Dharmendra Death News: 'माझ्या वडिलांची प्रकृती स्थिर'! अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातमीवर मुलगी इशा भडकली; Post Viral

Dharmendra death news: नुकत्याच आलेल्या काही वृत्तांमध्ये त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याचे सांगितले गेले होते, पण नंतर कुटुंबीयांनी हे खोटे असल्याचे स्पष्ट केले.
Dharmendra death news
Dharmendra Death NewsDainik Gomantak
Published on
Updated on

बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाल्याची बातमी पसरली होती. धर्मेंद्र यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले होते. पण ही बातमी खोटी असल्याचे इशा देओल यांनी म्हणले आहे.

काही दिवसांपासूनच धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली होती, दरम्यान ते रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांच्या पत्नी हेमा मालिनी आणि मुलगा सनी आणि बॉबी देओल यांच्यासह अनेक कलाकारांनी रुग्णालयात भेट दिली. नुकत्याच आलेल्या काही वृत्तांमध्ये त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याचे सांगितले गेले होते, पण नंतर कुटुंबीयांनी हे खोटे असल्याचे स्पष्ट केले.

इशा देओल यांनी इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हणले आहे की धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी चुकीची आहे.माझ्या वडिलांची प्रकृती स्थिर आहे असे त्यांनी लिहिले आहे.

पंजाबमध्ये जन्मलेल्या धर्मेंद्र यांचे चित्रपटांवरील आकर्षण लहानपणापासून होते. न्यू टॅलेंट कॉन्टेस्ट जिंकून ते मुंबईमध्ये अभिनयासाठी आले. १९६० मध्ये यांचे ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून त्यांनी सिनेमा क्षेत्रात पदार्पण केले. ‘फूल और पत्थर’ चित्रपटानंतर ते सुपरस्टार झाले.

Dharmendra death news
Tragic Death: काळीज पिळवटले! खेळता खेळता पडला विहिरीत, मृत्यूशी दिली झुंज; 3 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

ज्येष्ठ वयातही धर्मेंद्र सिनेमात सक्रिय होते. अपने (२००७) मध्ये त्यांनी त्यांच्या मुलांसोबत अभिनय केला. अलीकडेही ते अपने २ आणि इतर चित्रपटांच्या प्रोजेक्ट्चा भाग होते. १९९७ साली त्यांना लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड देण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com