आता घरबसल्या बघा धुरंधर! बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर 'OTT' स्ट्रीमिंग कधी? लगेच नोट करा तारीख

Dhurandhar OTT release: हा चित्रपट ओटीटीवर कधी रिलीज होईल, याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत
Dhurandhar OTT
Dhurandhar OTTDainik Gomantak
Published on
Updated on

Dhurandhar OTT release date: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा स्पाय थ्रिलर चित्रपट सध्या जगभरातील चित्रपटगृहांवर राज्य करतोय. रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने सोशल मीडियावर मोठी क्रेझ निर्माण केली आहे. या क्रेझमध्ये, हा चित्रपट ओटीटीवर कधी रिलीज होईल, याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

ओटीटी प्लॅटफॉर्म कोणता?

'धुरंधर' हा चित्रपट नेटफ्लिक्स (Netflix) वर ऑनलाइन रिलीज होईल. चित्रपटाच्या थिएटर स्क्रीनिंगच्या सुरुवातीच्या क्रेडिट्समध्ये नेटफ्लिक्स हे चित्रपटाचे डिजिटल पार्टनर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सामान्यतः, रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना स्टारर चित्रपट थिएटर रिलीज झाल्यावर ६ ते ८ आठवड्यांच्या विंडोचे पालन करतात. यानुसार, 'धुरंधर' १६ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६ दरम्यान नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होण्याची शक्यता आहे.

अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये ३० जानेवारी २०२६ ही तारीख ओटीटी रिलीजची संभाव्य तारीख म्हणून वर्तवली जात असली तरीही चित्रपट निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.

Dhurandhar OTT
Viral Video: अक्षय खन्नावर पाकिस्तान फिदा! 'FA9LA' हुकस्टेपचा बलुची पोरांना फीव्हर; फॅनबेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क

'धुरंधर'चा बॉक्स ऑफिसवर जलवा!

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अत्यंत यशस्वी ठरला आहे आणि माउथ ऑफ वर्डमुळे याच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली आहे.

  • पहिला दिवस: २८ कोटी (नेट)

  • पहिला शनिवार: ३२ कोटी

  • पहिला रविवार (Peak):४३ कोटी

  • पहिला आठवडा (Week 1):२०७.२५ कोटी (नेट)

  • भारतातील एकूण नेट कलेक्शन: २९२.७५ कोटी

  • जगभरातील एकूण कलेक्शन: ४४६.२५ कोटी

चित्रपटाबद्दल....

आदित्य धर यांनी दिग्दर्शित, लिखित आणि सह-निर्मित केलेला 'धुरंधर' हा एका भारतीय गुप्तहेराची कहाणी आहे, जो पाकिस्तानातील कराची येथील ल्यारी भागातील टोळ्यांमध्ये घुसतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com