Konkani drama competition, Rang Sutra play, Konkani theatre performance Dainik Gomantak
मनरिजवण

Konkani Drama Competition: ‘नाविन्या’च्या नादात वाट चुकलेला प्रयोग ‘रंग-सूत्र’; नाट्यसमीक्षा

Rang Sutra Konkani Drama: स्पर्धा म्हणजे काहीतरी प्रायोगिक करण्याचे व्यासपीठ, अशी समजूत मनाशी धरून नवीन प्रयोग करण्याचा काही लेखक-दिग्दर्शक प्रयत्न करत असतात.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: स्पर्धा म्हणजे काहीतरी प्रायोगिक करण्याचे व्यासपीठ, अशी समजूत मनाशी धरून नवीन प्रयोग करण्याचा काही लेखक-दिग्दर्शक प्रयत्न करत असतात. या प्रयत्नापोटी कधी कधी प्रयोगाची वाटच चुकली जाते. कला अकादमीच्या सुवर्णमहोत्सवी कोकणी नाट्य स्पर्धेत अभय थिएटर अकादमी गोवा-सुर्ल-साखळी या संस्थेने सादर केलेल्या ‘रंग-सूत्र या नाटकाच्या बाबतीत असाच काहीसा प्रकार घडताना बघायला मिळाला.

स्पर्धेतील हे नववे पुष्प. जर्मन लेखक सिलेवेशी यांच्या संहितेचे कोकणी रूपांतर केले आहे अभय जोग यांनी. अभय जोग हे गोव्याच्या नाट्यक्षेत्रातील एक प्रचलित नाव; पण या संहितेच्या बाबतीत ते बरेच कमी पडल्याचे जाणवले.

मुळात या संहितेचा जीवच लहान असल्यामुळे ती दोन तास ताणल्यासारखी झाली. संवाद मात्र समर्पक वाटत होते. रंगमंचावर फक्त दोनच कलाकार. त्यातला एक रंगकर्मी तर दुसरी एका मोठ्या संस्थेची कार्यकारी अधिकारी.

सुरुवात होते ती रंगकर्मीने त्या अधिकाऱ्यांच्या संस्थेला दिलेल्या एका प्रस्तावाने. त्यात मग तो आपण ‘लोकमांड’पासून सुरुवात करून कसा मोठा नाट्यकलाकार झालो हे सांगतो. तर ती अधिकारी बाई आपण हे नाट्यगृह मोडण्याचा ‘रिपोर्ट’ दिला असल्याचे त्याला सांगते.

ज्या नाट्यगृहात आपण जीवन ओतले ते नामशेष होणार म्हणून तो रंगकर्मी धास्तावतो; पण नंतर ती अधिकारी बाई आपण हा प्रस्ताव नगरपालिकेला बऱ्याकरता कसा दिला हे उदाहरण देऊन त्याला पटवते आणि शेवटी नाट्यगृह मोडल्यास त्या रंगकर्मीने परत एकदा ‘लोक मांड’द्वारे नाटक घेऊन लोकांच्या दारात जावे, असा सल्ला देऊन आपणही त्याच्याबरोबर या कलेत सहभागी होणार असल्याचे जाहीर करते आणि नाटक संपते.

अभय जोग हेच दिग्दर्शक असल्यामुळे या मर्यादा असलेल्या संहितेला पेलण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केल्याचे दिसून आले. यात काही प्रमाणात ते यशस्वी ठरलेही.

रंगकर्मी म्हणजे मास्टर रंगाचार्य सशाची कथा सांगतो तो प्रसंग वा टेबल ढकलले जाते तो प्रसंग वा शेवटचा ती महिला व मास्टर रंगाचार्य अनुक्रमे महिला व पुरुषाचा वेश घेऊन प्रेक्षकांसमोर येतात तो प्रसंग असे काही प्रसंग दिग्दर्शकांने समर्थपणे टिपले आहेत; पण प्रयोगाला गती देण्यात ते बरेच अपयशी झाल्याचे दिसून आले. दोनच पात्रे असल्यामुळे रंगमंचाचा योग्य वापर व्हायला हवा होता; पण तसा तो झाल्याचे आढळले नाही.

मास्टर रंगाचार्य झालेले यदुनाथ शिरोडकर आपली भूमिका अपेक्षेएवढे रंगवू शकले नाहीत. काही प्रसंगांत तर ते निरसच वाटत होते. त्यामानाने महिला अधिकारी म्हणजे शुभम के. झालेल्या अर्चना डिचोलकर जास्त प्रभावी वाटल्या. मात्र, नाटकाच्या शेवटी मोठे मोठे संवाद बोलण्याच्या नादात त्या गडबडताना दिसत होत्या.

यातले काही प्रसंग तर न पटण्यासारखेच. आपल्याला या या नोकरीत मोठे करिअर करायचे असे सांगणारी शुभम के. नंतर ‘लोक मांड’ खेळण्याकरता नोकरी सोडल्याचे सांगते, ती मास्टरला आपल्या प्रियकराबद्दल सांगते आणि नंतर मुंडन केलेले आपले डोके दाखवते.

मास्टरला पहिल्या अंकात व्हिलचेअरवर दाखविणे व दुसऱ्या अंकात नॉर्मल दाखविणे, मास्टरचे दुसऱ्या अंकातील लांबलेले स्वगत यासारखे प्रसंग अवास्तव आणि त्यामुळे अतर्क्य वाटतात. काही प्रसंग इतके रेंगाळले आहेत की ते प्रेक्षकांच्या सहनशक्तीची परीक्षा घेणारे ठरले.

तांत्रिक बाबींबद्दल बोलायचे तर आदित्य शिरोडकर यांचे नेपथ्य कलात्मक होते. या नेपथ्याचा दिग्दर्शकाने चांगला वापर केल्याचे दिसून आले. पांडुरंग पांगम यांची प्रकाशयोजना आणि अभिजीत जोग यांचे पार्श्वसंगीत नाटकाच्या मूडला शोभेल असे होते. एकंदरीत काहीतरी नवे करण्याच्या हव्यासापोटी वाट चुकलेला प्रयोग असे ‘रंग-सूत्र’ या नाटकाच्या प्रयोगाचे वर्णन करावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Marsh Drinking Beer: वादग्रस्त बोलणं पडलं महागात! फक्त '6 बिअर' बोलल्यामुळे मिचेल मार्शला संघातून 'डच्चू'! काय आहे नेमकं प्रकरण? Watch Video

Goa Police Constable Fraud: पोलिस कॉन्स्टेबलचा भांडाफोड! आंध्र प्रदेशातील बनावट जन्म प्रमाणपत्राच्या आधारे मिळवली नोकरी; पणजी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा

Gold Silver Rate: सोन्या-चांदीच्या दरात मोठा उलटफेर! सोन्याच्या दरात घसरण, तर चांदीचे दर 'जैसे थे'; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Horoscope: पैसा आणि नोकरीचे संकट! मंगळाच्या अधोगतीमुळे 'या' राशींची आर्थिक स्थिती ढासळणार! सावध राहा

IND vs AUS 5th T20: मालिकेचा फैसला 'गाबा'वर! सूर्या ब्रिगेड देणार कांगारुंना कडवं आव्हान, कसा आहे ब्रिस्बेनमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड?

SCROLL FOR NEXT