Dhurandhar 2 OTT rights  Dainik Gomantak
मनरिजवण

Dhurandhar 2 ने रिलीजपूर्वी तोडले सर्व रेकॉर्ड! मिळवले बक्कळ पैसे; एवढ्या किमतीत विकले OTT Rights

Dhurandhar 2 OTT Record: बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवल्यानंतर आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग अभिनीत धुरंधरने ओटीटीवरही आपली ताकद दाखवून दिली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Dhurandhar 2 Record : बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवल्यानंतर आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग अभिनीत धुरंधरने ओटीटीवरही आपली ताकद दाखवून दिली आहे. ३० जानेवारी २०२६ रोजी ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने नेटफ्लिक्सवर नंबर १ ट्रेंडिंगचा मान पटकावला. या यशाच्या पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी धुरंधर २ : द रिव्हेंजचा पहिला टीझर नुकताच ऑनलाइन प्रदर्शित केला असून, त्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

दरम्यान, धुरंधर २साठी ओटीटी पार्टनर बदलणार असल्याच्या चर्चांना आता अधिकृत दुजोरा मिळाला आहे. बॉलीवूड हंगामाच्या ताज्या अहवालानुसार, या सिक्वेलचे ओटीटी हक्क तब्बल १५० कोटी रुपयांना विकले गेले आहेत.

विशेष म्हणजे, पहिल्या भागाच्या प्रदर्शनापूर्वीच एका डिजिटल प्लॅटफॉर्मने दोन्ही भागांचे हक्क एकत्र १७५ कोटी रुपयांना खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, निर्मात्यांनी पहिल्या भागाच्या यशाची वाट पाहत केवळ दुसऱ्या भागासाठी स्वतंत्र करार करत ही मोठी डील अंतिम केली.

रिपोर्टनुसार, धुरंधरच्या पहिल्या भागाचे डिजिटल हक्क ८५ कोटी रुपयांना विकले गेले होते. तुलनेत, दुसऱ्या भागासाठी मिळालेली रक्कम जवळपास दुप्पट आहे. सध्याच्या काळात स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स मोठ्या खरेदीबाबत सावध भूमिका घेत असतानाही, धुरंधरच्या लोकप्रियतेमुळे एवढी मोठी रक्कम मोजावी लागल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर २मध्ये रणवीर सिंग पुन्हा एकदा हमजा अली मझारीच्या भूमिकेत दिसणार आहे. रहमान डाकैतच्या मृत्यूनंतर सत्तेच्या शिखराकडे वाटचाल करणाऱ्या हमजाची कथा या भागात उलगडणार आहे. संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असतील. हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असून, मे २०२६च्या दुसऱ्या आठवड्यात जिओ हॉटस्टारवर ओटीटी प्रीमियर होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT