Bangladeshi dacoit gang arrested Delhi Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

घुसखोरीचे लोण थोपवा!- संपादकीय

Bangladeshi dacoit gang arrested Delhi: सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीचे लोण गोव्यातही पसरले आहे. जे दरोडेखोर पकडले गेले आहेत त्यांना गोव्यात कोणी मदत केली होती, याचा तपास लागेल तेव्हाच या मोहिमेला पूर्णविराम मिळेल.

गोमंतक ऑनलाईन टीम

सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीचे लोण गोव्यातही पसरले आहे. जे दरोडेखोर पकडले गेले आहेत त्यांना गोव्यात कोणी मदत केली होती, याचा तपास लागेल तेव्हाच या मोहिमेला पूर्णविराम मिळेल. स्थानिकांच्या सहकार्याशिवाय धाडसी दरोडे निव्वळ अशक्य आहेत.

गतवर्षी २० एप्रिलला दोनापावला येथे धेंपे कुटुंबीयांच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा पडला होता. घरातील व्यक्तींना चादरीत गुंडाळून लूट केली गेली. त्याचीच पुनरावृत्ती म्हापसा व फोंड्यातही झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. दरोडेखोर कायदा सुव्यवस्थेला आव्हान देत राहिले. दरोडेखोरांसाठी गोवा ‘मोकळे मैदान’ बनत चालल्याची चिंता गडद झाली असतानाच स्थानिक पोलिसांनी दाखवलेली तपासातील चिकाटी नक्कीच कौतुकास पात्र आहे. बरोब्बर वर्षाने दोनापावला दरोड्याचा तपास लागला.

‘ती’ टोळी बांगलादेशीच निघाली. त्याचवेळी थिवी - माडेल येथे घरफोडी करणाऱ्या भुरट्यांच्या मुसक्या आवळण्यात यश आले, जे बंगालमधील असून बांगलादेशशी संबंधित आहेत, असा कयास आहे. यातून एक सिद्ध होते- पूर्वेकडून होणारी घुसखोरी गोव्यासाठी त्रासदायक बनली आहे. दिल्ली पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची आंतरराज्यीय कार्यप्रणाली व विविध राज्यांमध्ये पसरलेले जाळे चक्रावून टाकणारे आहे.

या सर्वांचा माग काढणे सोपे नव्हते. पोलिसांनी तांत्रिक साधनांचा वापर करून गुन्ह्याचा छडा लावला. तपासातील महत्त्वाचा पैलू म्हणजे, विविध राज्यांतील पोलिसांशी साधलेला समन्वय. ईशान्य भारतातील सीमावर्ती भाग, विशेषतः त्रिपुरा आणि मिझोराममार्गे होणारी दरोडेखोरांची ये-जा, तसेच ओडिशामधील संपर्काचा बारकाईने अभ्यास करून पोलिसांनी गुन्हेगारांच्या हालचाली समजून घेतल्या. त्यामुळे एका गुन्ह्याचा माग काढताना संपूर्ण जाळेच भेदता आले.

तपासादरम्यान उघड झालेली ‘एजंट’ प्रणाली ही अधिक चिंताजनक आहे. सीमावर्ती भागांतून गुन्हेगारांना पळून जाण्यास मदत करणारे घटक सक्रिय असल्यानेच पुढे नको ते घडते. सीमा सुरक्षेतील त्रुटी व स्थानिक पातळीवरील संगनमतावर पुन्‍हा प्रकाश पडला आहे, ज्याकडे केंद्र सरकारला गांभीर्याने पाहावे लागेल. सीमा सुरक्षा मजबूत करण्यासोबत राज्यांमधील माहितीची देवाणघेवाण प्रभावी करावी लागेल.

सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीचे लोण गोव्यातही पसरले आहे. जे दरोडेखोर पकडले गेले आहेत त्यांना गोव्यात कोणी मदत केली होती, याचा तपास लागेल तेव्हाच या मोहिमेला पूर्णविराम मिळेल. स्थानिकांच्या सहकार्याशिवाय धाडसी दरोडे निव्वळ अशक्य आहेत.

