Pushpa 2  Dainik Gomantak
मनरिजवण

Pushpa 2 Extended Cut: पुष्पा झुकायचं नाव घेईना!! अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी ट्विस्ट; एक्सटेंडेड कट प्रोमो प्रदर्शित

Pushpa Extra Footage: २० मिनिटांचा एक्सटेंडेड कट १७ जानेवारीपासून चित्रपटासह प्रदर्शित केला जाईल

Akshata Chhatre

Allu arjun pushpa 2 extended cut promo release with extra footage

पुष्पाच्या भरगोस यशानंतर प्रदर्शित झालेला पुष्पा- २ प्रेक्षकांच्या मनात भरला. अल्लू अर्जुन हा हिंदी सिनेमातील एक गाजलेला चेहरा आहे आणि आता पुष्पाच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांसाठी एक खास भेट आणली आहे. या सिनेमाला जोडणारा आणखीन एका क्लिपचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय आणि यामुळे आता नवीन क्लिपमध्ये नेमकं काय दडलेलं आहे अशी उत्सूकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालीये.

बाहुबलीला मागे टाकत पुष्पा-२ने बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड्स मोडून टाकलेत. ग्लोबल बॉक्स ऑफिस पर या चित्रपटाने १८०० कोटी रुपयांचा आकडा पार केलाय तर देशात १२१८ कोटी रुपयांची धमाकेदार कमाई करून दाखवली आहे.

सिनेसृष्टी गाजवल्यानंतर आता निर्माते आणखीन एक ट्विस्ट आणण्याच्या तयारीत असून त्यांनी पुष्पा- २ चा का एक्सटेंडेड कट प्रोमो प्रदर्शित केला आहे. खरंतर निर्मात्यांनी ११ जानेवारी रोजी ही क्लिप प्रदर्शित करण्याची घोषणा केली होती मात्र यात काहीसा विलंब झाला असून आता हा २० मिनिटांचा एक्सटेंडेड कट १७ जानेवारीपासून चित्रपटासह प्रदर्शित केला जाईल.

वाईल्डफायर पुष्पा हा चित्रपट तर धमाकेदार आहेच, मात्र नवीन एक्सटेंडेड कटमध्ये असलेले संवाद देखील जबरदस्त आहेत. या नवीन कटमध्ये प्रमुख अभिनेता अल्लू अर्जुनचे संवाद आणखीन वाढलेत तसेच काही एक्शन सीन्स देखील वाढवण्यात आलेत, काही ठिकाणी फहाद देखील दिसतोय.

तेलगू चित्रपट सृष्टीने केलेली कदाचित हि सर्वात मोठी कमाई असावी. या चित्रपटात अल्लू अर्जुन शिवाय फहाद फासील, रश्मीका मंदाना ही देखील प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रापाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले असून आता नवीन ट्रेलर पुन्हा प्रेक्षकांना खेचून आणेल का हे पाहावं लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

SCROLL FOR NEXT