सर्वेश बोरकर
राजा कृष्णदेवराय यांनी १५२४ मध्ये पुत्र युवराज तिरुमला राय यांच्या मृत्युनंतर, उत्तराधिकारी म्हणून धाकटा सावत्र भाऊ अच्युतदेवराय यांची निवड केली आणि १५२६ पासून अच्युतदेवरायला त्यांच्या वतीने राज्य करण्याची परवानगी दिली गेली.
विजयनगर साम्राज्य आणि विजापूरच्या सल्तनत यांच्यात १५२० मध्ये प्रसिद्ध रायचूरची लढाई झाली. या लढाईमुळे विजयनगरच्या सैन्याला निर्णायक विजय मिळाला आणि विजापूरच्या सल्तनतचा पराभव झाला. त्यांना कृष्णा नदी ओलांडून पुढे ढकलण्यात आले.विजयनगर राजा कृष्णदेवरायांच्या लिहून ठेवलेल्या श्लोकाप्रमाणे देशातील लोक जनतेची प्रगती आणि समृद्धी शोधणाऱ्या राजाचे कल्याण इच्छितात, भारताच्या इतिहासात, विजयनगर साम्राज्याचे योगदान अतुलनीय. १३२३ मध्ये दख्खनच्या इतर भागांसह रायचूरचा किल्ला दिल्ली सल्तनतचा मुहम्मद बिन तुघलकने ताब्यात घेतला व थोड्याच वर्षांत म्हणजे १३४७ मध्ये बहामनी सल्तनतीच्या ताब्यात हा किल्ला आला.
विजयनगर राजा सालुवा नरसिंह देवरायाने बहमनींकडून रायचूर शहर परत मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी झाला. रायचूरच्या प्रसिद्ध लढाईची तात्काळ सुरुवात १५२० मध्ये झाली. विजयनगर सम्राट कृष्णदेवरायाने त्याच्या सेवेत असलेल्या मुस्लिम सय्यद मराईकरला घोडे खरेदी करण्यासाठी मोठ्या रकमेसह गोव्याला पाठवले. मराईकरने सम्राट कृष्णदेवरायांचा विश्वासघात केला आणि पैसे घेऊन आदिल खानकडे गेला आणि त्याला सेवा देऊ केली. मराईकरला पैशांसह परत करण्याची सम्राट कृष्णदेवरायाची मागणी योग्यरित्या नाकारण्यात आली.
शांततेच्या काळात सम्राट कृष्णदेवरायाने रायचूरवर मोठ्या हल्ल्याची व्यापक तयारी केली होती. विजयनगरच्या सैन्याचा मुख्य सेनापती सलुवा तिम्मारुसु होता ज्याला सलुवा तिम्मा असेही म्हणत. दोन्ही सैन्यांनी युद्धाची तयारी केली आणि सज्ज राहून एक रात्र घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी, सम्राट कृष्णदेवरायने आदिल शाहवर हल्ला करण्याचा आदेश दिला, सुरुवातीला विजयनगर सैन्य प्रगती करत होते परंतु त्यांना विजापुरींकडून जोरदार तोफखान्याचा सामना करावा लागला. विजयनगर सैन्य गोंधळात माघारले आणि कृष्णदेवरायाने प्रतिहल्ला करण्यासाठी आपल्या सैन्याची जमवाजमव केली, ज्यामुळे शेवटी शत्रू घाबरला आणि शत्रूने माघार घेतली.
शत्रू माघार घेत असल्याचे पाहून, विजयनगरचा सम्राट कृष्णाच्या सेनापतींनी युद्ध सुरू ठेवण्याची परवानगी मागितली. तथापि, शांततेला प्राधान्य देत, सम्राट कृष्णाच्या सैन्याला माघार घेण्याचा आदेश दिला. विजापुरच्या छावणीवर कब्जा केल्यानंतर, सम्राट कृष्णदेवरायने लुटीतील माल मोजला तर १०० हत्ती, ४०० तोफा, तंबू, घोडे, बैल आणि इतर प्राणी होते. त्याने बंदिवान महिलांना सोडले, मृतांना अंत्यसंस्काराने सन्मानित केल. युद्ध संपल्यानंतर, सम्राट कृष्णदेवराय रायचूरच्या वेढ्यात परतला . शिवाय, क्रिस्टोव्हाओ डी फिगरेडो यांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीज तुकडीचा वापर करून अग्निशस्त्रांचा वापर केल्याने किल्ला जिंकण्यास मदत झाली.
