Lokotsav 2025: गणेशवंदनेने ‘लोकोत्सव’चे उद्‍घाटन! राजस्थानी 'मांगनियार'ने रसिक मंत्रमुग्ध

Lokotsav Goa 2025: गोमंतकीय कलाकारांनी सादर केलेल्या शानदार गणेशवंदनेने उद्‍घाटन सोहळ्याला सुरवात झाली.नंतर विविध राज्यातील कलाकारांच्या रंगारंग कलाविष्काराने व राजस्थान मधील मांगनियार ने रसिकांची मने जिंकली.
Lokotsav Goa 2025
Lokotsav Goa 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

Lokotsav 2025 Updates

पणजी: आपले प्रांत, भाषा, वेश भिन्न असतील परंतु हिंदुस्तानी या नात्याने सर्व लोक कलाकार लोकोत्सवाच्या मंचावर एकत्र येऊन विविध राज्यांतील वैशिष्ट्यपूर्ण लोककलांचे दर्शन घडवत आहेत. आज या लोकोत्सवाची ख्याती देशभर पसरली आहे असे गौरवोदगार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे काढले.

कला अकादमीच्या दर्या संगमावर शुक्रवारी,कला संस्कृती संचालनालय गोवा, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर ने कला अकादमी गोवा, पणजी महानगरपालिका, गोवा क्रीडा प्राधिकरण यांच्या सौजन्याने आयोजित शानदार लोकोत्सव २०२५ चे उद्‍घाटन केल्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते.

व्यासपीठावर सन्माननीय पाहुणे राज्य सभा खासदार सदानंद तानावडे, कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे , भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे मुख्य अभियंता साळवी, पंचामृतचे जम्बु होसमनी, कला संस्कृती संचालनालयाचे संचालक सगुण वेळीप, उपसंचालक दिनेश पवार व मिलिंद माटे उपस्थित होते.

पारंपरिक माले प्रज्वलित करून २४ व्या लोकोत्सव २०२५ चे उद्घाटन करण्यात आले. खासदार सदानंद तानावडे यांनी सांगितले की, देशातील एक उत्कृष्ट लोकोत्सव गोव्यात दरवर्षी होतो व देशातील संस्कृतीची त्यातून देवाणघेवाण होते याचा आनंद आहे. देशातील लोककलांचे दर्शन घडते. लोकोत्सवाची निमंत्रणे राज्यातील हॉटेल्सपर्यंत पोहचवा म्हणजे पर्यटकही मोठ्या प्रमाणात हजेरी लावतील असेही त्यांनी सांगितले.

गणेश वंदनेने सोहळ्याला प्रारंभ

सगुण वेळीप यांनी स्वागत केले. सिद्धी उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. मिलिंद माटे यांनी आभार मानले. गोमंतकीय कलाकारांनी सादर केलेल्या शानदार गणेशवंदनेने उद्‍घाटन सोहळ्याला सुरवात झाली.नंतर विविध राज्यातील कलाकारांच्या रंगारंग कलाविष्काराने व राजस्थान मधील मांगनियार ने रसिकांची मने जिंकली. त्यानंतर विविध राज्यातील लोकनृत्यांनी रसिकांना आनंद दिला.

Lokotsav Goa 2025
Canacona News : ‘लोकोत्सवा’साठी सभापतींनी केले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

गोव्याचे वैशिष्ट्यपूर्ण कलादर्शन

रंगमंचाच्या पार्श्वभागी नेपथ्य स्वरूपात उभे केलेले गोव्याचे वैशिष्टयपूर्ण कलात्मक दर्शन लक्ष वेधून घेत आहे. त्यासाठी पारंपरिक खिडक्या (जनेल), ढोल, ताशा, घुमट ही वाद्ये, कुणबी साडी, माड, पदेराचे पाव, काकणे, समई, नथ, कोंबडा, खेकडा अशी प्रतीके वापरण्यात आली आहेत.

Lokotsav Goa 2025
National Lokotsav Goa: पणजीत शुक्रवारपासून लोकोत्‍सव; जाणून घ्या १० दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला तुम्ही का भेट द्यावी?

आदिवासी हस्तकला ग्राम

कला संस्कृती संचालनालय गोवा,गोवा शासनाचे ट्रायबल वेल्फेअर खाते, ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट, सांगे यांच्या संयुक्त विद्यमाने कला अकादमी संकुलात लोकोत्सवानिमित्त यंदा ट्रायबल हस्तकला ग्राम भरविण्यात आले आहे व त्यात बांबू, माडाची चुडीत आदिपासून बनविलेल्या झाडू, चटया, पत्रावळी, टोपल्या, सुपे,सुपड्या अशा वस्तूंचे प्रदर्शन भरविले आहे. या ग्रामाची सजावट पण पारंपरिक अशा वस्तू वापरून केली आहे. कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते त्याचे उद्‍घाटन करण्यात आले. ज्ञानपीठ प्राप्त रवींद्र केळेकर व कविवर्य मनोहरराय सरदेसाई यांच्या जन्मशताब्दी निमित्त कला अकादमी कला दालनात त्यांच्यावर चित्रप्रदर्शन भरवण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com