Viral Video: अक्षय खन्नावर पाकिस्तान फिदा! 'FA9LA' हुकस्टेपचा बलुची पोरांना फीव्हर; फॅनबेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Akshaye Khanna FA9LA step: डकैतच्या एंट्रीवर क्रिएटर्स आणि चाहत्यांनी केलेली गर्दी तुम्ही पाहिली असेलच, पण या रेहमानची हवा बलुचिस्तानमध्ये देखील पसरली
Balochistan viral video
Balochistan viral videoDainik Gomantak
Published on
Updated on

Akshaye Khanna FA9LA hook step: अभिनेता अक्षय खन्नाच्या 'धुरंधर' चित्रपटातील 'FA9LA' या गाण्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातलाय. तुम्ही जर रात्रंदिवस रील्स स्क्रोल करत असाल, तर या गाण्यातील रेहमान डकैतच्या एंट्रीवर क्रिएटर्स आणि चाहत्यांनी केलेली गर्दी तुम्ही पाहिली असेलच, पण या रेहमानची हवा बलुचिस्तानमध्ये देखील पसरली असून काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

'FA9LA' ची सीमापार क्रेझ; बलुचिस्तानमध्येही फॅनबेस

आता या गाण्याची ही व्हायरल क्रेझ सीमा ओलांडून बलुचिस्तान मध्येही पोहोचली. रेहमान डकैतला आता बलुची लोकांमध्येही मोठा फॅनबेस मिळाला आहे आणि इंटरनेट याबद्दल खूप उत्साहित आहे. पाकिस्तानमधील एका चाहत्याने X (पूर्वीचे Twitter) वर एक क्लिप शेअर केली आहे आणि बलुचिस्तानमधील लोक अक्षय खन्नावर कसे फिदा झाले असल्याची कबुली दिली. त्याने लिहिले आहे, व्हिडिओमध्ये काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमधील एक लहान मुलगा 'FA9LA' च्या आकर्षक बीट्सवर नाचताना दिसत आहे.

व्हायरल क्लिप आणि सेलिब्रिटींचा 'लुक'

संपूर्ण काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये रेहमान डकैतची फ्रेममध्ये होणारी एंट्री आणि त्यानंतरचे त्याचे सहज डान्स मूव्ह्स असलेली ही क्लिप सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल झालीये. सोशल मीडिया वापरकर्ते आणि अनेक सेलिब्रिटी त्याचा 'रेहमान डकैत' लुक कॉपी करत आहेत, त्याचे हुकस्टेप्स कॉपी करत आहेत, आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून स्वतःचे 'रेहमान डकैत' म्हणून फोटो तयार करतायत.

Balochistan viral video
शूटिंगनंतर कुठे गायब झालाय अक्षय खन्ना? 167 कोटींची मालमत्ता असलेला 'रहमान' राहतोय अलिबागमध्ये; स्वर्गाहून सुंदर फार्महाऊस!

कोरिओग्राफरने उघडले रहस्य

'धुरंधर' (५ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज, २०० कोटींहून अधिक कमाई) मधील हे गाणे मूळतः मे २०२४ मध्ये रिलीज झाले होते आणि ते एक अरेबिक पार्टी सॉन्ग आहे. हे गाणे मित्रांसोबत आनंद लुटण्याबद्दल आहे.

गाण्याच्या कोरिओग्राफीबद्दल बोलताना कोरिओग्राफर विजय गांगुली यांनी सांगितले की; "हे गाणे अक्षयच्या पात्राला 'शेर-ए-बलुच' म्हणून मुकुट घातल्याचा सोहळा आहे. मूळतः, त्याला फक्त एंट्री करायची होती, डान्सर्समधून चालत जायचे होते आणि सिंहासनावर बसायचे होते." "पण सीनचा मूड आणि डान्सर्सची एनर्जी बघून, अक्षयने सांगितले की तो एंट्री करताना थोडासा डान्स करेल. तो काय करणार आहे, हे आम्हापैकी कोणालाच माहीत नव्हते. अक्षयने सीनमध्ये प्रवेश केला, तो क्षण पकडला आणि उत्स्फूर्तपणे डान्स केला," असे गांगुली यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com