Coconut in Goa: गणेशोत्सवापूर्वी सरकारची मोठी खरेदी! कर्नाटककडून विकत घेणार 1 लाख नारळ; फिरत्या वाहनातून करणार वाटप
पणजी: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढणारी मागणी आणि बाजारात अस्थिर झालेल्या दरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी गोवा सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेजारील कर्नाटक राज्यातून तब्बल एक लाख नारळांची खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याने राज्यातील नारळाचा तुटवडा दूर होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
सबसिडी दरात विक्री होणार
राज्यातील कृषी मंत्री रवी नाईक यांच्या निर्देशानुसार, कृषी विभाग आणि गोवा राज्य फलोत्पादन महामंडळ (Goa State Horticulture Corporation) यांनी इतर राज्यांमधून नारळ खरेदी करण्याची योजना आखली आहे.
या योजनेनुसार, हे नारळ उत्सवाच्या काळात ना नफा ना तोटा तत्त्वावर ग्राहकांना उपलब्ध करून दिले जातील. हे नारळ गोवा हॉर्टीकल्चरच्या दुकानांमधून आणि फिरत्या वाहनांद्वारे संपूर्ण गोव्यात सबसिडी दरात विकले जातील.
पहिल्या टप्प्यात २५ हजार नारळ दाखल होणार
गणेशोत्सवाच्या आधी नारळाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी ही प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात येत्या दोन दिवसांत २५ हजार नारळ कर्नाटकातून गोव्यात दाखल होतील. यामुळे बाप्पाच्या आगमनासाठी तयारी करणाऱ्या भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे बाजारातील किमती स्थिर राहण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

