Pushpa 2 Gwalior Canteen Incidence Dainik Gomantak
मनरिजवण

Pushpa 2 Stunt: चित्रपटगृहात 'पुष्पा' स्टाईल मारामारी, कानाचा चावा घेणाऱ्या तरुणाचा The End कारागृहात

Gwalior Canteen Incidence: ग्वाल्हेरमधल्या एका चित्रपट गृहात कॅन्टीनमध्ये कामाला असलेल्या कर्मचाऱ्याने प्रेक्षकाचा कान करकचून चावा घेतला

Akshata Chhatre

Ear Biting Incident at Gwalior Madhya Pradesh

ग्वाल्हेर : पुष्पा २ या चित्रपटाची सध्या तरुणांमध्ये क्रेझ आहे. 'पुष्पा'चे संवाद, स्टाईल याचे अनुकरण करणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. मात्र, मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधल्या एका तरुणाने चक्क चित्रपाटीत मारामारीचं 'प्रात्यक्षिक'च करून दाखवलं. किरकोळ वादावरून चित्रपट गृहातील कर्मचाऱ्याने एका प्रेक्षकाच्या कानाचा चावा घेतला. शेवटी हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्या आरोपींची पुष्पा स्टाईल वठणीवर

पुष्पा 2 मधला सीन काय?

चित्रपट एका सीनमध्ये अल्लू अर्जुनने हिरॉइजम दाखवत खलनायकाच्या कानाचा चावा घेतला होता, यावेळी अल्लू अर्जुनचे हात-पाय बांधलेले असल्याने त्याने चावा घेत फाईट सुरु ठेवली आणि सगळ्यांना मारलं.

मध्य प्रदेशमध्ये काय घडले?

ग्वाल्हेरच्या फलका बाजारातील एका चित्रपटगृहात शब्बीर खान हा तरुण पुष्पा २ चित्रपट बघायला गेला होता. मध्यांतरादरम्यान शब्बीर हा कँटिनमध्ये खाण्यासाठी गेला. तिथे शब्बीरचा कँटिनमधील कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला. वाद इतका टोकाला गेला हाणामारी झाली. यादरम्यान तेथील कर्मचारी एमए खान, राजू, चंदन या तिघांनी शब्बीर बेदम मारहाण केली. यादरम्यान एका कर्मचाऱ्याने शब्बीरच्या कानाचा चावा घेतला. जखमी झालेल्या तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शब्बीरने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली आहे. चित्रपटातील सीनचे तरुणांवर नकारात्मक परिणाम होतात, हे सीन प्रत्यक्ष आयुष्यातही शक्य आहे असे काही लोकांना वाटते, त्यांना धडा शिकवालच पाहिज, असे शब्बीरने स्थानिक माध्यमांना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: ..काय हा योगायोग! गावडेंचे आसन तवडकरांना, विधानसभेत बैठकव्‍यवस्‍थेत बदल; गावकर 19 वरून 1ल्या क्रमांकावर

Goa Politics: खरी कुजबुज; मुख्यमंत्र्यांचे भोजन

Ganesh Gaonkar: राज्यपालांनी शपथ घेण्यास दिलेला नकार, हुकलेले पद ते नवीन सभापती म्हणून नेमणूक; गणेश गावकरांचा प्रवास

Ganesh Gaonkar: ‘एकावेळी एकानेच बोला’! नवनियुक्त सभापतींचे पहिल्‍याच दिवशी शिस्‍तीचे धडे; आमदारांना दिली तंबी

Goa Startup Policy: गोमंतकीय तरुणांसाठी मोठी बातमी! सरकारचे स्टार्टअप धोरण जाहीर; 10 हजार रोजगारनिर्मितीचे लक्ष्य

SCROLL FOR NEXT