Arjun Rampal Dainik Gomantak
मनरिजवण

2 मुलं, 6 वर्ष एकत्र; धुरंधर फेम अर्जुन रामपाल 'एंगेज्ड'! गिर्ल्डफ्रेन्डबद्दल म्हणाला, 'मी तिच्यामागे लागलो कारण ती..."

Arjun Rampal engagement: अर्जुन रामपालने त्याची दीर्घकाळची पार्टनर गॅब्रिएला डेमेट्रिएड्ससोबत त्याची एंगेजमेंट झाली असल्याचा खुलासा केला

Akshata Chhatre

Gabriella Demetriades Arjun Rampal: 'धुरंधर' चित्रपटातील मेजर इक्बालच्या भूमिकेसाठी सध्या कौतुकास पात्र ठरलेला अभिनेता अर्जुन रामपाल याने नुकताच अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या 'चॅप्टर २' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या मनमोकळ्या संभाषणादरम्यान अर्जुन रामपालने त्याची दीर्घकाळची पार्टनर गॅब्रिएला डेमेट्रिएड्ससोबत त्याची एंगेजमेंट झाली असल्याचा खुलासा केला, पण अद्याप लग्न झाले नसल्याचे स्पष्ट केले.

पॉडकास्टमध्ये मोठा खुलासा

पॉडकास्टच्या आगामी एपिसोडच्या टीझरमध्ये गॅब्रिएला म्हणाली, "आम्ही आता विवाहित नाही, पण कोण जाणे?" त्यावर अर्जुनने लगेचमध्ये बोलताना सांगितले की, "आम्ही एंगेज्ड आहोत! आम्ही नुकताच हा खुलासा तुझ्या शोमध्ये केला." अर्जुनच्या या बोलण्याने रियालाही आश्चर्य वाटले.

प्रेम, पालकत्व आणि संबंध

अर्जुन रामपाल आणि मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रिएड्स २०१७ पासून एकत्र आहेत. या सहा वर्षांत या जोडप्याला आरिक आणि आरिव अशी दोन मुले झाली आहेत.

प्रेम, पालकत्व आणि त्यांच्या नात्यातील बदलांबद्दल बोलताना गॅब्रिएला म्हणाली, "प्रेम काही अटींसह येतं, जसं की जर एखाद्या व्यक्तीने अशा प्रकारे वागले, तरच प्रेम मिळेल. पण जेव्हा तुमचं स्वतःचं मूल असतं, तेव्हा तुम्ही तसं करू शकत नाही, बरोबर ना?"

एका क्षणी अर्जुनने गॅब्रिएलाला प्रपोज करण्याचे गंमतीदार कारणही उघड केले. तो म्हणाला, "मी तिच्यामागे लागलो कारण ती खूप 'हॉट' होती, पण नंतर मला जाणवलं की तिच्या हॉटनेसपेक्षा तिच्यात काहीतरी अधिक आहे."

अर्जुनच्या व्यावसायिक आयुष्याचा आनंद

अर्जुन रामपाल सध्या आदित्य धरच्या 'धुरंधर' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. या स्पाय थ्रिलर चित्रपटात त्याने मेजर इक्बालची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने भारतात ३०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

या चित्रपटात संजय दत्त, अक्षय खन्ना, आर माधवन आणि रणवीर सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. यापूर्वी अर्जुन रामपालचे मेहर जेसियासोबत लग्न झाले होते, तिच्यासोबत त्याला महिका रामपाल आणि मायरा रामपाल या दोन मुली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर 'Drishti'च्या जीवरक्षकांचे 'रेस्क्यू ऑपरेशन'; 22 पर्यटकांचे वाचवले प्राण

Goa Crime: खाकी वर्दीचा धाक दाखवून वृद्धांना लुटायचे, डिचोलीत तोतया पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश! दोघे अटकेत

Ruturaj Gaikwad Century: ऋतुराज गायकवाडचं वादळ! गोव्याविरुद्ध झळकावलं शानदार शतक; बनला 'विजय हजारे ट्रॉफी'चा नवा 'सेंच्युरी किंग'

झारखंड दारु घोटाळा! छत्तीसगडच्या मद्य व्यावसायिक नवीन केडियाला गोव्यातून अटक; ACB ची कारवाई

"26 वर्षे देशाची सेवा केली, आता ओळख विचारताय?" निवडणूक आयोगाच्या नोटिसमुळे खासदार विरियातो संतापले

SCROLL FOR NEXT