Viral Video: तरुणांना लाजवेल अशी जिद्द! कोकणातल्या 68 वर्षांच्या आजीचा झाडावर चढतानाचा व्हिडिओ व्हायरल

Konkan viral video: कोकणातील एका 68 वर्षीय आजीचा झाडावर चढतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Konkan viral video
Konkan viral videoDainik Gomantak
Published on
Updated on

कोकणातील एका 68 वर्षीय आजीचा झाडावर चढतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. वयाची साठीतली पायरी पार केल्यानंतरही त्यांच्या चपळाईला आणि ताकदीला तरुणही दाद देत आहेत. वय फक्त एक आकडा आहे, हे सिद्ध करणारा हा व्हिडिओ अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

हा व्हिडिओ कोकणातील एका गावात चित्रित करण्यात आला असून, त्यात आजी अगदी सहजतेने उंच झाडावर चढताना दिसतात. अंगावर साधा पोशाख, पण चेहऱ्यावर उत्साह आणि डोळ्यांत आत्मविश्वास या सगळ्यामुळे व्हिडिओ अधिकच प्रभावी झाला आहे. झाडावर चढण्याची त्यांची गती आणि तंत्र पाहून तरुणांनाही थक्क व्हावे लागले. Kiran Dhadave या फेसबूक खात्यावर व्हिडिओ शेअर करण्यात आलाय.

Konkan viral video
Goa Athletics: साक्षी, राणी, निकेतचा ‘डबल’ धमाका! राज्य ॲथलेटिकमध्ये पुरुषांत मोझेस, अनंतकृष्णन यांच्यात चढाओढ

कोकणात लहानपणापासून शेतीकाम, बागायती आणि घरगुती कामांमध्ये हातभार लावताना मिळालेला अनुभव आणि अंगातील ताकद यामुळे आजी अजूनही एवढी सक्रिय असल्याचे स्थानिक सांगतात.

Konkan viral video
Goa Athletics: साक्षी, राणी, निकेतचा ‘डबल’ धमाका! राज्य ॲथलेटिकमध्ये पुरुषांत मोझेस, अनंतकृष्णन यांच्यात चढाओढ

सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहणारे लोक आजीच्या जिद्दीचं कौतुक करत आहेत. “आजच्या तरुणांना हे पाहून लाज वाटली पाहिजे,” “हीच खरी फिटनेसची व्याख्या आहे,” अशा कमेंट्स मोठ्या प्रमाणात येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com