Bollywood Actress Kamini Kaushal | Kamini Kaushal Death News Dainik Gomantak
मनरिजवण

Kamini Kaushal: 1948 ते 2022! मनोजकुमारचा शहीद ते आमीरच्या लालसिंग चढ्ढापर्यंत कार्यरत असणारी अभिनेत्री 'कामिनी कौशल'

Kamini Kaushal Death News: ७७ वर्षात पाचशेहून अधिक चित्रपटात भूमिका करणारी कामिनी कौशल ही बॉलिवुडातील एकमेव अभिनेत्री. पण एवढ्या भूमिका करूनसुद्धा तिने आपली डिग्निटी राखली हे विशेष.

गोमन्तक डिजिटल टीम

मिलिंद म्हाडगुत

शुक्रवार दि. १४ रोजी बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री कामिनी कौशल कालवश झाली. कामिनी कौशल म्हणजे बॉलिवूडची एके काळची आघाडीची नायिका. दिलीप कुमारबरोबर तिची जोडी त्या काळात चांगलीच जमली होती. ‘शहीद’, ‘शबनम’, ‘आरजू’, ‘नदिया के पार’ या चित्रपटात या जोडीने कमाल केली होती.

‘शहीद’ या १९४८साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने तर देशप्रेमाचे वारे देशात पसरवले होते. ’वतन की राहो मे वतन के नौजवान’ हे या चित्रपटातील गाणे त्या काळात प्रत्येकाच्या ओठावर खेळत होते. ‘निचा नगर’, ‘बिराज बहु’, ‘जेलर’, ‘गोदान’, ‘दो भाई’, ‘जिद्दी’, ‘शायर’, ‘पारस’, ‘बिखरे मोती’, ‘आबरू’, ‘राखी’, अशा त्या काळच्या अनेक गाजलेल्या चित्रपटात कामिनी कौशल नायिका होती. ‘जिद्दी’मध्ये तर तिचा नायक होता चॉकलेट हिरो देव आनंद.

हा चित्रपट त्या काळात बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. ‘बिराज बहु’च्या भूमिकेकरता कामिनी कौशल यांना १९५६ सालचा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला होता. १९६५साला पासून त्या चरित्र अभिनेत्री बनल्या.

मनोज कुमारचा शहीद हा त्यांचा चरित्र नायिका म्हणून पहिला चित्रपट. या चित्रपटात त्या शहीद भगतसिंगच्या आई झाल्या होत्या. ही त्यांची भूमिका एवढी गाजली की त्या मनोज कुमारच्या आई म्हणूनच ओळखल्या जाऊ लागल्या.

‘उपकार’, ‘पूरब और पश्चिम’, ‘शोर’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘दस नंबरी’, ‘संन्यासी’ या मनोज कुमारांच्या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी मनोजच्या आईची भूमिका निभावल्या होत्या. दोन भाऊ अलग होतात म्हणून व्यथित झालेली, ‘उपकार’ या १९६७ सालच्या मनोज कुमारच्या ’ब्लॉकबस्टर ’ चित्रपटातील त्यांची भूमिका आजसुद्धा लोकांच्या लक्षात आहे.

कामिनी कौशलची खासियत म्हणजे अभिनयातील तिची सहजता. ‘प्रेम नगर’ या राजेश खन्नाच्या चित्रपटात याचा प्रत्यय येतो. त्यातली तिची ती घमेंडखोर इनामदारीण १९७४साली तुफान गाजली होती. तीच गोष्ट १९७० सालच्या ‘दो रास्ते’ या सुपरहिट चित्रपटाची.

यातली तिची ती सोशिक मोठी बहूही लोकांची दाद घेऊन गेली होती. ‘स्वर्ग नरक’मधली पुत्र विनोद मेहराच्या वाईट वागणुकीमुळे हताश झालेली आई तिने प्रभावीपणे व्यक्त केली होती.

‘अनहोनी’ या संजीव कुमार अभिनित रहस्यमय चित्रपटातील तिची ती खलनायिका तर आजसुद्धा लोकांच्या आठवणीत ताजी आहे. ‘उपहार’, ‘यकिन’, ‘आदमी और इन्सान’, ‘वारिस’, ‘यादगार’, ‘हिर-रांजा’, ‘दिल और दिवार’, ‘टांगेवाला’, ‘अपने रंग हजार’, ‘कैद’ या गाजलेल्या चित्रपटांतील तिच्या चरित्र नायिकेच्या भूमिकाही लोकांनी उचलून धरल्या होत्या

१९४५पासून सुरू झालेली कामिनी कौशलची ‘इनिंग’ २०२२सालापर्यंत कायम राहिली. आमिर खानचा ’लाल सिंह चड्डा’ हा कामिनी कौशलचा शेवटचा चित्रपट. शाहरुख खानच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ तसेच शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह’मध्ये तिच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.

७७ वर्षात पाचशेहून अधिक चित्रपटात भूमिका करणारी कामिनी कौशल ही बॉलिवुडातील एकमेव अभिनेत्री. पण एवढ्या भूमिका करूनसुद्धा तिने आपली डिग्निटी राखली हे विशेष. म्हणूनच तिच्या स्मृतींना वंदन करताना, वंदन तिच्याच भगतसिंगवर आधारित ‘शहीद’ या चित्रपटातील गाणे याद यायला लागते;

ए वतन ए वतन तुमको मेरी कसम

तेरी बाहो मे जां तक लुटा जायेंगे,

फुल क्या चीज है तेरे कदमो पे हम,

भेट अपनी सरोंकी चढा जायेंगे..

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, हिंसाचार प्रकरणात कोर्टानं ठरवलं दोषी

DYSP यांच्या कार्यालयाजवळ 'ती' विकायची नारळपाणी, बँकेच्या मॅनेजरला हनीट्रॅपमध्ये अडकवलं; पण, ब्लॅकमेल करुन 10 लाख उकळण्याचा डाव फसला

Viral Post: 'तुम हारने लायक ही हो...' आफ्रिकेविरूध्द टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, दिग्गज खेळाडूची पोस्ट व्हायरल

'IFFI 2025' मध्ये गोव्यातील 2 चित्रपटांना संधी! मिरामार, वागातोर किनाऱ्यांसह मडगावच्या रविंद्र भवनात 'Open-air Screening' ची मेजवानी

Goa Police: 5000 पेक्षा अधिक कॉल, 581 तक्रारींवर तत्काळ कार्यवाही; सायबर गुन्ह्यांना 100% प्रतिसाद देणारं 'गोवा पोलीस' दल देशात अव्वल

SCROLL FOR NEXT