Dhargalim Village Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Dhargal: सफर गोव्याची! 1550 साली आक्रमकांपासून वाचवण्यासाठी प्राचीन मंदिर इथे हलवले, हिरव्या शालीत गुंडाळलेलं 'धारगळ'

Dhargalim Village Goa: पेडणे तालुक्यातील धारगळ या पंचक्रोशीतील माझ्या गावाच्या मातीत एक वेगळंच बळ आहे, ती माती माणसाला घडवते, जोडते आणि जपते.

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे तालुक्यातील धारगळ या पंचक्रोशीतील माझ्या गावाच्या मातीत एक वेगळंच बळ आहे, ती माती माणसाला घडवते, जोडते आणि जपते. धारगळ हे माझं गाव, माझा अभिमान आहे. बारा वाड्यांनी वसलेलं हे गाव सगळ्या वाड्यांना एकत्र बांधून ठेवतं. प्रत्येक वाडा आपली वेगळी ओळख जपत गावपण मात्र सारखंच जपतो.

शापोरा नदीच्या काठावर वसलेलं धारगळ नदीसारखंच शांत, संयमी आणि जीवनदायी आहे. नदीच्या पाण्याने शेतं फुलतात, आणि माणसांच्या आयुष्यात समाधान येतं. पहाटेचा सूर्य उगवतो तेव्हा नदीवर पडलेलं सोनेरी प्रतिबिंब डोळे भरून पाहावंसं वाटतं. थंड वारा आणि पक्ष्यांचा किलकिल आवाज नवीन दिवसाची सुरुवात करतो.

चारही बाजूंनी निसर्गसौंदर्याने नटलेलं गाव, डोंगर, झाडं, माळरानं यांचं सुंदर मिश्रण आहे. पावसाळ्यात तर सगळं गाव हिरव्या शालीत गुंडाळल्यासारखं दिसतं. धारगळात शेती म्हणजे फक्त काम नाही, ती इथली संस्कृती आहे. भातशेती, नाचणी, भाजीपालामेहनती हातांनी पिकवलेला असतो. आंबा, काजू, नारळाच्या बागा गावाचं वैभव वाढवतात.

झाडाखाली बसून घेतलेली विश्रांती मेहनतीला नवी ऊर्जा देते. सकाळी शेताकडे जाणारी माणसं, दुपारी उन्हातही न थांबणारी मेहनत, संध्याकाळी वाड्यावरची गप्पांची रंगत हेच धारगळचं खऱ्या अर्थाने जीवन आहे. जवळून धावणारी कोकण रेल्वे गावाच्या आठवणी बाहेरच्या जगात घेऊन जाते. धारगळमध्ये अखिल भारतीय आयुर्वेद संस्था सुरू झाल्यामुळे हे गाव आता आरोग्य पर्यटनाचे केंद्र बनत आहे.

धारगळजवळ ओझरी धबधबा आणि पेरकॉन धबधबा ही निसर्गरम्य ठिकाणे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत. पायाभूत सुविधांच्या विकासामुळे येथे रिअल इस्टेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. रेल्वेचा आवाज आला की मन नकळत गावाशी अधिक घट्ट जुळतं. शांतादुर्गा मंदिर हे धारगळमधील सर्वात जुने आणि पवित्र मंदिर आहे.

साधारण १५५० च्या सुमारास, म्हापसा येथील मूळ मंदिर आक्रमकांपासून वाचवण्यासाठी या सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. श्री काळभैरव मंदिर हे भगवान शिवाच्या रौद्र रूपाला समर्पित असलेले एक प्राचीन मंदिर आहे. येथील काळ्या पाषाणातील मूर्ती आणि विस्तीर्ण परिसर पर्यटकांना आकर्षित करतो.

श्री धारेश्वर माऊली मंदिरे हे चार मंदिरांचा समूह असून येथील शांत वातावरण भक्तांना प्रसन्नता देते. श्री नारायण मंदिर आणि गणपती मंदिरे देखील स्थानिक लोकांच्या श्रद्धेची ठिकाणे आहेत.सण-उत्सवांमध्ये गाव एकदिलाने नटतं, जत्रा, भजन, कीर्तन, पालखी गावात उत्साहाचं वातावरण निर्माण करतात. देवळातील घंटानाद मनाला शांतता देतो.

धारगळच्या माणसांची खरी ओळख त्यांची माणुसकी आहे. सुखात आनंद वाटणारी आणि दुःखात खांदा देणारी माणसं आजही इथे आढळतात. इथे नाती रक्ताची नसून मनाची असतात, वाड्यावाड्यातील आपुलकी गावाला एक कुटुंब बनवते.

माझ्या गावाच्या मातीत संस्कार आहेत, इतिहास आहे आणि भविष्य घडवण्याची ताकद आहे. जिथे मी वाढलो, शिकलो, आनंद-दुःख अनुभवले ते धारगळ गाव म्हणजे माझी ओळख, माझं अस्तित्व आहे. म्हणून अभिमानाने सांगतो, हेच आपलं धारगळ गाव आहे आणि हीच माझ्या गावाच्या मातीची खरी शान आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: नशिबाची तगडी लॉटरी, गरिबी कायमची मिटणार! 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं भाग्य; बुध-मंगळाचा मोठा चमत्कार

Kharivada: खारीवाडा जेटीच्या दुरुस्तीचे आदेश; आमदार साळकर यांच्याकडून पाहणी; मासेमारी हंगामापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना

RBI Alert: 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयकडून अलर्ट जारी, बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट; वेळीच सावध व्हा!

Dharbandora Health Centre: कुळे-शिगावला मिळणार 24 तास सेवा; आपत्कालीन 'आरोग्य सेवा केंद्र' सुरू, सभापती गावकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

India vs England 2nd T20: संजू सॅमसन अन्‌ तिलक वर्माची फलंदाजी रडारवर; वैभवला संधी मिळणार?

SCROLL FOR NEXT