Goa Water Crisis Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

कोणी पाणी देता का पाणी?

Goa Water Conservation: गोव्‍यात प्रत्‍येक मंदिराच्‍या पुढे किंवा आसपास तळी आहेत. ही तळी केव्‍हाच सुकत नाहीत. त्‍यात सर्व मोसमात पाणी असतेच.

दैनिक गोमन्तक डिजिटल

सुदेश मळकर्णेकर

गोव्‍यात प्रत्‍येक मंदिराच्‍या पुढे किंवा आसपास तळी आहेत. ही तळी केव्‍हाच सुकत नाहीत. त्‍यात सर्व मोसमात पाणी असतेच. ह्या धर्तीवर गोव्‍यात जिथे पाणी टंचाई आहे, तिथे पाणी साठवण्याची योजना सरकार करू शकते. दर मॉन्‍सूनमध्ये पाऊस इंचाचे शतक गाठतोच. तरीही पावसाने शतक ठोकूनही मार्चनंतर पाण्याविना आम्‍ही सामना हरतो. यास न केलेले नियोजन हेच कारण पाहायला मिळते.

दरवर्षी उन्‍हाळा संपत आला की, मॉन्‍सूनची चर्चा होते. मॉन्‍सून कुठे पोहोचला त्‍याची चाल यावर्षी कशी आहे यावर तर्क बांधले जातात. शेतकरी आपल्‍या पिकाचा विचार करतो. त्‍याचे भवितव्‍य पावसाळ्‍यात होणाऱ्या उलाढालीचा विचार करतो आणि सर्वसामान्‍य माणूस येणाऱ्या खरेदीचा म्‍हणजे छत्र्या, रेनकोट कधी आणायचे याचा विचार करत असतो. थोडक्‍यात काय तर मॉन्‍सून हा प्रत्‍येकाच्‍या आयुष्‍याचा चर्चेचा अनिवार्य भाग बनलेला असतो, आहे.

आपल्‍या अर्थव्‍यवस्‍थेचा कणा मानल्‍या जाणाऱ्या मॉन्‍सूनचा आपण कधीच प्रामाणिकपणे गांभीर्याने विचार केला नाही म्‍हणून आम्‍ही वैज्ञानिकदृष्‍ट्या त्‍याचे ‘प्‍लॅनिंग’ करूच शकलो नाही. माणसाचा आणि पावसाचा संबंध खूप कमी झाला आहे. माणसं पावसापासून दुरावली आहेत. कारण आम्‍ही वेगवेगळ्या माध्‍यमातून पाणी निर्माण करून उपलब्‍ध केले आहे. मग हे धरणाचे असो किंवा कुपनलिकेचे. त्‍यामुळे पडणारा पाऊसच आपल्‍याला वापरायचा आहे, हे बंधन नाही.

पावसाचे पाणी आम्‍ही साठवू किंवा सरकार साठवेल आणि ते आपल्‍या घरात येईल किंवा शेतीला उपयाेगी होईल, याचा विचारच होत नाही. नळाला पाणी येत नसेल तर टँकर मागवू, भले त्‍यासाठी आपल्‍याला जास्‍ती पैसे मोजावे लागले तरी चालतील. गेल्‍या काही वर्षापासून शहरी पावसाकडे एक नैसर्गिक संशोधन म्‍हणून पाहत नाही आहोत. त्‍यामुळे आपण आपली पाणी साठवणं ही भावनाच नाही आणि एकाप्रकारे आम्‍ही सरकारला गृहीत धरलेले आहे.

गोव्‍यात प्रत्‍येक मंदिराच्‍या पुढे किंवा आसपास तळी आहेत. ही तळी केव्‍हाच सुकत नाहीत. त्‍यात सर्व मोसमात पाणी असतेच. ह्या धर्तीवर गोव्‍यात जिथे पाणी टंचाई आहे, तिथे पाणी साठवण्याची योजना सरकार करू शकते. दर मॉन्‍सूनमध्ये पाऊस इंचाचे शतक गाठतोच पण मार्चनंतर पावसाने शतक ठोकूनही पाण्याविना आम्‍ही सामना हरतो. यास न केलेले नियोजन हेच कारण पहायला मिळते. ज्‍या भागात पाऊस फार आहे त्‍या भागात पाण्‍याविषयी पाण्‍याचे योग्य नियोजन नाही. जशी वस्‍ती वाढू लागली तसे पाण्‍याचे नियोजन केले गेलेच नाही.

