Harman Baweja Dainik Gomantak
मनरिजवण

Harman Baweja at IFFI Goa: हरमन बावेजा पडलाय प्रेमात, म्हणाला "मला पुढचा जन्म गोव्यात घ्यायचा आहे"

Harman Baweja wants reborn in Goa: गोमंतक टाइम्ससोबत गप्पा करताना हरमन बावेजा याने मला पुढचा जन्म गोव्यात घ्यायचा आहे असं मजेशीर वक्तव्य केलं.

Akshata Chhatre

Harman Baweja at International Film Festival India

पणजी: आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने सध्या अनेक सिने कलाकार गोव्याला भेट देत आहेत. देशातील अनेक चित्रपट निर्माते आहेच मात्र या बरोबर आंतराष्ट्रीय स्थरावरील कित्येक अनुभवी चेहरे गोव्यात हजेरी लावत आहेत. मिसेस या चित्रपटाच्या निमित्ताने सानिया मल्होत्रा आणि हरमन बावेजा यांनी रेड कार्पेवर हजेरी लावली. गोमंतक टाइम्ससोबत गप्पा करताना हरमन बावेजा याने मला पुढचा जन्म गोव्यात घ्यायला आवडेल असं मजेशीर वक्तव्य केलं.

हरमन बावेजा हा खरंतर मुंबईचा आहे मात्र त्याच्यामते गोवा आणि मुंबई यांमध्ये फारसं अंतर नाही, आज सकाळी जर का आपण गोव्यात असू तर रात्री मुंबई गाठता येतं. मोपा आंतराष्ट्रीय विमानतळामुळे तर हा प्रवास आणखीन सोपा झाल्याचं बावेजा म्हणालाय. हरमन बावेजा पूर्णपणे गोव्याच्या प्रेमात आहे.

तो म्हणतोय की मला जर का कोणी विचारलं गोव्याला यायचं आहे का? तर मी एका घटकेचाही विचार न करता त्यांना हो म्हणून टाकतो.तो म्हणाला की इतर कुठल्याही पर्यटकाप्रमाणे मी गोव्यात आनंद साजरा करतो. त्याला समुद्रावर जायला आवडतंच, गोव्यातली रेस्टॉरंट्स देखील त्याला अत्यंत प्रिय आहे.

हरमन बावेजा म्हणाला की गोव्याच्या हवेतच एक वेगळी मजा आहे, गोव्यात आल्या आल्या सगळा स्ट्रेस जातो आणि एक वेगळाच उत्साह संचारल्यागत वाटतं. इथे आनंद मिळतो, शांतात मिळते, हवा असलेला कम्फर्ट मिळतो. गोव्यात आल्या आल्या माझं सगळं कन्फ्युजन दूर होतं, मला नेमकं काय करायचं आहे याची उत्तरं मिळतात.

तुम्हाला माहितीये का एखाद्या सामान्य माणसाप्रमाणेच या मोठमोठाल्या कलाकारांसाठी सुद्धा गोव्यात स्वतःची जागा घेणं बरंच महाग झालंय. हरमन बावेजाला यामुळे फरक पडत नाही कारण तो म्हणतोय की त्याच्या ओळखीची अनेक लोकं गोव्यात रहातात आणि ती असताना जागेचा प्रश्न येत नाही.हरमन सध्या दिल का दरवाजा खोल ना डार्लिंग या चित्रपटाचं शूटिंग करण्यासाठी शिवोलीत आला आहे आणि मुंबईला परतण्यापूर्वी तो गोव्यात राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT