

Arjun Rampal in Goa: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आणि बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करणाऱ्या 'धुरंधर' चित्रपटातील अभिनेता अर्जुन रामपाल सध्या गोव्यामध्ये चित्रपटाचे यश साजरे करत आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात अर्जुनने 'मेजर इक्बाल' या खलनायकी छटा असलेल्या आयएसआय प्रमुखाची भूमिका साकारली आहे, ज्याचे प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून कौतुक होतेय.
अर्जुनने आपल्या इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत. त्याने आपल्या गोव्यातील जवळच्या मित्रांचा उल्लेख 'GG's' (Goa Gangsters) असा केलाय. या मित्रांसोबत त्याने चित्रपट पाहिला आणि त्यानंतर गोव्यातील प्रसिद्ध 'टर्टुलिया' रेस्टॉरंटमध्ये खास डिनरचा आनंद घेतला.
या सेलिब्रेशनचे मुख्य आकर्षण म्हणजे जेवणानंतर देण्यात आलेले खास डेझर्ट्स होते. ज्या प्लेट्समध्ये हे डेझर्ट्स वाढण्यात आले, त्यावर चॉकलेटने 'धुरंधर' असे लिहिले होते. अर्जुनने रेस्टॉरंटच्या आदरातिथ्याचे आभार मानताना लिहिले, "माझ्या गोवा गँगस्टर्ससोबत धुरंधर पाहायला गेलो. खूप मजा आली. त्यानंतर टर्टुलियामध्ये स्वादिष्ट जेवण आणि अप्रतिम डेझर्ट्स मिळाले. तुम्ही आमचे खूप लाड केलेत."
५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर' चित्रपटाने २०२६ च्या सुरुवातीलाच जगभरात १२०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. रणवीर सिंग, अक्षय खन्ना, आर. माधवन आणि संजय दत्त यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट सध्या भारतीय चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरला आहे.
अर्जुन रामपालची मेजर इक्बालची भूमिका या चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग मानली जात आहे. अर्जुनच्या या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली असून, गोव्यातील त्याच्या या 'मुव्ही आऊटिंग'चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.