

साखळी : गोवा कोकणी अकादमी व साखळी रवींद्र भवन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिली सत्तरी व डिचोली तालुका मर्यादित कोकणी नाट्य स्पर्धा गुरुवार ६ नोव्हेंबरपासून साखळी रवींद्र भवनात सुरू होत आहे. उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून तर कोकणी साहित्यिक पुंडलिक नाईक सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
गेल्या वर्षी साखळी रवींद्र भवनने आयोजित केलेल्या मराठी नाट्यस्पर्धेला रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. त्यावेळी सर्व कलाकार हे स्थानिक पंचायत क्षेत्रांतीलच असावेत असा नियम ठेवण्यात आला होता. या नियमाचे पालन करून एकही कलाकार बाहेरून आणण्यात आला नव्हता, ही बाब त्या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरली होती.
दरम्यान, उद्यापासून सुरू होणाऱ्या डिचोली व सत्तरी तालुका कोकणी नाट्यस्पर्धेत १८ नाट्यमंडळांनी सहभाग घेतला आहे. दररोज एक नाटक सादर होणार असून सर्व प्रयोग रवींद्र भवनच्या पं. मनोहरबुवा शिरगावकर सभागृहात संध्याकाळी ७ वाजता सुरू होतील.
नाट्यसादरीकरण वेळापत्रक
ता. नाट्यमंडळ नाटकाचे नाव/लेखक
६ नोव्हें. मठ युनायटेड आतील पेठ, डिचोली तोणी -वैभव कवळेकर
७ नोव्हें. सियावर राम, पिळगाव मोगपर्व -वैभव कवळेकर
८ नोव्हें. श्री भूमिका नाट्यमंडळ, सीमेवयल्यान फाटीसर -बाळ कोल्हटकर
१० नोव्हें. व्हाळशी स्पोर्टस् क्लब, बोर्डे ती येता गे -संजय फाळकर
११ नोव्हें. श्री मात्राई कालभैरव महिला नाट्यमंडळ, लामगाव आगश्यो मागश्यो -महेश नायक
१२ नोव्हें. श्री रवळनाथ महालक्ष्मी कल्चरल क्लब, विर्डी तो एक दिस -डॉ. प्रकाश वजरीकर
१३ नोव्हें. श्री निरंकारी कला मंच, बांबर-नानोडा काल माया -डॉ. जयंती नायक
१४ नोव्हें. श्री सातेरी कला मंच, मोर्ले काणी तशी जुनीच पूण..? -डॉ. प्रकाश वजरीकर
१५ नोव्हें. श्री विठ्ठल मंच सांगाती, कारापूर-तिस्क चतुरंगा -पुंडलिक नायक
१७ नोव्हें. भूमी प्रकाशन अस्तुरी -झिलू गावकर
१८ नोव्हें. कला अविष्कार, मासोर्डे होम कांड -डॉ. प्रकाश वजरीकर
१९ नोव्हें. श्री सातेरी ब्राह्मण संस्था, वाळपई काणी तकल्यांची -बर्टोल्ट ब्रेख्त
२० नोव्हें. श्री लक्ष्मीनारायण कला मंडळ, न्हावेली फायनल ड्राफ्ट - गिरीश जोशी
२१ नोव्हें. श्री देवी माऊली कला मंडळ, मेणकुरे अल्पविराम -कीर्ती नर्से
२४ नोव्हें. गौरी नंदन थिएटर, सत्तरी कोडे -कय्युम काजी
२५ नोव्हें. ग्रामीण कला संस्था, दाबोस भविष्य पुराण -डॉ. प्रकाश वजरीकर
२६ नोव्हें. नटरंग क्रिएशन, नार्वे हिडो निस्ट -प्रशांत दळवी
२७ नोव्हें. अभय थिएटर अकादमी, सुर्ल रंगसूत्र -सिळेविशी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.