Ranveer Singh vs Rishab Shetty Dainik Gomantak
मनरिजवण

Ranveer Singh: 'ती' नक्कल पडली महागात! अभिनेता रणवीर सिंगवर गोव्यात गुन्हा दाखल; सार्वजनिक माफीची मागणी

Ranveer Singh Kantara Controversy: गोव्यातील ५६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सोहळ्यात त्याने केलेल्या एका कृतीमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

Akshata Chhatre

Ranveer Singh IFFI controversy: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याच्या अडचणीत वाढ झाली आहे. गोव्यातील ५६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) सोहळ्यात त्याने केलेल्या एका कृतीमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला असून, हिंदु जनजागृती समितीने त्याच्याविरोधात पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, रणवीर सिंगने मंचावर कन्नड चित्रपट 'कांतारा – चॅप्टर १' मध्ये दर्शवलेल्या दैवी रूपाची नक्कल केली. यावेळी त्याने चामुंडी दैव या देवतेला 'फीमेल घोस्ट' (स्त्री भूत) असे संबोधले, ज्यामुळे धार्मिक भावनांचा अपमान झाल्याचा आरोप समितीने केला आहे.

कोटीतुळू समुदायाच्या भावना दुखावल्या

हिंदु जनजागृती समितीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, रणवीर सिंगच्या या विडंबनात्मक कृतीमुळे कोटीतुळू समुदायाच्या भावना गंभीररित्या दुखावल्या गेल्या आहेत. चामुंडी दैव हे किनारी कर्नाटकात पूजले जाणारे दैवत आहे आणि त्याच्या रूपाचे असे विकृत सादरीकरण आणि टिप्पणी करणे हा या दैवताचा थेट अपमान आहे, असे समितीचे म्हणणे आहे.

पोलिसांना कारवाई करण्याची मागणी

या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन गोवा पोलिसांनी रणवीर सिंगवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिनिधींनी केली आहे. एवढेच नाही, तर त्यांनी IFFI च्या आयोजकांनाही भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी एक कठोर आचारसंहिता लागू करण्याची विनंती केली आहे.

यासोबतच, समितीने अभिनेत्याकडून सार्वजनिक माफीची मागणी केली असून, या प्रकरणाचा योग्य निपटारा होईपर्यंत शांततापूर्ण मार्गाने आंदोलनकरण्याचे आवाहन समर्थकांना केले आहे. त्यामुळे रणवीर सिंगला आता या वादावर तातडीने स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT