Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Mark Wood Retirement From International Cricket: इंग्लंडचा अनुभवी आणि धडाकेबाज वेगवान गोलंदाज मार्क वुड याने दुखापतींच्या सततच्या त्रासाला कंटाळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
Mark Wood Retirement From International Cricket
Mark Wood RetirementDainik Gomantak
Published on
Updated on

Mark Wood Retirement From International Cricket: इंग्लंडचा अनुभवी आणि धडाकेबाज वेगवान गोलंदाज मार्क वुड याने दुखापतींच्या सततच्या त्रासाला कंटाळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. गेल्या काही काळापासून गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे त्रस्त असलेला 36 वर्षीय वुड मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये पर्थ येथे झालेल्या एशेस मालिकेतील कसोटी सामन्यानंतर संघाबाहेर होता. या मालिकेदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे फ्रँचायझी क्रिकेटपासूनही त्याला लांब राहावे लागले. अखेर मेडिकल सल्ल्याचा विचार करुन आणि आपले सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट संपत आल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्याने जाहीर केले.

निवृत्तीबाबत बोलताना मार्क वुडने भावना व्यक्त केली की, आपल्या कारकिर्दीत आपण नेहमीच दुखापतींवर मात करुन टीकाकारांना चुकीचे सिद्ध करण्याची आणि पुनरागमन करण्याची जिद्द बाळगली होती. प्रत्येक वेळी मैदानात उतरुन सर्वोत्तम कामगिरी करण्याचे त्याचे स्वप्न होते, परंतु यावेळी दुखापतीविरुद्धची ही लढाई आपण गमावल्याची खंत त्याने बोलून दाखवली. वैद्यकीय तज्ज्ञांच्या स्पष्ट सल्ल्यानुसार आता कसोटी क्रिकेट (Test Cricket) आणि 50 षटकांच्या मर्यादित षटकांचे सामने एकाच वेळी खेळणे शारीरिकदृष्ट्या अजिबात शक्य नाही. त्यामुळे गेल्या वर्षभरातील परिस्थिती पाहता हा निर्णय अनपेक्षित नसला तरी कॉन्ट्रॅक्ट संपण्याच्या या टप्प्यावर हा अत्यंत नैसर्गिक निर्णय ठरतो, असे त्याने स्पष्ट केले.

Mark Wood Retirement From International Cricket
Ben Stokes England Head Coach: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठा बदल! बेन स्टोक्स बनणार संघाचा मुख्य प्रशिक्षक? नव्या भूमिकेची जोरदार चर्चा

मार्क वुडने 2015 मध्ये लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण करत आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची यशस्वी सुरुवात केली होती. आपल्या वेगवान आणि आक्रमक गोलंदाजीच्या बळावर त्याने इंग्लंडसाठी 38 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 119 बळी टिपले. याशिवाय, 70 एकदिवसीय सामन्यांमध्ये 80 विकेट्स तर 38 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 54 बळी आपल्या नावावर केले. विशेष म्हणजे, क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये इंग्लंडसाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो सहाव्या क्रमांकावर राहिला.

Mark Wood Retirement From International Cricket
England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

वेग आणि आक्रमकतेच्या जोरावर विरोधी फलंदाजांच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या या शिलेदाराच्या निवृत्तीमुळे आता इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीच्या आक्रमणात मोठी पोकळी निर्माण झाली असून क्रीडाविश्वातून त्याला भावनिक निरोप दिला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com