Agriculture News Canva
गोंयकाराचें मत

National Farmer Day: भारतीय शेतकरी अनेक समस्यांशी झुंजतोय, छोटे शेतकरी गरिबीत अडकलेले दिसताहेत; यावर उपाय काय?

Indian Farmer: आजचा, २३ डिसेंबर हा दिवस भारतात किसान दिवस म्हणून साजरा केला जातो.‌भारतीय शेतकरी आज अनेक समस्यांशी झुंजताना दिसत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

आजचा, २३ डिसेंबर हा दिवस भारतात किसान दिवस म्हणून साजरा केला जातो.‌भारतीय शेतकरी आज अनेक समस्यांशी झुंजताना दिसत आहेत. हवामान बदल, पाण्याची कमतरता, मातीच्या गुणवत्तेचा ऱ्हास, आधुनिक तंत्रज्ञान/सिंचनाचा अभाव, बाजारपेठेतील दलाल, कर्ज, कमी उत्पन्न, अपुरी पत यासारख्या समस्या त्यांच्यासमोर आ वासून उभ्या आहेत.

कमी उत्पादकतेमुळे आज छोटे शेतकरी गरिबीत अडकलेले दिसतात.‌ या सर्व कारणांमुळे चांगल्या पायाभूत सुविधा, चांगली धोरणे आणि शाश्वत पद्धतींची गरज या गोष्टी ठळक बनलेल्या आहेत. 

अन्न उद्योगात, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे सहसा दुर्लक्ष केले जात असते.‌ विकसनशील देशांमधील शेतकऱ्यांना रस्ते, वाहने आणि पैशांच्या कमतरतेमुळे उत्पादन बाजारपेठेत नेण्यात अडचण येते.

त्यांना अनेकदा त्यांचे उत्पादन स्थानिक बाजारपेठेत पायी किंवा सायकलने घेऊन जावे लागते, जे आव्हानात्मक आणि वेळखाऊ असते. या कारणामुळे त्यांचे उत्पादन त्यांना खूप कमी किमतीत विकावे लागते कारण मागणी जास्त असलेल्या ठिकाणी ते वाहतूक करूच शकत नाहीत.

भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा होतो. शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांसंबंधी जागरूकता निर्माण व्हावी हा या दिवसाचा उद्देश आहे.‌

लहान शेतकऱ्याला फायदा व्हावा यासाठी चौधरी चरण सिंग यांनी जमीन मर्यादा कायदे आणि भाडेपट्टी सुधारणांसाठी आग्रह धरला होता. जमीनदारी व्यवस्था  रद्द करण्यात, जमिनीचे पुनर्वितरण करण्यात आणि सरंजामी शोषण कमी करण्यास त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

शेतकऱ्यांच्या समस्या असंख्य असूनही त्यांचे परिणाम टाळण्याचे किंवा कमीत कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत. तंत्रज्ञान हा त्यातील महत्त्वाचा मार्ग असला तरी आधीच उपलब्ध असलेले उपाय देखील त्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकतात.‌

शेतकरी संघटना मजबूत करणे, पुरेशी गुंतवणूक, उत्पादन साठवण सुविधा, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा परिचय, सुपीक जमिनीची वाढीव उपलब्धता, शेतकऱ्यांचे शिक्षण, पिक विमा इत्यादी मार्गाने शेतकऱ्यांच्या समस्या कमी होऊ शकतात.

सर्व समस्या व त्यांचे उपाय एकमेकांची जोडले गेलेले आहेत. लहान शेतकऱ्यांची शेती अधिक फायदेशीर बनवणे हे समाजाचे ध्येय असले पाहिजे. त्यासाठी बाजारपेठेकडे त्यांची जोडणी करून दिली गेली पाहिजे. त्यांच्या मातीचे आरोग्य आणि त्यांची जलसंपत्ती यांची निगा कशी घेतली जाईल या  दृष्टीनेही प्रयत्न झाले पाहिजेत.

संतोष पाटील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: कोहलीचा 'विराट' शो फक्त टीव्हीवरच, स्टेडियममध्ये चाहत्यांना नो-एन्ट्री; 'विजय हजारे ट्रॉफी'बाबत सरकारचा मोठा निर्णय

Goa Crime: भुतेभाटमध्ये चोरीचा थरार! 5 जणांच्या टोळीचा डल्ला मारण्याचा 'प्लॅन' फसला; एकाला रंगेहात पकडलं, 4 जण पसार

Goa ZP Election: "युतीचा निर्णय झाला पण..." सरदेसाईंनी मांडली पराभवाची कारणे; '2027'साठी नव्या रणनीतीचे संकेत

VIDEO: "धोनीने माझं करिअर उद्ध्वस्त..." निवृत्तीनंतर भारतीय खेळाडूनं सोडलं मौन, 'माही'बाबत केला मोठा खुलासा

Santosh Trophy 2025: गोव्याने संधी गमावली! संतोष करंडक फुटबॉलमध्ये मुख्य फेरी हुकली; लक्षद्वीपसोबत गोलबरोबरी

SCROLL FOR NEXT