विजापूर सल्तनतकडे उत्कृष्ट अग्नि अस्त्र व तोफयांना असूनही विजयनगर साम्राज्य विजयी झाले.जेव्हा रायचूर शहराने शरणागती पत्करली तेव्हा सम्राट कृष्णदेवरायाने शहरात विजयी प्रवेश केला. सम्राट कृष्णदेवराय रायचूरच्या बिजापुरी सेनापतींशी क्रूरपणे वागला . अनेक बिजापुरी सेनापतींनी त्यांच्या जमिनी गमावल्या. त्यांनी जाहीर केले की जर आदिल शाह त्यांच्याकडे आला, त्यांना शरण गेला आणि त्यांचे पायचे चुंबन घेतले तर त्यांच्या जमिनी त्यांना परत मिळतील.
राजा कृष्णदेवरायांच्या विजयी कारकिर्दीत ते शिखरावर पोहोचले होते. तथापि, त्यांच्या नंतर विजयनगरच्या इतिहासाकडे दुर्लक्ष केले गेले आणि उत्तराधिकाऱ्यांना कमकुवत आणि अक्षम म्हटलं गेले. पण इतिहासातील पुरावे सागतात की राजा कृष्णदेवरायांच्या नंतर असेच एक योग्य उत्तराधिकारी राजा अच्युतदेव राय होउन गेले होते. राजा कृष्णदेवरायांनंतर, जर असा कोणी राजा असेल ज्याने साम्राज्याचे वैभव जपले असेल आणि त्याच्या शत्रूंमध्ये भीती निर्माण केली असेल तर तो अच्युतदेवराय होता. तो एक चांगला प्रशासक आणि कलांचा संरक्षक देखील होता. अच्युतदेवरायचा जन्म नरस नायक आणि ओबांबिका यांच्या पोटी झाला.
तो राजा कृष्णदेवरायाचा धाकटा सावत्र भाऊ. अच्युतदेवरायची तारीख आणि जन्मवर्ष याबद्दल कोणताही विशिष्ट उल्लेख नाही. बालपणी त्याला राजकारण, धर्मशास्त्र आणि सर्व प्रकारच्या शारीरिक प्रशिक्षणाचे आवश्यक शिक्षण देण्यात आले. अच्युतदेवराय किशोरावस्थेत असताना त्यांचे वडील नरस नायकचा मृत्यू झाला. अच्युतदेवरायने त्याचा मोठा सावत्र भाऊ वीर नरसिंहाच्या अनेक लष्करी साहसांमध्ये आणि नंतर कृष्ण देवरायाच्या विजयांमध्ये त्यांना मदत केली होती. राजा कृष्णदेवराय यांनी १५२४ मध्ये त्यांचा पुत्र युवराज तिरुमला राय यांच्या मृत्युनंतर, उत्तराधिकारी म्हणून धाकटा सावत्र भाऊ अच्युतदेवराय यांची निवड केली. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी १५२६ पासून अच्युतदेवरायला त्यांच्या वतीने राज्य करण्याची परवानगी दिली होती.
पेनुकोंडा कैफियत आणि काही शिलालेख यांसारख्या समकालीन स्त्रोतांमध्ये १५२६ पासून अच्युतदेवरायच्या सह-शासनाचा उल्लेख सापडतात. त्यांच्या मागील कामगिरी आणि क्षमतांमुळे अच्युतदेवराय बदल राजा कृष्णदेवरायला पूर्ण विश्वास होता.१५२९ मध्ये राजा कृष्णदेवराय यांचे निधन झाले. त्यावेळी अच्युत राय तेलुगू देशात होते. ही बातमी ऐकून ते हंपीकडे आले. ते प्रथम तिरुपती येथे कुलदेवतेचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले जिथे त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर कालहस्ती येथे जाऊन त्यांचा पुन्हा राज्याभिषेक झाला. अखेर ते नोव्हेंबर १५२९ मध्ये विजयनगर येथे पोहोचले जिथे त्यांनी त्यांचा राज्याभिषेक मोठ्या थाटामाटात आणि भव्यतेने साजरा केला.राजघराण्यातील मतभेद टाळण्यासाठी त्यांनी कृष्णदेवरायांचे जावई रामराय यांच्याशी करार केला ज्याद्वारे रामराय साम्राज्याच्या प्रशासनात त्यांचे भागीदार होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.