Goa Dam Water Level: प्रमुख धरणांतील जलपातळी घसरली! प्रशासनाची चिंता वाढली; मान्सून लांबल्याने पाणीटंचाईचे सावट

Monsoon delay water scarcity goa: नैऋत्य मोसमी पाऊस लांबल्याने आणि राज्यात उष्णतेची तीव्रता वाढल्याने गोव्यातील प्रमुख पिण्याच्या पाण्याच्या जलाशयांतील पाणीपातळी झपाट्याने घटत आहे.
Goa Dam Water Level
Goa Dam Water LevelDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: नैऋत्य मोसमी पाऊस लांबल्याने आणि राज्यात उष्णतेची तीव्रता वाढल्याने गोव्यातील प्रमुख पिण्याच्या पाण्याच्या जलाशयांतील पाणीपातळी झपाट्याने घटत आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांतही पाऊस न झाल्यास पाणीपुरवठा सुरळीत राखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील बहुतांश प्रमुख धरणांमधील जलसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला असून जलाशयांवर सातत्याने नजर ठेवण्यात येत आहे. वाढते तापमान, घटता जलसाठा आणि लांबलेला मान्सून या तिहेरी संकटामुळे पाणी व्यवस्थापन अधिक कठीण बनले आहे.

संभाव्य पावसाळी परिस्थिती लक्षात घेऊन सत्तरी तालुक्यातील विविध नद्यांवर उभारण्यात आलेल्या सर्व चेक डॅम्सचे लाकडी दरवाजे (शटर्स) काढण्यात आले आहेत. पावसाळ्यात नदीचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत राहावा आणि पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जलसंपदा विभागाने नदीपात्रातील झाडांचे ओंडके, फांद्या तसेच इतर अडथळे हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार साफसफाई आणि गाळ काढण्याची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

Goa Dam Water Level
Goa Politics: 'आप' आणि 'आरजी' समोर काँग्रेस लोटांगण घालणार? अस्तित्वासाठी विरोधकांशी जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही!

दुसरीकडे, राज्यातील काही भागांत पाण्याचा दाब कमी होणे आणि अपुरा पाणीपुरवठा होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. विशेषतः बार्देश तालुक्यातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून या समस्येचा सामना करावा लागत आहे.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, अस्नोडा जलशुद्धीकरण केंद्रात अलीकडेच देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात आली होती. यंत्रणा पूर्ववत सुरू करताना पुरवठ्याच्या वेळापत्रकात काही बदल करावे लागले. ही तात्पुरती अडचण असून लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Goa Dam Water Level
Goa Congress: काँग्रेस अजूनही सुस्त, भाजपची बुथवर फौज फिक्स! गोव्याच्या रणांगणात कशी होणार लढत?

पावसाची प्रतीक्षा

सध्या पावसाची प्रतीक्षा असताना धरणांतील घटता जलसाठा आणि वाढती पाण्याची मागणी यामुळे प्रशासन सतर्क झाले असून जलव्यवस्थापनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

राज्यातील बहुतांश धरणांतील साठा चिंताजनक पातळीवर पोहोचल्याने पावसाळ्याच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांत पावसाला सुरुवात न झाल्यास पाणीपुरवठ्याचे नियोजन अधिक कठीण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com