Goa coconut farming Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Coconut in Goa: गोमंतकीयांना कर्नाटक, केरळमधून आयात केलेल्या नारळावर अवलंबून राहावे लागावे हे दुर्दैव..

Goa Coconut Trees: नारळ हा गोमंतकीयांच्या अन्नातील प्रमुख घटक आहे. नारळाशिवाय गोमंतकीय जेवण करताच येणार नाही. त्याशिवाय नारळाला गोव्याच्या सांस्कृतिक जीवनात विशिष्ट स्थान आहे.

Sameer Panditrao

नारळ हा गोमंतकीयांच्या अन्नातील प्रमुख घटक आहे. नारळाशिवाय गोमंतकीय जेवण करताच येणार नाही. त्याशिवाय नारळाला गोव्याच्या सांस्कृतिक जीवनात विशिष्ट स्थान आहे. देवापुढे नारळ ठेवला जातो. श्रावणात ग्रामदेवाला पाच नारळांची पंचकाताय दिली जाते. नारळांची पद्धत बंद झाल्यावर विजयरथापुढे शेंदूर लावलेला नारळ फोडायची चाल सुरू झाली.

सुवासिनींची ओटी नारळाने भरली जाते. नारळ हे सुफलीकरणाचे प्रतीक मानले जाते. कोकणीत ‘नाल्ल फोडलो’ असे म्हणत नाहीत तर ‘नाल्ल वाडवलो’ असे म्हणतात. आमच्या घराच्या देवखोलीत तांबड्या कापडात गुंडाळलेला पुरातन नारळ जतन करून ठेवला आहे. माड हा कल्पवृक्ष आहे.

माड, नारळ, शहाळी, चुडते, कट्ट्यो, सोण्णे, वाशे, खोबरे, खोबरेल तेल देतो. गोव्यात नारळाचे उत्पादन वर्षोनुवर्षे उतरत चालले आहे. आपल्याला कर्नाटक, केरळमधून आयात केलेल्या नारळावर अवलंबून राहावे लागावे हे आपले दुर्दैव आहे.

गोवा सरकारचे नारळाच्या उत्पादनाकडे लक्ष नाही. मजुरीचे दर वाढले आहेत. सेंद्रीय व असेंद्रीय खते महाग झाली आहेत. माकड, खेतीं, खारी ह्यासारख्या जंगली जनावरांमुळे नारळांचे उत्पादन किमान ३० टक्के कमी झाले असावे.

सरकारने जंगली जनावरांसाठी रानांत फळे, झाडे व बफर क्रॉप्स लावली पाहिजेत. शेतीचा विध्वंस करणाऱ्या जंगली जनावरांची कत्तल करण्याची मर्यादित परवानगी दिली जाते असे माधव गाडगीळांसारख्या पर्यावरणतज्ज्ञाचे मत आहे.

जंगली श्वापदांना घाबरवण्यासाठी नारळाच्या फळबागेत सर्चलाईट्स, रिकॉर्डेड कॅसेट्स, सुयोग्य कुंपण घालण्यासाठी कृषी खात्याने सबसिडी दिली पाहिजे. सरकारने नारळाला योग्य हमीभाव, आधारभूत किंमत देणे गरजेचे आहे. लहान बागायतदारांना सबसिडी मंजूर करून घेणे कठीण जाते.

गोवा सरकारने हमरस्त्यावर व शहरांतील मोक्याच्या जागी नारळ, शहाळी, आंबा, अननस, फणस, कोकम, रानमेवा विकण्यासाठी तात्पुरते गाडे उभारून फळगाडेवाल्यांना द्यावेत. त्यामुळे नारळांना व अन्य फळांना किरकोळ भाव मिळेल.

इंडस्ट्रिलयल इस्टेटच्या धर्तीवर नारळ, सुपारी, आंबा, काजू ह्यांच्या अ‍ॅग्रिकल्चरल इस्टेट्स असाव्यात अशी सूचना मी काही वर्षांपूर्वी केली होती. ही सूचना अमलात आणावी. नारळापासून खोबरेल, व्हर्जिन ऑईल, डेसिकेटेट कोकोनट हे मूल्यवर्धित पदार्थ बनवण्यासाठी अन्नप्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन द्यावे.

माडाची दुर्दशा अशीच चालू राहिली तर भविष्यकाळात नारळांसाठी माड लावले जाणार नाहीत तर केवळ शोभेसाठी माड लावले जातील!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashok Saraf: अभिनयाची जादू आजही कायम! अशोक सराफांनी पुन्हा करुन दाखवला 'प्रोफेसर धोंड'चा सीन; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

Goa Crime: तब्बल दोन वर्षांनी होणार 'त्या' महिलेवर मडगावात अंत्यसंस्कार; पोलीस बंदोबस्तात अंतिम विधी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT