Goa Politics Dainik gomantak
गोंयकाराचें मत

Goa Politics: निवडणुकीचे वारे वाहू लागले! भाजप घराघरांत, विरोधक मात्र एकीच्या प्रतीक्षेत

Goa Assembly Election 2027 Analysis: काँग्रेससमोर घर सांभाळण्याचे आव्हान आहे, तर भाजपसमोर घराघरांत पोहोचण्याचा कार्यक्रम.

गोमंतक ऑनलाईन टीम

काँग्रेससमोर घर सांभाळण्याचे आव्हान आहे, तर भाजपसमोर घराघरांत पोहोचण्याचा कार्यक्रम. महालय सरला, नवरात्र संपले, दिवाळीचे वेध लागले. दिवसा उन्हाचा चटका - रात्री थंडीची चाहूल अशा बदलत्या वातावरणात गोव्यात निवडणुकीचे वारेही दिशा पकडू लागलेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या गोवा दौऱ्याने सत्ताधारी पक्षाच्या राजकीय चक्रांना वेग आला आहे.

कार्यकर्त्यांना ५० टक्के मतांचे लक्ष्य, घरोघरी जाऊन विकासकामांचा लेखाजोखा मांडण्याचा आदेश आणि युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याची मुभा, या साऱ्या घडामोडींतून भाजपने निवडणुकीची तयारी कागदावरून थेट मतदारांच्या दारात नेली आहे. विरोधकांच्या गोटात मात्र अजूनही राजकीय दिशादर्शकाचा काटा स्थिरावलेला दिसत नाही. युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्या, हा निरोप मगोपसाठीही अर्थपूर्ण आहे. दिल्लीकडे बोट दाखवून जागावाटपाची खळखळ करणाऱ्यांना स्थानिक गणिताची पाटी सोडवावी लागणार आहे. मडकईवरील वर्चस्व राखतानाच ढवळीकरांचे फोंडा, शिरोडा येथेही हातपाय पसरण्याचे मनसुबे आहेत.

सुदिनना दीपक आणि पुत्र मिथील यांच्या राजकीय भवितव्याची तजवीज करायची आहे. पक्षावरील पकड घट्ट ठेवण्याच्या या प्रयत्नात युतीचे गणित जुळते की बेरीज-वजाबाकीचा नवा खेळ सुरू होतो, हे पाहावे लागेल. मांद्रेत ‘जीत’ झाली, तरी आरोलकर कधी भाजपवासी होतील, या धास्तीचे गणितही सोपे नाही. राजकारणात आजचा मित्र उद्याचा उमेदवार व परवाचा प्रतिस्पर्धी ठरू शकतो. इथे नातीही मतांच्या टक्केवारीनुसार बदलतात. सत्ताधारी युतीत जागांसाठी रस्सीखेच सुरू असली तरी विरोधकांचा तंबू अजून नीट उभा राहिलेला नाही. गोवा फॉरवर्डने घाईघाईत ‘आप’चा हात धरला आणि नंतर सोडला.

राजकीय मैत्रीत हात मिळवणे सोपे, हात सोडताना मात्र बोटांची मोजदाद करावी लागते! मतविभाजन टाळण्यासाठी ‘आरजी’ला सोबत घेणाऱ्या काँग्रेसला आता मित्रपक्षातील स्वतंत्र राजकीय संसाराचाही विचार करावा लागत आहे. एकाच छताखाली राहायचे, पण स्वयंपाकघर स्वतंत्र ठेवायचे, असा हा प्रकार झाला आहे. काँग्रेसची भिस्त असलेल्या दक्षिण गोव्यात युगाेडेपा आणि गोवा काँग्रेस शड्डू ठोकेल. काँग्रेससमोर घर सांभाळण्याचे आव्हान आहे, तर भाजपसमोर घराघरांत पोहोचण्याचा कार्यक्रम. काँग्रेसने राखण यात्रा काढली; मात्र त्यात जनतेच्या प्रश्‍‍नांपेक्षा रुसवेफुगवेच अधिक चर्चेत आले. भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधकांची एकी आवश्यक आहे.

जिल्‍हा पंचायत निवडणूक निकालाचा सांगावा तोच होता; पण प्रत्यक्षात प्रत्येक पक्षाला आपापल्या ताकदीची, जागांची, नेतृत्वाची चिंता अधिक आहे. आघाडीच्या चर्चेत खुर्च्यांची संख्या ठरवण्याआधी खुर्चीवर बसणार कोण, यावरच वाद सुरू झाले तर निवडणुकीचे मैदान दूरच राहणार. गोव्याच्या प्रश्‍‍नांवर एकत्र येण्याऐवजी राजकीय गणिताच्या वहीतच पक्षांची पेने अडकली आहेत. या विस्कळीतपणाचा फायदा भाजपला मिळणे स्वाभाविक आहे.

प्रसंगी मगोपला दूर ठेवून स्वतःचे राजकीय हेतू साध्य करण्याचे धाडसही भाजप करू शकतो. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या म्हणण्यानुसार आणखी ११० दिवसांनी निवडणूक होईल. म्हणजे विरोधकांकडे अजून काही दिवस शिल्लक आहेत. या काळात ते एकीचा धडा गिरवतील की एकमेकांचीच परीक्षा घेत बसतील? भाजपने पाल उभारली आहे. विरोधकांनी आधी आपापल्या होड्या एकाच दिशेने वळवाव्यात. अन्यथा, निवडणुकीच्या समुद्रात विरोधकांच्या विस्कळीतपणाचे वारे भाजपच्या पालात भर घालतील!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Drug Case: 22 लाखांचे कोकेन, 10 लाखांची रोकड, दिल्लीपर्यंत धागेदोरे, मोरजी कोकेन प्रकरणाला नवे वळण; चौघे पोलिसांच्या ताब्यात

Income Tax FAST-DS Scheme: विदेशी मालमत्ता जाहीर करण्याची सुवर्णसंधी! 31 डिसेंबरपर्यंत करा अर्ज; आयकर विभागाची 'FAST-DS 2026' योजना सुरु

Women's Cricket: गोव्याच्या महिला संघाचा सलग दुसरा विजय! चंडीगडला 43 धावांनी धूळ चारली

ISL Football: आयएसएलमध्ये एफसी गोवा विजयाच्या शोधात! फातोर्ड्यात स्पोर्टिंग क्लब दिल्लीशी भिडणार

Dairy Products Price Hike 2026: दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईचा झटका! तूप, लोण्यासह 63 डेअरी प्रोडक्ट्सच्या किमतीत मोठी वाढ

SCROLL FOR NEXT