारवाईची केली मागणी

पर्यटकांसाठी महत्वाची अपडेट! गोव्यातून परतीचा प्रवास महागला; तिकीटदर दुपटीपेक्षा जास्त; वाढीव रकमेमुळे कोलमडले बजेट

SCROLL FOR NEXT