Tansy Renu Pal costume Dainik Gomantak
मनरिजवण

Melvin Noronha: गोमंतकीय डिझायनरचे यश! मरियन-लक्ष्मीचा आशीर्वाद; टॅन्सी रेणू पालने जिंकले 'राष्ट्रीय वेशभूषे'चे पारितोषिक

Tansy Renu Pal costume: जयपुर येथील झी स्टुडिओमध्ये झालेल्या मिस ग्रँड इंडिया 2025 च्या दिमाखदार समारंभात टॅन्सी रेणू पाल हिने वेशभूषा स्पर्धेत 'राष्ट्रीय वेशभूषा'चे पारितोषिक जिंकले.‌

Sameer Panditrao

जयपुर येथील झी स्टुडिओमध्ये झालेल्या मिस ग्रँड इंडिया 2025 च्या दिमाखदार समारंभात टॅन्सी रेणू पाल हिने वेशभूषा स्पर्धेत 'राष्ट्रीय वेशभूषा'चे पारितोषिक जिंकले.‌ विशेष म्हणजे गोव्याचे वस्त्ररचनाकार मेल्विन नोरोन्हा यांनी तिच्या वेशभूषेची रचना केली होती. 'स्थलांतरित/विदेशी भारतीय कर्मचाऱ्यांना मरियन-लक्ष्मीचा आशीर्वाद' अशी थीम असलेली ही रचना एअर इंडिया 717 क्रॅशमध्ये बळी पडलेल्यांना समर्पित होती. या स्पर्धेत टॅन्सीने उपविजेतेपद पटकावले.

भारताच्या धर्मनिरपेक्षतेचे आणि भारतीय स्त्रियांच्या आंतरिक दैवी सामर्थ्याचे प्रतिनिधित्व करणारा हा पोशाख होता. त्यातील पांढरा हा भारतीय संघर्षांचा,  लाल हा बलिदानाचा आणि सोनेरी हा दैवी पाठबळाचा प्रतिनिधित्व करणारा रंग होता.

या वेशभूषेत समाविष्ट केलेले 'घुबड' हे लक्ष्मीचे वाहन, जगभरातील भारतीय स्थलांतरितांच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करत होते. वेशभूषेतील हे सारे घटक मिस ग्रँड स्पर्धेच्या '5 बी' निकषांची पूर्तता करणारे होते. 

मेल्विनने आपल्या आगळया वेशभूषा कौशल्याने देश-परदेशातील सौंदर्य स्पर्धेत नाव मिळवले आहे. त्याच्या भव्य रचना लक्षवेधक असतात. वस्त्ररचनाकार म्हणून त्याने जगभरातील ललनांबरोबर काम केले आहे. आपल्या विजेतेपदाबद्दल बोलताना टॅन्सी म्हणाली, 'मेल्विन हा या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि उत्कट रचनाकार आहे.

तो काळजीपूर्वक सर्व काही ऐकतो आणि निरीक्षण करतो. मी स्वतःला जितकी जाणते, त्यापेक्षाही तो मला अधिक जाणतो. त्याच्यावर विश्वास ठेवल्याने माझ्यासाठी ही स्पर्धा सहज आणि रोमांचक बनली. त्याने माझ्यात जादुई रूपांतर घडवले. मेल्विन हा माझ्या या स्पर्धेच्या प्रवासातील सर्वोत्तम भाग होता.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा, सूर्याकडे संघाची कमान, 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Goa Live News: गोव्यात ऑरेंज अलर्ट

'ChatGPT'चा सर्वात स्वस्त प्लॅन लाँच, फक्त 'इतक्या' रुपयांत मिळतील अनेक प्रीमियम फीचर्स

Sholay Re Release: ..शेवटी अमिताभ बच्चन यांना जिवंत करण्याचे ठरवले, सलीम- जावेदनी विरोध केला; साधी सूडकथा ते सुपरडुपर हिट फिल्म

Best T20 Batters: टी20 क्रिकेटमधील टॉप 3 फलंदाज कोण? रायडूने निवडले 'हे' 3 खेळाडू, 'किंग' कोहलीला डावललं

SCROLL FOR NEXT