Valpoi News : डोंगुर्ली-ठाणे पंचायतीची उत्कृष्ट कामगिरी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

Valpoi News : मानवी समाजात घनकचरा ही आर्थिक विकास, पर्यावरणाचा ऱ्हास आणि आरोग्याच्या समस्या या दृष्टीने गंभीर बाब आहे.
Valpoi
ValpoiDainik Gomantak

Valpoi News :

वाळपई, डोंगुर्ली-ठाणे ग्रामपंचायतीने पर्यावरणाच्या क्षेत्रात (उत्कृष्ट घनकचरा व्यवस्थापन) केलेल्या कामाची दखल घेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने बुधवारी (ता.५) गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने पणजी येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

यावेळी पुरस्कार सोहळ्याला सर्वेश गावकर (पंचायत सचिव), नीलेश परवार (सरपंच), तनया गावकर (उपसरपंच), पंचसदस्य सरिता गावकर, सुरेश आयकर, सुभाष गावडे, अनुष्का गावकर, सोनिया गावकर, विनायक गावस, सुचिता गावकर आदींची उपस्थिती होती.

मानवी समाजात घनकचरा ही आर्थिक विकास, पर्यावरणाचा ऱ्हास आणि आरोग्याच्या समस्या या दृष्टीने गंभीर बाब आहे. त्यामुळे हवा, पाणी व जमीन प्रदूषित होऊन मानवी अधिवासाला धोका निर्माण होत आहे. घनकचऱ्याचे संकलन, साठवण, वाहतूक, प्रक्रिया व विल्हेवाट किंवा पुनर्वापर इ. बाबी घनकचरा व्यवस्थापनात येतात.

Valpoi
Goa Accident: कदंब बस आणि मालवाहू जीप यांच्यात समोरासमोर धडक; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही!

घनकचरा म्हणजे रोजच्या वापरातून उरलेल्या निरुपयोगी वस्तूंचा साठा. अशा प्रकारचा कचरा बाहेर सार्वजनिक ठिकाणी न फेकता, कचरा व्यवस्थापन करून म्हणजे कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण, त्यानुसार त्याचा पुनर्वापर किंवा त्यावर प्रक्रिया करून योग्यरीत्या त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी मांडले.

आज पर्यावरण सुरक्षित राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे. हा पुरस्कार समस्त डोंगुर्ली पंचायत क्षेत्रातील नागिरकांचा असून सर्वांचे अभिनंदन व आभार. पंचायतीला उत्कृष्ट घनकचरा व्यवस्थापनासाठी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. सर्व पंचसदस्याचे तसेच ग्रामपंचायतीचे सचिव यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यामुळे आपणा सर्वांचे अभिनंदन.

- नीलेश परवार, सरपंच, डोंगुर्ली-ठाणे

स्वच्छतेलाच प्राधान्य देणार

डोंगुर्ली-ठाणे पंचायतीचे सरपंच नीलेश परवार म्हणाले की, पंचायतीने उचलेले पाऊल हे खरोखरच कौतुकास्पद असून पंचायत मंडळाच्या सहकार्याने व आमदार डाॅ. दिव्या राणे यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही चांगली कामगिरी करू शकलो. यापुढेही आमच्या पंचायत क्षेत्रात कोणत्याही प्रकारची कचऱ्यासंबंधी समस्या उद्भवणार नाही याची आम्ही काळजी घेणार असून नदी, नाले व आपला परिसर स्वच्छ व साफ ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

आमदार डाॅ. दिव्या राणेंकडून अभिनंदन

आमदार डाॅ. दिव्या राणे म्हणाल्या, ठाणे पंचायतीला घनकचरा व्यवस्थापन केल्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला. त्यासाठी सर्वांचे अभिनंदन. ठाणे पंचायतीने उचललेले पाऊल हे खरोखरच कौतुकास्पद असून आपण पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com