Lampan Best Web Series OTT Dainik Gomantak
मनरिजवण

इफ्फीत मराठीचा डंका, मराठमोठी 'लंपन' ठरली Best Web Series, विक्रांत मेस्सीसह कोणाला कोणता मिळाला पुरस्कार? वाचा

IFFI Goa 2024 Awards: ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक फिलिप नॉयस यांना इफ्फीत सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार प्रदान

Pramod Yadav

IFFI Goa 2024 Awards

बांबोळी: गोव्यात सुरु असलेल्या आठ दिवसीय भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता आज (२८ नोव्हेंबर) पार पडली. सांगता समारंभात विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी इफ्फीत मराठीचा डंका पाहायला मिळाला. मराठी लंपन या वेब सिरिजला ओटीटी वरील उत्कृष्ट वेबसिरिजचा पुरस्कार मिळाला आहे. बांबोळी येथील इनडोअर स्टेडियममध्ये महोत्सवाचा सांगता समारंभ पार पडला.

लंपन या ओटीटी वरील वेबसिरिजला उत्कृष्ट वेबसिरिजचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय ग्रामीण जीवनावर आधारीत या चित्रपटात एक लहान मुलाच्या मानसिक आणि सामाजिक बदलाचे चित्रण करण्यात आले आहे.

ICFT UNESCO Gandhi Medal 2024

क्रॉसिंग या सिनेमाला आयसीएफटी युनेस्को गांधी मेडल पुरस्कार प्रदान करण्यात आला. इस्तानबुलच्या ट्रान्सजेंडर समुदायावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन लेवन अकिन यांनी केले आहे.

अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक सारा फ्रेडलँड यांना फॅमिलियर टच या चित्रपटासाठी पदार्पणातील उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला आहे.

होली काऊ या चित्रपटासाठी लुईस कुरवोसर यांना स्पेशल ज्युरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. होली काऊ हा कॉमेडी ड्रामा फिल्म आहे.

Taxic चित्रपटासाठी वेस्ता मातुलिते आणि लेवा रुपीकाते यांना उत्कृष्टी अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

The New Year That Never Came या चित्रपटासाठी बोगदन मुरेसानू या रोमानियाच्या दिग्दर्शकाला उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Who Do I Belong To या चित्रपटासाठी ट्युनिशियन अभिनेता Adam Bessa याला उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT