Ashok Dange Book Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

देश परदेशातील माणसं, संस्कृती अन् रंजक अनुभव! अशोक डांगे यांच्या पुस्तकाची अनोखी सफर

Ashok Dange Book: केंद्राच्या कामानिमित्ताने श्री. डांगे यांनी जपान, स्वीडन, पोर्तुगाल, कॅनडा, अमेरिका अशा अनेक देशातील शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या.

गोमंतक ऑनलाईन टीम

गिरिजा मुरगोडी

ही चित्रणे फक्त त्या व्यक्ती किंवा केंद्राचे काम यापुरती मर्यादित न राहता त्या त्या देशाच्या चालीरिती, त्यांच्या राहण्या-वागण्याची, विचार करण्याची पध्दत, आहार विहार, संस्कृती, कार्यपध्दती या सर्वांतून उलगडत जाते. तसेच महाविद्यालयाच्या अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांबद्दल फार रोचक माहिती मिळते.

मला भेटलेली परदेशी माणसं’ हे अशोक डांगे यांचे वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिचित्रणाचे पुस्तक. श्री. डांगे हे मडगाव येथील चौगुले महाविद्यालयातील ‘स्टुडंट सपोर्ट सर्व्हिस सेंटर’ मध्ये संयोजकपदावर अनेक वर्ष कार्यरत होते. त्या केंद्राद्वारे रायटिंग सेंटर, परदेशी भाषा शिक्षण, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी देवाण घेवाण कार्यक्रम असे अनेक प्रकल्प राबवले जातात. केंद्राच्या कामानिमित्ताने श्री. डांगे यांनी जपान, स्वीडन, पोर्तुगाल, कॅनडा, अमेरिका अशा अनेक देशातील शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या.

त्या त्या देशातील विविध पदाधिकाऱ्यांना भेटण्याची, त्यांची कार्यपद्धती समजून घेण्याची, चौगुले महाविद्यालयात आमंत्रित करून विद्यार्थी व शिक्षकांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याची संधी त्यांना मिळाली. त्यापैकी, प्रभावित करणाऱ्या काही व्यक्तींबद्दल लिहावे, असे त्यांच्या मनात आले. परदेशी प्रवासवर्णने आपल्या वाचनात येतात, पण अशा प्रकारचे लेखन फारसे वाचनात येत नाही. त्यामुळेच हे पुस्तक वेगळे ठरते.

उत्तम निरीक्षणशक्ती, अगदी मोजक्या शब्दात आणि नेमकेपणाने प्रत्येक व्यक्ती, त्यांची स्वभाव - वैशिष्ट्ये, कार्यपद्धती, त्यांच्या सोबतचे अनुभव साध्या शब्दांत सहजपणे मांडणे ही लेखकाची वैशिष्ट्ये प्रत्येक लेख वाचताना प्रत्‍ययाला येतात. फार तर ५ फूट उंची असलेली मेरी लीसचा चेहरा खूपच गोंडस व गोड होता. बोलणे मृदू, चेहऱ्यावर स्मित हास्य. एकंदर पाहिल्याबरोबर ती विश्‍वासू वाटे.

‘लाघवी, धडपड्या, काही नवीन करण्यासाठी कायम उत्सुक असणारा लोभस व्यक्तिमत्वाचा टॉनी मॅकरिक..’ सहा फूट उंची, भारदस्त आवाज, अत्यंत हसतमुख चेहरा, सकारात्मक ऊर्जा असणारे प्रा. टॉम गॅली’ अशा मोजक्या शब्दांत श्री डांगे त्या त्या व्यक्तीचं चित्र आपल्या समोर साकारतात. कॅनडामधील नीपीसींग विद्यापीठामधील रायटिंग सेंटरच्या सर्वेसर्वा असलेल्या, प्रेमाने ‘व्याकरण आज्जी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारदस्त जॉर्जिया लायन्स यांचे सखोल ज्ञान, अनुभव, याबरोबरच कॅनडामधील त्यांच्या दिनचर्येबद्दल वाचणे; विशेषतः २०० एकराच्या खुल्या रानजमिनीच्या इस्टेटवर तिचे एकटे राहाणे, त्या आवारात चरायला रेनडियर मूस, कोल्हे, ससे इत्यादींचे येणे हे सर्व फार रोचक आहे.

जपानच्या हिरोयुकी यांनी तेथील ऑइस्टर फेस्टिवलमध्ये चौगुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सामावून घेत जी संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल वाचताना जाणवते की, अशा उपक्रमांमधून विद्यार्थी किती गोष्टी शिकू शकतात! रॉबर्ट विटमर यांची पत्नी व मित्र गोव्याला आल्यावेळच्या जेवणाच्या गंमती फार मजेदार आहेत. पोर्तुगालच्या जिल्डा मचाडोचा सहजपणा जिज्ञासा, कार्यक्षमता याबद्दल वाचताना छान वाटतेच, पण लेखकाने मजेदार मिश्किल शैलीत वर्णिलेला तिच्या घरातील ‘पाल हत्येचा’ धमाल किस्सा म्हणजे ‘अरे देवा!’ म्हणून कपाळाला हात लावावा असाच.

जपानमधील अधिवेशनात भेटलेल्या आणि नंतर कुटुंबाच्या घनिष्ठ स्नेही झालेल्या प्राध्यापिका सावरी सादोशिमा यांच्या प्रथम भेटीचा मनोरंजक किस्सा सांगत सुरू झालेला लेख खूप रोचक वाचनीय झाला आहे. तर स्वीडन येथील स्टेफानच्या घराचे व भवतालाचे लेखकाने केलेले चित्रदर्शी वर्णन वाचताना गुंगून जायला होते! पुस्तकातील रंगीत छायाचित्रे या व्यक्तिचित्रांना उठाव आणतात.

ही चित्रणे फक्त त्या व्यक्ती किंवा केंद्राचे काम यापुरती मर्यादित न राहता त्या त्या देशाच्या चालीरिती, त्यांच्या वर्तन, आहार विहार, संस्कृती, कार्यपध्दती या सर्वांतून उलगडत जाते. तसेच महाविद्यालयाच्या अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांबद्दल फार रोचक माहिती मिळते. या चित्रणांना असे अनेक आयाम लाभलेले आहेत. काही तपशीलांमध्ये थोडी पुनरावृत्ती जाणवते. मात्र, लेखकाने स्वतःच म्हटल्याप्रमाणे, ही केंद्राच्या कामानिमित्ताने भेटलेली माणसे असल्यामुळे हे होणे अपरिहार्यच होय. मात्र, व्यक्तीचित्रणे मनोज्ञ असून वाचनानंद देणारे हे पुस्तक आहे!.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Football League: शेवटच्या मिनिटाला एफसी गोवाचा गोल! स्पोर्टिंग क्लब दिल्लीविरुद्ध थरारक 1-1 बरोबरी

E-Sakal: 'ई-सकाळ'चे निर्विवाद वर्चस्व! 55 मिलियन वाचकांसह पुन्हा ठरले नंबर 1

Ranji Trophy: रणजी करंडकात गोव्यावर पराभवाचे संकट; विदर्भाची 222 धावांची आघाडी, डावाने पराभव टाळण्याचे आव्हान

Cyber Attack: Apple यूजर्स सावधान! iPhone, iPad आणि MacBook वर सायबर हल्ल्याचा धोका; हॅकर्सपासून वाचण्यासाठी तातडीने करा 'हे' काम

Fake Traffic Challan Scam: बनावट वाहतूक चलनातून ऑनलाइन फसवणूक; तामिळनाडूतून संशयिताला अटक

SCROLL FOR NEXT