Siddharth Jadhav Dainik Gomantak
मनरिजवण

Siddharth Jadhav: 'गोव्यात येणे, गोवेकरांशी संवाद साधणे आनंददायी'! सिद्धार्थ जाधवने व्यक्त केल्या भावना; नव्या सिनेमाची दिली माहिती

Goa Marathi Film Festival: गोवा मराठी चित्रपट महोत्सवात सिद्धार्थ जाधव म्‍हणाले, गोमंतकीय लोक मराठी नाटक आणि चित्रपटांवर अतिशय प्रेम करणारे असल्याने गोव्यात येणे, गोवेकरांशी संवाद साधणे मला सदाच आनंददायी वाटते.

Sameer Panditrao

पणजी: नाटकांचे प्रयोग, शूटिंग आणि इफ्फीसाठी गोव्‍यात वरचेवर येणे होत असते. येथे असलो तरी मी माझ्या राज्याबाहेर आलोय असे वाटतच नाही. गोमंतकीय रसिक, प्रेक्षकांचे मला सदोदित प्रेम मिळते, अशी भावना प्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ जाधव यांनी व्यक्त केली.

गोवा मराठी चित्रपट महोत्सवात संवाद साधला असता सिद्धार्थ जाधव बोलत होते. ते म्‍हणाले, गोमंतकीय लोक मराठी नाटक आणि चित्रपटांवर अतिशय प्रेम करणारे असल्याने गोव्यात येणे, गोवेकरांशी संवाद साधणे मला सदाच आनंददायी वाटते.

लवकरच येतोय ‘आतली बातमी फुटली’

‘आतली बातमी फुटली’ हा माझा नवा सिनेमा लवकरच येत आहे. या चित्रपटाच्या प्रीमियर या महोत्सवात प्रदर्शित झालाय. रसिकांचे मनोरंजन करणारा हा चित्रपट आहे. १९ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत असून त्‍यात माझ्‍यासह डॉ. मोहन आगाशे, रोहिणी हट्टंगडी, त्रिशा ठोसर, प्रीतम कांगणे यांच्‍या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल गांधी आणि जैनेश इजरदार यांनी केले आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम प्रीमियरसाठी गोव्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले.

‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे आणि रोहिणी हट्टंगडी यांच्यासोबतच अभिनय करण्याची संधी मिळाली. त्यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत एका फ्रेममध्ये दिसणे हीच मोठी व स्वप्नवत घटना आहे.

- सिद्धार्थ जाधव, अभिनेता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तरुणांना लाजवेल अशी जिद्द! कोकणातल्या 68 वर्षांच्या आजीचा झाडावर चढतानाचा व्हिडिओ व्हायरल

Cricketer Retirement: क्रिडाविश्वात खळबळ, 'या' स्टार खेळाडूने अचानक निवृत्तीची केली घोषणा; 14 वर्षांच्या कारकिर्दीला ब्रेक

Kshatriya History: पौराणिक यदु, क्षत्रिय वंश; राजे बनलेले मेंढपाळ

Horoscope: 10 ऑगस्टपासून 'ग्रहण योग' सुरू; 'या' तीन राशींच्या अडचणी वाढणार

Goa Opinion: गोव्यात रिकामी जमीन दिसताच, त्यावर कब्जा करून तेथे नवीन इमले बांधण्याची स्पर्धाच सुरू आहे..

SCROLL FOR NEXT