Lokotsava Goa 2025 Dainik Gomantak
मनरिजवण

Lokotsava: दर्या संगमावर 'समृद्धीचे' उधाण! लोककलांच्या वैभवानी सजलेला 'लोकोत्सव'

Lokotsava Goa: महोत्सवातील विविध राज्यांतील वैशिष्ट्यपूर्ण लोककलांचे दर्शन होताना, आपल्या देशातील लोककलांचे वैभव किती समृध्द आहे याची प्रचिती येत राहते.

Sameer Panditrao

पणजी: कला अकादमीच्या दर्या संगमावर सुरू असलेल्या लोकोत्सवात विविध राज्यातील पारंपरिक लोकनृत्य, लोकसंगीत याचा आनंद लुटण्यासाठी रसिकांची गर्दी इतकी उसळलेली असते की बसायला जागा मिळत नसल्याने शेकडो जणांना उभं राहून त्याचा आस्वाद घ्यावा लागतो. महोत्सवातील विविध राज्यांतील वैशिष्ट्यपूर्ण लोककलांचे दर्शन होताना, आपल्या देशातील लोककलांचे वैभव किती समृध्द आहे याची प्रचिती येत राहते.

मणिपूरचे पुंग ढोल चोलोम नृत्य म्हणजे उत्साहाचा खळखळता आविष्कार. पूंग म्हणजेच मणिपुरी ढोल. हा या नृत्यातील आत्मा. यावोशांग (होळी) उत्सवावेळी हे नृत्य सादर केले जाते. त्यातील वैविध्यपूर्ण तालबद्ध रचना ऐकणे हा वेगळा अनुभव असतो. मणिपूरमधील हे नृत्य संकीर्तन परंपरेतील उत्कृष्ट प्रकार मानला जातो.

आसामचे बिहू लोकनृत्य बिहु उत्सवात सादर केले जाते. महिला आणि पुरुष हे नृत्य करतात. स्फूर्तिदायी पदन्यास, चपळ हातांची हालचाल आणि सौंदर्यपूर्ण पेशकश असा शानदार आविष्कार रसिकांवर मोहिनी घालतो. ओडिशामधील गोतिपुआमधील मुलांचे सादरीकरण पहाताना थक्क व्हायला होते. श्री जगन्नाथ व कृष्ण यांचे गुणगान या नृत्यात असते. स्त्री वेषात, एकमेकांच्या खांद्यावर चढून ही मुले कसरतीच्या अंगाने सादरीकरण करतात तेव्हा रसिक त्यात मंत्रमुग्ध होऊन जातात.

भवाई हे  राजस्थानचे लोकनृत्यही श्वास रोखणारे आहे. तोल सावरत डोक्यावर एकावर एक मडकी रचून केलेली दोन कलाकारांची ही नृत्य अदाकारी थक्क करते. असेच राजस्थानचे दुसरे प्रसिद्ध लोकनृत्य म्हणजे कालबेलिया. त्याला सपेरा नृत्य असेही म्हटले जाते. ढोलक व पुंगीच्या संगीतावर काळ्या वेषातील मुली, जलद लयीत सापाप्रमाणे हालचाली करत अदाकारी करतात तेव्हा उत्साह संचारतो. राजस्थानमधील उत्सवात रात्रभर हे नृत्य केले जाते.

पश्चिम बंगालमधील पुरुलिया छाऊ हे लोकशैलीतील नृत्यनाट्य रामायण, महाभारतातील प्रसंगावर बेतलेले आहे. मुखवटे घालून कलाकार रंगमंचावर पूर्ण ऊर्जेने जबरदस्त हालचाली करतात. हरयाणामधील होळी, गणगौर पूजा व तीज या उत्सवात सादर केले जाणारे ‘घुमार’ हे पारंपरिक लोकनृत्य. त्यात जोड्यानी सादरीकरण केले जाते. कर्नाटकातील ढोलू कुनिथा हा ढोल वाद्यावर सादर केला जाणारा प्रकार आहे. कौरकास या शेळीपालक जमातीचे लोककलाकार हे नृत्य सादर करतात. जबरदस्त ढोलवादन आणि गतिमान नृत्य असा आकर्षक संगम त्यात आहे.

गुजरातमधील भिल्ल जमातीतील आदिवासी कलाकार सादर करत असलेले मेवासी नृत्य ढोल, सनई आणि थाली या वाद्यांमधून छान वातावरण निर्मिती करते. या नृत्यात मुली लोदिया, हिरिया, काला व पागेराडी वेष परिधान करतात तर मुलगे पगडी घालतात व अंगावर मोरपिसे परिधान करतात. तिथलेच सिद्धी धमाल हे असेच एक भारूच जिल्ह्यातील आदिवासी जमातीतील नृत्य. आफ्रिकन प्रकारातील या नृत्यात गुरू सिद्धी गोमाचे प्रतिनिधित्व केले जाते.

पारंपरिक वाद्ये व नृत्य करताना डोक्यावर नारळ फोडण्याची क्रिया पाहण्यासारखी असते. उत्तर प्रदेशमधील धेंडिया नृत्य राज्यातील अवध भागाचे प्रतिनिधित्व करते. देशातील महत्त्वाच्या लोकोत्सवात या नृत्याला प्रतिष्ठेचे स्थान असते. आकर्षक रंगीबेरंगी वेषात डोक्यावर मातीच्या घागरी ठेवून तालबद्धतेने केलेले सादरीकरण मनाला वेधून घेते.

याशिवाय या लोकोत्सवात महाराष्ट्रातील पोवाडा व लावणी, गोव्यातील पारंपरिक कुणबी नृत्य, मोरुलो, जागोर, वीरभद्र, घोडेमोडणी, देखणी, तालगडी, धनगर नृत्य, गोफ आदी लोकनृत्य प्रकारही रंगत वाढवतात. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: मँचेस्टरमध्ये यशस्वी जयस्वालचा नवा इतिहास! 50 वर्षांनंतर ओल्ड ट्रॅफर्डवर घडवला 'हा' पराक्रम

Mobile Addiction: स्मार्टफोनमध्ये कॅमेरा आला, 'कोडॅक' नावाची कंपनी धोक्यात आली; मोबाइल नावाचा 'ब्रह्मराक्षस'

Video: 'ढवळीकर झोपले त्यांना जागे करा'; मुख्यमंत्री कुसुमाग्रजांची कविता सादर करताना युरींची मिश्किल टिपण्णी अन् सभागृहात हशा पिकला

Goa Assembly Session: गोव्यात आता रॉटवेलर, पिटबुलला 'नो एन्ट्री'! विधानसभेत विधेयक संमत, बंदीचा मार्ग मोकळा

Goa Assembly Session: 'गोवा दावे मूल्यांकन विधेयक, 2025' विधानसभेत संमत; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT