Goa Congress Vote Bank Analysis Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Congress: 2027 चा मास्टरप्लॅन की आत्मघातकी पाऊल? विधानसभा निवडणुकीपूर्वी गिरीश चोडणकरांकडे धुरा; सत्तेसाठी काँग्रेसचा 'हाय-व्होल्टेज' डाव!

Goa Congress Vote Bank Analysis: राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मोजकेच महिने बाकी असताना काँग्रेसने गोव्यात डाव खेळला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

विलास ओहाळ

पक्षांतर केलेल्या आमदारांच्या आठही मतदारसंघांचा विचार केला तर दिगंबर कामत आणि मायकल लोबो हे दोन नेते सोडले तर इतर ठिकाणी काँग्रेसची ‘व्होट बँक’ आहे आणि ती टिकवण्याबरोबर चांगला उमेदवार देऊन त्यांना पाठबळ देण्याचे काम पक्षाला करावे लागणार आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मोजकेच महिने बाकी असताना काँग्रेसने गोव्यात डाव खेळला आहे. माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्षपदी बसविले आहे. त्यामुळे गोव्यात काँग्रेसच्या विश्वासर्हतेवर आत्तापासून प्रश्न उपस्थित होऊ लागले असले तरी त्यांच्या येण्याने पूर्वीचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. त्यामुळे गत निवडणुकीचा विचार करता काँग्रेसच्या उमेदवारीवर जिंकून येऊन भाजपात जाणाऱ्यांचे आठ मतदारसंघ पुन्हा मिळविण्याचे आव्हान असणारच आहे.

परंतु ज्या मतदारसंघात पक्षाचे उमेदवार दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहिले आहेत, अशा १२ ठिकाणी चोडणकर आणि त्यांच्या कंपनीला तिथे विजय मिळविण्याइतपत मतांची टक्केवारी वाढविण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहेत, हे स्पष्ट आहे. काँग्रेसने २०२७ च्या निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून प्रदेशाध्यक्ष बदलला आहे, त्याचा परिणाम निकालानंतर दिसेलही. परंतु आत्ता काँग्रेसने जे पत्ते टाकलेत, ते पाहता काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे आणि त्यांच्याच आशेवर पक्षाची धुरा टिकून राहणार हे स्पष्ट आहे.

प्रदेशाध्यक्ष बदलला की, लगेच नवे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात येतील असे नाही. निवडणुका जवळ येताच इतर पक्षात उमेदवारीची शक्यता कमी वाटल्यानंतरच ते काँग्रेसकडे येतील हे स्पष्ट आहे. परंतु २०२२ मध्ये काँग्रेसतर्फे निवडून आलेले दिगंबर कामत (मडगाव), मायकल लोबो (कळंगुट), दिलायला लोबो (शिवोली), केदार नाईक (साळगाव),रुडाल्फ फर्नांडिस (सांताक्रूझ),राजेश फळदेसाई (कुंभारजुवे), आलेक्स सिक्वेरा (नुवे) व संकल्प आमोणकर (मुरगाव) यांनी भाजपमध्ये काही दिवसांतच उडी घेतली होती.

कामत व लोबो हे दोन नेते सोडले तर इतरत्र काँग्रेसची ‘व्होट बँक’ आहे आणि ती टिकवण्यासह चांगला उमेदवार देऊन त्यांना पाठबळ देण्याचे काम पक्षाला करावे लागेल. शिवाय काँग्रेसचे सध्याचे आमदार फेरेरा (हळदोणा), विरोधी पक्षनेते युरी (कुंकळ्ळी) व आमदार डिकॉस्ता (केपे) यांना शेजारील मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी पेलावी लागणार आहे.

मतदारसंघ स्थान मिळालेली मते

म्हापसा दुसरे ८,५४८,ताळगाव दुसरे ८,१२६, साखळी दुसरे ११,५८४,फोंडा तिसरे ६,८३९

वास्को दुसरे ९,४६१, दाबोळी दुसरे ६०२४ ,बाणावली तिसरे ४६९७

वेळ्ळी दुसरे ५,२२१ ,कुडचडे दुसरे ९,३०१ ,सांगे तिसरे ४,६४४ ,काणकोण तिसरे ५,३५१

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT