गोव्यात मराठी आणि कोकणी साहित्याला खूप मोठी समृद्ध परंपरा आहे. दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने गोव्यात अनेक दर्जेदार दिवाळी अंक आणि विशेष पुरवण्या प्रसिद्ध होतात, ज्यामध्ये गोव्याची संस्कृती, इथली लोकजीवन, कथा, कविता आणि वैचारिक लेखांना स्थान असते. वाचकांना वाचनाची सवय लागण्यास काही गोष्टी कारणीभूत असतात, त्यात दिवाळी अंकांचे स्थान अनन्यसाधारण आहे. गोव्यातील वाचक अन् दिवाळी अंकही याला अपवाद नाहीत.
‘गोमन्तक’ दिवाळी अंक
गोव्यातील सर्वात जुन्या आणि लोकप्रिय दैनिकांपैकी एक असलेल्या ‘गोमन्तक’चा दिवाळी अंक अत्यंत लोकप्रिय आहे. यात गोव्यातील नामवंत साहित्यिक, विचारवंतांचे वाचनीय उत्कृष्ट लेख, कथा व कविता वाचायला मिळतात. यंदाच्या अंकात संपादक-संचालक राजू नायक यांनी सीता वालीस या गोमंतकीय कन्येने आंगोलामध्ये रक्तलांच्छित राज्यक्रांतीत दिलेल्या योगदानाची, तिच्या सर्वोच्च त्यागाची, तिच्यावर झालेल्या अनन्वित अत्याचाराची दखल ‘मेन स्टोरी’मधून घेतली आहे.
याशिवाय पन्नास वर्षांत पणजी पाण्याखाली -डॉ. नंदकुमार कामत, पणजी-दलदलीतून गगनभरारीकडे -संजीव सरदेसाई, गव्हर्नमेंट क्वार्टर्समधील स्मरणरंजन- संजय ढवळीकर, अशा पणजी शहराच्या जडणघडणीवर प्रकाश टाकणाऱ्या मजकूरासह, मस्कतमधले दिवस-धर्मानंद कामत, फिल्म सिटी नव्हे, फिल्म व्हिलेज-धर्मानंद वेर्णेकर, आदिवासींची स्थिती गती-दिनेश जल्मी, अंतरीचा ज्ञानदीप- अकल्पिता राऊत देसाई यांच्या विविधांगी लेखांसह इतरही वाचनीय वैचारिक, तसेच विनोदी कथांसह, कविता-विडंबन, व्यंगचित्रांनी नटलेला अंक जणू हलका फुलका वाचनीय फराळ वाचकांना लाभणार आहे.
गोव्यातील इतर प्रमुख वृत्तपत्रेही दिवाळी अंक प्रकाशित करतात. मात्र, गोव्यातील दिवाळी अंक परंपरा महाराष्ट्रातील दिवाळी अंक परंपरेच्या दृष्टीने काहीशी अलक्षित राहिली आहे. महाराष्ट्रात पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांसारख्या मंडळींनी राजकीय क्षेत्रात राहूनही साहित्याला पोषक वातावरण निर्मिती केली, त्यामुळे दिवाळी अंकांची सशक्त परंपरा टिकून राहिली. गोव्यात मात्र, सरकारकडून जाहिरातींची रसद दिवाळी अंकांना म्हणावी तशी लाभत नसल्याची खंत व्यक्त होते. विविध साहित्यिक संस्थांचे दिवाळी अंकही प्रकाशित होतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.