National Lokotsav Goa: पणजीत शुक्रवारपासून लोकोत्‍सव; जाणून घ्या १० दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला तुम्ही का भेट द्यावी?

Goa Cultural Festival: कला अकादमीच्या दर्या संगमावर दरवर्षी होणारा राष्ट्रीय स्तरावरील लोकोत्सव शुक्रवारी १७ जानेवारीपासून सुरू होणार असून २६ जानेवारीपर्यंत चालणार आहे.
National Lokotsav Goa: राजधानीत आजपासून लोकोत्‍सवाची धूम; 20 राज्यातील 600 कलाकार लावणार हजेरी; 10 दिवस चालणार रंगारंग
National Lokotsav GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Lokotsav Goa 2025

पणजी: कला अकादमीच्या दर्या संगमावर दरवर्षी होणारा राष्ट्रीय स्तरावरील लोकोत्सव शुक्रवारी १७ जानेवारीपासून सुरू होणार असून २६ जानेवारीपर्यंत चालणार आहे. या उत्सवाचे यंदाचे २४वे वर्ष आहे, अशी माहिती कला-संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी दिली. दरम्‍यान, २० राज्यांतील सुमारे ६०० कलाकार आपापल्या प्रदेशातील लोककला आणि लोकनृत्यांचे सादरीकरण करणार आहेत.

शुक्रवारी (१७ रोजी) संध्याकाळी ६.३० वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे. यावेळी राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात हे सन्माननीय पाहुणे म्‍हणून उपस्‍थित असतील.

National Lokotsav Goa: राजधानीत आजपासून लोकोत्‍सवाची धूम; 20 राज्यातील 600 कलाकार लावणार हजेरी; 10 दिवस चालणार रंगारंग
Lokotsav 2024: 'तवडकर आदर्श राजकारणी आहेत', लोकोत्‍सव सोहळ्यात उरांव यांचे गौरवोद्‌गार

कला अकादमी संकुलात आयोजित या पत्रकार परिषदेला मंत्री गावडे यांच्‍यासह संचालक सगुण वेळीप, कला अकादमीचे सदस्य सचिव अरविंद खुटकर, उपसंचालक मिलिंद माटे यांची उपस्थिती होती. यंदा राजस्थानचे मांगणियार, कालबेलीया व चरी नृत्य, आसामचे बिहु, गुजरातचा गरबा, महाराष्ट्राचा पोवाडा व लावणी, पश्चिम बंगालचे पुरुलिया छाऊ, कर्नाटकचे ढोलु कुनिथा, हरियाणाचे घुमर व अन्‍य राज्‍यांचे लोकनृत्‍य सादरीकरण होईल.

१ हजार हस्तकारागिरांच्‍या कलाकारीचे प्रदर्शन

लोकोत्सवात सुमारे ५५० स्टॉल्‍स थाटण्यात येणार आहेत. सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत हस्तकला आणि खाद्यपदार्थांची विक्री होईल. रोज सायंकाळी ६ ते १० या वेळेत लोकनृत्यांचे कार्यक्रम होणार आहेत. २० राज्यांतील सुमारे ६०० कलाकार आपापल्या प्रदेशातील लोककला आणि लोकनृत्यांचे सादरीकरण करतील. शिवाय किमान एक हजार हस्तकारागीर आपल्‍या कलाकारीचे प्रदर्शन करणार आहेत.

National Lokotsav Goa: राजधानीत आजपासून लोकोत्‍सवाची धूम; 20 राज्यातील 600 कलाकार लावणार हजेरी; 10 दिवस चालणार रंगारंग
Goa National Highway: गोव्यातील राष्ट्रीय महामार्गांसाठी चार हजार कोटी खर्च; तानावडेंनी विचारलेल्या प्रश्नावर गडकरींचं उत्तर

गोमंतकीय कलाकारांच्‍या २० पथकांचा सहभाग

गोमंतकीय लोककलाकारांकडून श्री गणेश वंदना, घोडेमोडणी, जागोर, मुसळ व समईनृत्‍य, गोफ, देखणी, मांडो, कुणबी, तोणयामेळ, दांडला खेळ, तालगडी, मोरुलो, वीरभद्र, धनगर आदी लोकनृत्ये सादर केली जातील. किमान २० पथकांद्वारे हे सादरीकरण होणार आहे. शिवाय २० पासून पाच दिवसीय ‘मोलेला’ कार्यशाळा घेण्यात येणार आहे. कवी रवींद्र केळेकर व डॉ. मनोहरराय सरदेसाई यांच्या जन्मशताब्दीप्रीत्यर्थ गोमंतकीय चित्रकारांच्या कलेचे प्रदर्शन कला अकादमीत भरविण्यात येणार आहे.

National Lokotsav Goa: राजधानीत आजपासून लोकोत्‍सवाची धूम; 20 राज्यातील 600 कलाकार लावणार हजेरी; 10 दिवस चालणार रंगारंग
38th National Games: गोव्याचे नीलेश नाईक यांची 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी संचालक म्हणून नियुक्ती

समस्‍या प्रचंड वाहतूक कोंडीची

राजधानी पणजीत अगोदरच ‘स्‍मार्ट सिटी’च्‍या नावाखाली रस्‍ते व गटारे खोदण्‍यात आलेली आहेत. त्‍यामुळे माती रस्‍त्‍यावर टाकून ते रस्‍ते वाहतुकीसाठी (Transportation) बंद करण्‍यात आले आहेत. काही रस्‍ते त्‍याच अवस्‍थेत सुरू ठेवल्‍यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. पणजी मार्केट ते मिरामार या मार्गावर गुरुवारी संध्‍याकाळी वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. या पार्श्वभूमीवर उद्यापासून सुरू होणाऱ्या लोकोत्‍सवामुळे त्‍यात आणखी भर पडू ‘चक्का जाम’ होण्‍याची भीती व्‍यक्त करण्‍यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com