Keerthy Suresh Keerthy Suresh Instagram
मनरिजवण

Keerthy Suresh Wedding: नवरी नटली...! उरले काही तास, कीर्ती - अँटोनी गोव्यात घेणार सात फेरे

Keerthy Suresh and Antony Thattil Wedding: कीर्ती आणि अँटोनी गेल्या १५ वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांनी आता लग्नाचा निर्णय घेतलाय.

Pramod Yadav

Keerthy Suresh and Antony Thattil Wedding in Goa

पणजी: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेश आणि तिचा प्रियकर अँटोनी थाटील गुरुवारी (११ डिसेंबर) गोव्यात सात फेरे घेणार आहेत. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, कीर्ती - अँटोनी यांच्यासह त्यांचे नातेवाईक गोव्यात दाखल झाले आहेत. कीर्ती नव्या आयुष्याची सुरुवात करण्यास फार उत्साही असल्याचे तिने Instagram स्टोरीमधून म्हटले आहे.

अभिनेत्री कीर्ती सुरेश आणि अँटोनी थाटील १२ डिसेंबरच्या दिवशी गोव्यात लग्नगाठ बांधणार आहेत. दोघांनी येथे डिस्टिनेशन वेडिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कीर्तीने ती गोव्यात लग्न करणार असल्याची माहिती दिली होती.

Keerthy Suresh Antony Thattil Wedding

कीर्ती आणि अँटोनी गेल्या १५ वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. याची माहिती देखील कीर्तीने एका Instagram पोस्टमधून दिली होती. अँटोनी दुबईस्थित एक बिझनेसमन म्हणून त्याची कोची येथे देखील फूडचेन असल्याची माहिती समोर आली आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, अँटोनी थाटील कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे.

कीर्ती गेल्या काही दिवसांपासून लग्नाची जोरदार तयारी करत आहे. तिने यापूर्वी देखील गोव्याला भेट देऊन लग्नस्थळी तयारीचा आढावा घेतला होता. काही दिवस आधीच ती गोव्यात दाखल झाली आणि इतर तयारी उरकल्याची बातमी माध्यमांतून समोर आलीय. कीर्तीचे लग्न शाही असले तरी यासाठी काही मोजकेच लोक उपस्थित राहणार आहेत. दोघांच्या लग्नाची लग्नपत्रिका सोशल मिडियावरुन व्हायरल झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New Borim Bridge: नवीन बोरी पुलासाठी 1000 कोटींचा आराखडा! अडीच वर्षांत काम होणार पूर्ण; ढवळीतून निघणार बगलरस्ता

Goa Crime: टॉवेल आणण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार; 75 वर्षीय गुन्हेगाराला सश्रम कारावासाची शिक्षा

धक्कादायक! आरोपीने तुरुंगातून तक्रारदाराला लावला फोन; जेलमधील मोबाईल, ड्रग्जवरून हायकोर्ट संतप्त; दिले महत्वाचे निर्देश

Agonda Beach: आगोंद ‘कासव संवर्धन’ क्षेत्रात बेकायदा बांधकामांची रेलचेल! न्‍यायालय संतप्‍त; दिले चौकशीचे आदेश

Kala Academy: कला अकादमीच्या नूतनीकरणात '50 कोटी' वायफळ खर्च! टास्क फोर्सकडून गंभीर चिंता व्यक्त; IIT मद्रासच्या अहवालातून त्रुटी उघड

SCROLL FOR NEXT