Pushpa 2: फहादच्या भूमिकेवर मोठा आक्षेप; "शेखावत नाव काढा, नाहीतर घरात घुसून मारू" करणी सेनेचं Tweet Viral

Karni Sena Viral Tweet on Pushpa 2: या चित्रपटामधून फहादच्या भूमिकेचे नाव बदलले नाही तर निर्मात्यांना घरात घुसून मारू अशी भूमिका करणी सेनेचे नेते राज शेखावत यांनी ट्विटरवर मांडली
Karni Sena Viral Tweet on Pushpa 2: या चित्रपटामधून फहादच्या भूमिकेचे नाव बदलले नाही तर निर्मात्यांना घरात घुसून मारू अशी भूमिका करणी सेनेचे नेते राज शेखावत यांनी ट्विटरवर मांडली
Karni Sena Viral Tweet on Pushpa 2Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Karni Sena Viral Tweet on Pushpa 2

अल्लू अर्जुनचा बहुचर्चित चित्रपट देश विदेशात नाव कमावत असतानाच या चित्रपटावर भली मोठी समस्य ओढवू शकते. चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मीका यांच्याशिवाय आणखीन एका अभिनेत्याची चर्चा सुरु आहे,तो म्हणजे फहाद फसील. फहादने या चित्रपटात भवरसिंग शेखावतची भूमिका निभावली असून या भूमिकेला नकारात्मक स्वरूप दिल्याचे आरोप करत करणी सेनेचे कार्यकर्ते संतापले आहेत. या चित्रपटामधून फहादच्या भूमिकेचे नाव बदलले नाही तर निर्मात्यांना घरात घुसून मारूअशी भूमिका करणी सेनेचे नेते राज शेखावत यांनी ट्विटरवर मांडली.

राज शेखावत यांनी ट्विटरवरून भवरसिंग शेखावत या भूमिकेवर थेट निशाणा साधला. या भूमिकेमधून निर्मात्यांनी राजपुतांचा अपमान केला असून समजात त्यांची नकारात्मक भूमिका उभी केली आहे.

Karni Sena Viral Tweet on Pushpa 2: या चित्रपटामधून फहादच्या भूमिकेचे नाव बदलले नाही तर निर्मात्यांना घरात घुसून मारू अशी भूमिका करणी सेनेचे नेते राज शेखावत यांनी ट्विटरवर मांडली
Fahadh Faasil: "पुष्पा या चित्रपटाने मला काहीही दिलेलं नाही!" चित्रपट गाजतोय मात्र फहाद दिसत नाहीये. असं का?

चित्रपटनिर्मितीच्या स्वातंत्र्याखाली चित्रपट निर्माते शेखावत समाजाला बदनाम करत आहेत असा आरोप या समुदायाने केलाय. या चित्रपटात वारंवार वापरला गेलेला शेखावत शब्द निर्मात्यांनी काढून टाकावा नाहीतर घरात घुसून मारू असा इशारा शेखावत समाजाने दिलाय.

पुष्पा एकूण पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळतंय. पुष्पाचा पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या भागावरून कधी पडदा उठणार अशी उत्कंठा लागून राहिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Two Sisters Found Dead in Mokhard
Leopard Cub Under Chair
Goa Name Change Law 1990
Eknath Shinde
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com