पावसाला गृहित धरले जात आहे, हे लक्षात ठेवायला हवे, की गोव्‍यात दरवर्षी लाखाे लिटर पावसाचे पाणी वाया जात आहे. दरवर्षी मार्च महिन्‍यात विहिरींचे पाणी आटायला सुरुवात होते. पाणी जिरवण्‍याचे वा अडवण्‍याचे आम्‍ही प्रयत्‍न करतच नाही. काहीसा अनाकलनीय वाटणारा पाऊस आम्‍ही सर्वांनी समजून घेणे आवश्‍‍यक आहे. किंबहुना पावसावर ज्‍याची अर्थव्‍यवस्‍था अवलंबून आहे अशा प्रत्‍येक व्‍यक्‍तींना ती अभ्‍यासता आली नाही, तरी समजून घेता आली पाहिजे.

अगदी सामान्‍य माणसांबद्दल बोलायचे झाले तरी पावसाचे पाणी पर्यायाने त्‍याच्‍या पाण्‍याचे मोल आपल्‍याला कळावयास हवे. आपले सर्वांचेच भवितव्‍य पावसावर अवलंबून आहे. आता पाण्‍यासाठी राज्‍या-राज्‍यांमध्‍ये तंटे चालू आहेत. ज्‍वलंत उदाहरण म्‍हणजे गोवा आणि कर्नाटक. म्‍हादईच्‍या पाण्‍यासाठी भांडतात. आता इंधनासाठी युद्ध होत आहे. पण भविष्‍यात जे युद्ध होणार आहे, ते फक्‍त पाण्‍यासाठीच. दरवर्षी आपल्‍याकडे मॉन्‍सून नियमितपणे येतो.

म्‍हणूनच आपली शेती टिकून आहे. आपल्‍याकडे मॉन्‍सून महत्‍वाचा असतो, म्‍हणून तो थोडा उशीर झाला तरी आपल्‍याला चिंता वाटते. परंतु पावसाचे पाणी अडविणे-जिरवणे गरजेचे आहे, हा भाग आमच्‍या रक्‍तातच मुरलेला नाही. खरं तर नागरिकाने आणि सरकारने गोव्‍यातील लहान तळी, विहिरी यांची नियमितपणे काळजी घेणे आवश्‍‍यक आहे. नाहीतर पुढील पिढीवर ‘कोणी पाणी देता का, पाणी’ असे म्‍हणण्‍याची पाळी नक्‍कीच येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार कधी वाढणार? किती वाढणार? 8व्या वेतन आयोगाबाबत संसदेत सरकारनं दिलं मोठं अपडेट

ST Reservation: 'एसटी' आरक्षणाबाबत सभापतींनी मानले PM नरेंद्र मोदींचे आभार, नवी दिल्ली येथे घेतली भेट; विविध विषयांवर चर्चा

'Reality Hit Me'! 3 कोटींचा व्हिला, 45 हजार रुपये भाड्याचं स्वप्न; पण प्रत्यक्षात मिळतायत फक्त 11 हजार! गोव्यातील प्रॉपर्टीबाबत अभिनेत्री पारुल गुलाटीचा खुलासा

Cyber Fraud: 'सीझेडएमए'चा अधिकारी असल्याचं सांगत 1.49 लाखांची फसवणूक, आसोळणातील व्यक्तीला गंडा; बुधवारी एका दिवसात सायबर ठगांचा 5 जणांवर वार

Assagao: आसगावातील जलप्रदूषण; झऱ्याभोवतालची बांधकामे स्कॅनरखाली, कोर्टाचे यंत्रणांना पाहणीचे निर्देश

SCROLL FOR NEXT