उपरोक्त यशस्वी कारवाईकडे पाहताना दुसरी बाजूही नजरेआड करता येणार नाही. गोवा पोलिसांनी बऱ्याच प्रकणांमध्ये कर्तव्यकसुरी केली आहे. तशी टीकाही वारंवार झाली आहे. पण अधिकाऱ्यांना योग्य त्या प्रमाणात मुक्त हस्त, निर्णयस्वातंत्र्य दिल्यास तपासाची गती व गुणवत्ता दोन्ही वाढू शकते. अनुभव, स्थानिक माहिती, तांत्रिक कौशल्याचा योग्य संगम साधल्‍यास गुंतागुंतीचे गुन्हे उकलणे अशक्य नाही, हे दत्तगुरू सावंत, तुषार लोटलीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवून दिलेय.

पोलिस दलातील जुन्या व अनुभवी अधिकाऱ्यांची वैशिष्ट्ये ओळखून त्यांचा योग्य ठिकाणी वापर करणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक अधिकाऱ्याची कार्यपद्धती, अनुभव वेगळा असतो. त्यानुसार जबाबदाऱ्या दिल्यास संपूर्ण यंत्रणेची कार्यक्षमता वाढू शकते. भविष्यात अशा गोष्टी घडू नयेत म्हणून आंतरराज्यीय, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांची कार्यशैली यांचा अभ्यास करणे व त्यांची ढाल बनणारे गोव्यातील ‘स्लीपर सेल’ यांचा काटेकोर व कुठलीही भीड न बाळगता तर्ककठोर शोध घेणे या दोन गोष्टी युद्धपातळीवर कराव्या लागतील. केवळ दरोडे किंवा दरोड्यास साहाय्य एवढ्यापुरतेच यांना मर्यादित ठेवणे स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारणे ठरेल.

हा विषय केवळ गुन्हेगारीएवढाच सीमित नाही; हा भविष्यात गोमंतकीयांच्या व गोव्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा विषय आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे परवडणार नाही. वाटल्यास त्यासाठी पोलिस दलात वेगळी टीम नियुक्त करावी लागली तरी हरकत नाही, एवढे या विषयाचे गांभीर्य आहे. कुठून कुठे सहज जाता येते, सुरक्षा यंत्रणेत कुठे कमतरता आहे याची ‘लिटमस टेस्ट’ म्हणजे हे लहानसहान दरोडे आहेत.

पोलिस, प्रशासकीय यंत्रणा, लोकांच्या प्रतिक्रिया, सामाजिक तरंग यांचा अभ्यास यातून केला जातो. म्हणूनच हे दिसते तेवढे साधे सोपे नाही. गोव्याला, देशाला बाहेरील शत्रूंचा तेवढा धोका नाही, जेवढा आत राहून मदत करणाऱ्यांचा आहे, हे ध्यानात ठेवणे संयुक्तिक ठरेल!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cutbona Jetty: कुटबण जेटीवर अस्वच्छतेचे साम्राज्य! आरोग्य खात्याच्या पाहणीत अनेक त्रुटी उघड; पाणीपुरवठ्या अभावी कामगारांचे हाल

म्हापसा नालेसफाईचा केवळ फार्स? पावसाळ्यापूर्वी प्रशासनाचा चालढकलपणा; नाल्यातील गाळ काठावरच ठेवल्यानं 'टुगेदर फॉर म्हापसा' संघटनेचा संताप

Goa Assembly Elections 2027: सासष्टीचा 'तो' बालेकिल्ला काँग्रेस पुन्हा जिंकणार? 2027 कडे सर्वांचे लक्ष; नुवे, बाणावली, कुडतरी आणि वेळ्ळी मतदारसंघांत पुन्हा एकदा चुरशीची लढत

Shocking News: रागाचा झटका बेतला जिवावर! स्वतःचा प्रायव्हेट पार्ट कापून देवाला केला अर्पण; बायकोसोबतच्या वादातून 25 वर्षीय तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

Goa Human Trafficking: हरमल वेश्याव्यवसाय प्रकरणात दोन संशयितांना जामीन, ठोस पुराव्यांचा अभाव; पीडित महिलांनी साक्ष देण्यास दिला नकार

SCROLL FOR NEXT