पणजी: शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या प्रमुख भूमिक असलेल्या कल्ट क्लासिक चित्रपट करण अर्जुन पुन्हा रिलीज झाला आहे.1995 साली आलेल्या या चित्रपटाने त्यावर्षी इतर सर्व चित्रपटांपेक्षा जास्त व्यवसाय केला. आता पुन्हा 22 नोव्हेंबरला थिएटरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबाबत या चित्रपटात प्रमुख भूमिका केलेल्या राखी गुलजार यांनी प्रश्न विचारण्यात आला तर त्यांनी थेट हातच जोडले.
गोव्यात सुरु असलेल्या ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राखी गुलजार यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांना करण अर्जुन पुन्हा रिलीज झाल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. दरम्यान, यावरुन त्यांनी थेट हातच जोडले आणि आता जे झालं ते झालं, हा चित्रपट लहान मुलांना आवडेल, अशी प्रतिक्रिया दिली.
सलमान खानने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर या चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. “राखीजीनी अगदी बरोबर म्हटले होते की मेरे करण अर्जुन आएंगे, येत्या 22 नोव्हेंबरला जगभरातील थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित होत आहे!”, असे सलमान या पोस्टला कॅप्शन दिले होते.
करण अर्जुन हा शाहरुख खान आणि सलमान खान अभिनीत 1995 चा ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा पुनर्जन्म आणि बदला याभोवती फिरते, कौटुंबिक कलहामुळे दोन भावांचा मृत्यू होतो.
यानंतर त्यांची आई आपल्या मुलांच्या परत येण्यासाठी माता कालीची प्रार्थना करते. आणि 17 वर्षांनंतर, आई काली त्यांची प्रार्थना स्वीकारते आणि तिची दोन्ही मुले करण आणि अर्जुन न्यायासाठी पुन्हा एकत्र येतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.