Zakir Hussain Passed Away X - Social Media
मनरिजवण

Zakir Hussain Passed Away: प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचे निधन

Tabla Maestro Zakir Hussain Died: झाकीर हुसेन यांना हृदयाशी संबंधित त्रास होऊ लागल्याने सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Pramod Yadav

Zakir Hussain Passed Away

अमेरिका: प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचे रविवारी (१५ डिसेंबर २०२४) वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. हुसैन यांना हृदयाशी संबंधित समस्यांमुळे अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांच्या अकस्मात निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जातोय. दरम्यान, कुटुंबाकडून किंवा रुग्णालयाने हुसेन यांच्या निधनाची अद्याप अधिकृतपणे पृष्टी केलेली नाही.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच इतरांनी झाकीर हुसेन यांच्या जाण्याबद्दल शोक व्यक्त केला आहे.

राहुल गांधी ट्विटरच्या माध्यमातून झाकीर हुसेन यांच्या निधनबद्दल शोक व्यक्त केला आहे. झाकीर हुसेन यांच्या अचानक जाण्याने संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचं राहुल गांधी म्हणालेत.

झाकीर हुसेन यांच्या तबल्याच्या तालामधून निघणाऱ्या ध्वनीने संपूर्ण जगात एक वेगळीच ओळख निर्माण केली, ही धून कायम आमच्या मनात राहील असं विकास ठाकरे म्हणालेत.

गायिका कविता कृष्णमूर्ती यांनी ट्विट शेअर करत म्हटले की झाकीर हुसेन यांचे निधन म्हणजे भारतीय संगीत क्षेत्राला बसलेला एक धक्काच म्हणावं लागेल. मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे यांनी अखेरचा श्वास घेतला,‌ त्यांच्या निधनामुळे नक्कीच संपूर्ण जगाचेच मोठे नुकसान झाले आहे.‌

कुटुंबाकडून अद्याप निधनाची पृष्टी नाही

झाकीर हुसेन यांच्या निधनाची त्यांच्या कुटुंबाकडून, उपचार सुरु असलेल्या रुग्णालयातून किंवा सॅन फ्रान्सिस्कोमधील वाणिज्य दूतावासाकडून अधिकृतपणे पुष्टी करण्यात आलेली नाही.

पद्मविभूषण पुरस्कार विजेते झाकीर हुसेन यांना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची पुष्टी त्यांचे मेहुणे आयुब औलिया यांनी केली होती. उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म १९५१ रोजी झाला होता. संगीतातील त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांना पद्मश्री, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एवढेच नाही तर उस्तादजींनी २००९ मध्ये समकालीन जागतिक संगीत अल्बम श्रेणीमध्ये ग्रॅमी देखील जिंकला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

Krishna Janmashtami 2025 Wishes In Marathi: 'कृष्ण' जन्मला ग बाई... जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' गोड, नटखट शुभेच्छा

SCROLL FOR NEXT