Pushpa 2
Pushpa 2Dainik Gomantak

Pushpa 2 Theatre Death : मृत व्यक्तीसोबत प्रेक्षकांनी पहिला Pushpa 2; आंध्र प्रदेशमधून खळबळजनक घटना समोर

Man Dead at Pushpa 2 Screening: पुष्पाच्या एका शोच्यावेळी चित्रपट गृहात मृतदेह आढळून आल्याने बरीच खळबळ उडाली
Published on

Theatre Asphyxiation Incident: देशभरात गाजत असलेल्या अल्लू अर्जुनच्या पुष्पा या चित्रपटाला ग्रहण लागलं आहे. पुष्पाने फक्त सहा दिवसांमध्ये ६०० कोटींपेक्षा अधिक कमाई करत अनेक रेकॉर्ड्स मोडून काढले आहेत. पुष्पाचा विजयीरथ वेगाने पुढे सरकत असताना वेगवेगळ्या आव्हानांनी त्याला घेरायला सुरुवात केलीये. पुष्पाच्या एका शोच्यावेळी चित्रपट गृहात एक मृतदेह आढळून आल्याने बरीच खळबळ उडाली होती.

आंध्र प्रदेश मधील अनंतपूर जिल्ह्यातील रायदुर्गम या भागात पुष्पाचे प्रदर्शन सुरु होते आणि अचानक एका व्यतीचा संशयास्पद मृत्यू झाला. संपूर्ण चित्रपट संपेपर्यंत आजूबाजूच्या प्रेक्षकांना हे माहिती देखील नव्हतं की त्यांच्या शेजारी बसलेला व्यक्ती मृत आहे आणि ते सुद्धा मृतदेहासोबत चित्रपट पाहत होते. मंगळवारी १० डिसेंबर रोजी ही घटना घडली, संध्याकळी एक चित्रपटाचा शो सुरु होता.

Pushpa 2
Pushpa 2: फहादच्या भूमिकेवर मोठा आक्षेप; "शेखावत नाव काढा, नाहीतर घरात घुसून मारू" करणी सेनेचं Tweet Viral

या मृत व्यक्तीचे नाव मध्यनप्पा असे होते आणि मिळालेल्या माहितीनुसार तो भरपूर दारू प्यायचा आणि चित्रपट पाहायला देखील तो दारूच्या नशेतच आला होता. मध्यनप्पाचा मृत्यू नेमका कसा झाला याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही, मात्र पोलीस याचा तपास करीत आहेत.

पुष्पा यशाच्या शिखरावर असताना करणी सेनेने फहाद फसीलच्या भूमिकेवर आक्षेप घेत नाव बदलण्याची धमकी दिली. यापूर्वी चित्रपटाच्या प्रीमियरच्या दिवशी चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com