Ketan Jadhav Hamlet Dainik Gmantak
मनरिजवण

Hamlet: इटलीत पोचला गोमंतकीय अभिनेता, शेक्सपियरचे 'हॅम्लेट' साकारतोय केतन; थिएटर हाऊसतर्फे प्रयोग केला सादर

Ketan Jadhav Hamlet: पश्चिम बंगालमधील शांतीनिकेतनच्या नाट्यकर्मींनी एकत्र येऊन बनवलेल्या 'थिएटर हाऊस' या संस्थेने शेक्सपियरच्या ‘हॅम्लेट’ या प्रसिद्ध नाटकावर आधारलेला नाट्यप्रयोग सादर केला.

Sameer Panditrao

काणकोण येथील केतन जाधव यांनी या भूमिकेसाठी केवळ मानसिक नव्हे तर शारीरिकरित्याही विशेष तयारी केली होती.‌ केरळमधील प्राचीन मार्शल आर्ट, कलारीपयट्टूचे ते अभ्यासक आहेत. त्यांना या भूमिकेसाठी खास तलवार चालवण्याचे प्रशिक्षणही घ्यावे लागले.‌ 

इटलीतील वेरोना शहरमध्ये 'प्लॅनेट शेक्सपियर महोत्सव' सुरू आहे. या महोत्सवात 18 सप्टेंबर रोजी पश्चिम बंगालमधील शांतीनिकेतनच्या नाट्यकर्मींनी एकत्र येऊन बनवलेल्या 'थिएटर हाऊस' या संस्थेने शेक्सपियरच्या ‘हॅम्लेट’ या प्रसिद्ध नाटकावर आधारलेला नाट्यप्रयोग सादर केला. विशेष म्हणजे या नाट्यप्रयोगात गोमंतकीय अभिनेता केतन जाधव याने शेक्सपियरकृत नाटकातील 'हॅम्लेट' ही बहुचर्चित भूमिका साकारली होती.

'थिएटर हाऊस'ची निर्मिती असलेली ही नाट्यकृती अलेक्झांड्रो ए. यांनी दिग्दर्शित केली आहे.‌ नवी दिल्ली येथील भारत रंग महोत्सव- 2025मध्ये सादर झालेल्या या नाटकाच्या प्रयोगाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. प्लॅनेट शेक्सपियर महोत्सवातील या प्रयोगाद्वारे युरोपियन प्रेक्षकांसमोर शेक्सपियरच्या एका उत्कृष्ट कलाकृतीची महत्त्वाकांक्षी पुनर्रचना सादर झाली. या प्रयोगाच्या अंती प्रेक्षकांनी उभे राहून कलाकारांना टाळ्यांच्या कडकडाटात मानवंदना दिली. 

शांतता, विधी, अनेक भाषांचे मिश्रण यांचा समावेश असलेली हॅम्लेटची ही शोकांतिका समकालिन आणि आशियाई दृष्टिकोनातून सादर करताना शरीर, ध्वनी आणि स्मृति या घटकांची वीण दिग्दर्शकाने छान साधली आहे.‌ माती आणि प्रत्यक्ष पाऊस यातून तयार झालेला रंगमंचीय स्तर या नाटकाच्या प्रयोगासाठी एक दृश्यात्मक मूलभूत वातावरण तयार करतो, ज्यातून स्मशानभूमी, रणांगण आणि तलाव यासारखी स्थळे परिणामकरीत्या प्रेक्षकांसमोर सादर होतात. नाटकातील या धीट आणि वेधक दृश्य योजनेची प्रशंसा इटालियन प्रेक्षकांनीही केली.

या‌ नाट्यप्रयोगासाठी हॅम्लेटच्या कथेचे केलेले रूपांतर आजच्या विखंडित होत जाणाऱ्या जगाच्या व्यापक पार्श्वभूमीकडे आपला निर्देश करते. विश्वासघात, सूड आणि नैतिक पतनाची ही कालातीत कथा समाजात फूट पाडू पाहणाऱ्या भांडवलशाही आणि हिंसक संरचनाविरुद्ध आपला आवाज नोंदवते आणि त्याचवेळी सरहद्द, सत्ता आणि धर्माच्या नावाखाली बळी घेणाऱ्या प्रवृत्तीच्या विरुद्ध उभे राहण्यासाठीही प्रेक्षकांना आवाहन करते.

प्रेम आणि एकतेच्या शक्यतांची पुनर्कल्पना करण्याचे आव्हान हे नाटक प्रेक्षकांना देते. या नाटकात भारतीय तसेच इटालियन कलाकारांचा समावेश होता. एका अर्थाने या बहुभाषिक कलाकारांनी आंतर-सांस्कृतिक भावनेला या प्रयोगाद्वारे मूर्त रूप दिले आहे. 

युद्ध आणि गोंधळाच्या या जगात अंतर सांस्कृतिक रंगमंच ही एकतेची एक आशा आहे.‌ नाटकाची ही गोष्ट आपल्याला सरहद्दीपलीकडे जाण्याची आणि संघर्षाचे स्वरूप समजून घेण्याची संधी देते. नाटकाचे हे रूपांतर विद्रोही आहे. देव, राजमुकुट आणि भांडवलशाही यांच्या नावावर अत्याचारी समूह आपले अस्तित्व कसे राखतो याकडे हे नाटक आपले लक्ष वेधते.‌

- केतन जाधव, अभिनेता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"गोव्यातली गुंडगिरी मुळासकट संपवणार" काणकोणकर हल्ल्यानंतर CM सावंतांचा Action Mode

भारतासोबत युद्ध झाल्यास सौदी पाकिस्तानला मदत करणार का? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफने काय उत्तर दिलं पाहा Video

सात दिवसांत मास्टरमाईंडचे नाव समोर न आल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देणार; मंत्री तवडकरांच्या नावाने व्हायरल होतोय फेक मेसेज

Vagator: 'सगळे पाणी हॉटेल्सना जातेय, आम्हाला काय'? वागातोर ग्रामस्थांची ‘पेयजल’च्या कार्यालयावर धडक; गैरव्यवस्थापन थांबवण्याची मागणी

Goa Live Updates: मंत्री तवडकरांची पुन्हा गावडेंवर टीका

SCROLL FOR NEXT