Goa Politics: 'वाद नको, गोवा रक्षणाचा विचार करा'; तृप्ती बकाल यांचा मनोज परब, अजय खोलकरांना टोला

Revolutionary Goans Party: घरी बसून सोशल मीडियाद्वारे वाद घालत गोव्याचा विकास होणार नाही. त्यासाठी आमदार वीरेश बोरकर यांच्याप्रमाणे मैदानात उतरून काम करावे लागते’’.
Revolutionary Goans Party
Goa PoliticsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: ‘‘घरी बसून सोशल मीडियाद्वारे वाद घालत गोव्याचा विकास होणार नाही. त्यासाठी आमदार वीरेश बोरकर यांच्याप्रमाणे मैदानात उतरून काम करावे लागते’’, असे म्हणत आरजीच्या जिल्हा पंचायत सदस्य तृप्ती बकाल यांनी आमदार बोरकरांवर सोशल मीडियाद्वारे हल्ले चढवत असलेल्या आरजीचे माजी अध्यक्ष मनोज परब आणि खजिनदार अजय खोलकर यांना प्रत्युत्तर दिले आहे.

राज्य विधानसभा निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना आणि काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवण्याचा निर्णय आमदार तथा आरजीचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेश बोरकर यांनी घेतलेला असताना, मनोज परब गटाने आमदार बोरकरांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून हल्लाबोल करण्यास सुरुवात केलेली आहे.

Revolutionary Goans Party
Goa Cyber Fraud: 28 हजार कोटींच्या सायबर घोटाळ्याप्रकरणी मुंबईतील वकिलाला ईडी कोठडी VIDEO

आरजी आपल्याकडेच असल्याचा दावा करीत अजय खोलकर बोरकरांवर दररोज टीकेचे बाण सोडत असून, मनोज परबही त्यांना पाठिंबा देत असल्याने बोरकर गटाकडून तृप्ती बकाल आता मैदानात उतरल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com