Cuncolim Village Goa
Cuncolim Village GoaDainik Gomantak

Cuncolim: सफर गोव्याची! गोवा मुक्ती लढ्याची‌ ठिणगी पडलेले, 12 बांधाच्या पाण्याने समृद्ध असलेले 'कुंकळ्ळी'

Cuncolim Village Goa: सोळाव्या शतकात कुंकळ्ळी , असोळणे, वेळ्ळी,आंबेली आणि वेर्डे या पाच गावांनी एकत्र येऊन‌ धर्मांध पोर्तुगीज सत्तेविरुद्ध कुंकळ्ळी येथे लढा दिला आणि ख्रिस्ती धर्मगुरूंना कंठस्नान घातले.
Published on

सासष्टी तालुक्यातील कुंकळ्ळी गावात व बारा बांधाच्या पाण्याने समृद्ध असलेल्या शूरवीरांच्या पुण्यभूमीत‌‌ माझा जन्म झाला,याचा मला सार्थ अभिमान आहे. सोळाव्या शतकात कुंकळ्ळी , असोळणे, वेळ्ळी,आंबेली आणि वेर्डे या पाच गावांनी एकत्र येऊन‌ धर्मांध पोर्तुगीज सत्तेविरुद्ध कुंकळ्ळी येथे लढा दिला आणि पाच ख्रिस्ती धर्मगुरूंना कंठस्नान घातले, त्यामुळे कुंकळ्ळीचाच नव्हे तर तमाम गोमंतकीयांचा स्वाभिमानी बाणा राखला गेला.

ह्या हल्ल्यामुळे पोर्तुगीज, रोम आणि युरोपियन राष्ट्रांमध्ये खळबळ माजली, परिणामी या पाच गावच्या लोकांच्या शेतजमिनी काढून घेतल्या, एवढ्यावरच ते थांबले नाहीत, पोर्तुगीज सूड उगवण्याची योजना आखत होते. तहाची बोलणी करण्याच्या निमित्ताने सोळा महानायकांना असोळणेच्या किल्ल्यावर आमंत्रित करून त्या निःशस्त्र वीरांवर प्राणघातक हल्ला करून त्यांना ठार मारण्यात आले.

आमच्या पूर्वजांचा पराक्रम आणि त्यांच्या बलिदानाचा इतिहास एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे‌ उभा राहतो. त्यांच्या पराक्रमी कामगिरीचा अभिमान कुंकळ्ळीच्या‌ नसानसात भिनला आहे. कुंकळ्ळीच्या सोळा महानायकांनी स्वातंत्र्यासाठी केलेल्या शौर्याची आणि त्यांच्या अतुलनीय त्यागाची गाथा पुढील पिढीसाठी सदैव जाज्वल्य, राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारी ठरली. त्यांची प्रेरणा घेऊन कुंकळ्ळीच्या अनेक तरुणांनी गोवा मुक्ती लढ्यात भाग घेतला.

गोव्याचा मुक्तीसंग्राम हा भारतीय लढ्यातील स्फूर्तिदायक आणि तेजस्वी कालखंड आहे. आत्मसमर्पणाची यशोगाथा आहे. कुंकळ्ळी गाव पोर्तुगीज काळापासून शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर आहे. कुंकळ्ळीचे‌ विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी मुंबई‌, बेळगाव व इतर ठिकाणी जाऊन आपले इच्छित शिक्षण पूर्ण करीत. त्यामुळे कुंकळ्ळी गावात‌ पूर्वीपासून डाॅक्टर, इंजिनिअर, वकील, न्यायाधीश तसेच राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक जन्मले.

गोवा मुक्तीनंतर‌ही ही परंपरा कायम राखली. गोवा एसएससी बोर्डाच्या परीक्षेत बोर्डात प्रथम येण्याचा विक्रम केला. मुक्तीनंतरच्या पहिल्या शिरगणतीनुसार‌ कुंकळ्ळी साक्षरतेत अग्रेसर होता.नंतरही वकील, शिक्षक अशाच सुशिक्षित व्यक्तींनी कुंकळ्ळीचे नेतृत्व केले. कुंकळ्‍ळी मतदारसंघातील पहिले आमदार वैद्यकीय क्षेत्रातील एक नामवंत डॉक्टर होते.

Cuncolim Village Goa
Nerul: सफर गोव्याची! 400 वर्षांपूर्वी दैवत हलवून मांद्रे येथे सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले; भक्तीरसातले 'नेरुळ'

आज एन‌आयटी,आयआयटी अशा शैक्षणिक प्रकल्पांना विरोध‌ होत आहे, पण कुंकळ्ळीत एनआयटी चे मोठ्या मनाने स्वागत केले. इंजिनियरिंग आयआयटी व एनआयटीमधून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आहेत.आज ते मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये नोकरी करत आहेत. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षण हे‌ व्यक्तीमध्ये सर्जनशीलता, कलात्मकता, कुतुहल आणि वैचारिक क्षमता निर्माण करीत असते.

Cuncolim Village Goa
Mardol: सफर गोव्याची! ओहोळ-नाल्यांचं संगीत ऐकणारं, फुलांचा सुगंध घेऊन येणारं 'म्हार्दोळ'

१९४२ मधील भारतीय लढ्यातील एक सेनापती डाॅ. राम मनोहर लोहिया यांचे असोळणे गावातील डॉ.ज्युलियांव‌ मिनेझिस यांच्याकडे १०जून १९४६ आगमन झाले.असोळणे कुंकळ्ळी मतदारसंघाचा भाग आहे.‌ त्याचा परिणाम मडगाव येथे १८ जून १९४६ रोजी जी क्रांती घडली व‌ खऱ्या अर्थाने गोवा मुक्ती लढ्याची‌ ठिणगी याच कुंकळ्ळीत गावात पडली. व पुढे गोवा १९ डिसेंबर १९६१ रोजी पोर्तुगीज राजवटीपासून मुक्त झाला. अलीकडे गोव्याचे अस्तित्व व ओळख धोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर इनफ इज इनफ आंदोलन उभे करणारे निवृत्त न्यायमूर्ती फर्दिन रिबेलो हेही कुंकळ्ळीचे माजी आमदार होत, हे अभिमानाने सांगावेसे वाटते.

श्रीपाद गोविंद देसाई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com