Keerthy Suresh Wedding: कीर्ती सुरेश आणि अँटोनी गोव्यात !! #KAweddingची लगीनघाई; पुढच्या आठवड्यात बांधणार लग्नगाठ

Keerthy Suresh Antony Thattil Goa Wedding: लग्न समारंभासाठी कीर्ती आणि अँटोनी गोव्यात दाखल झाले आहेत, कीर्तीच्या एका मैत्रिणीने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दलची माहिती दिली.
Keerthy Suresh Antony Thattil Goa Wedding: लग्न समारंभासाठी कीर्ती आणि अँटोनी गोव्यात दाखल झाले आहेत, कीर्तीच्या एका मैत्रिणीने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दलची माहिती दिली.
Keerthy Suresh Antony Thattil Goa WeddingDainik Gomantak
Published on
Updated on

Keerthy Suresh and Antony Thattil in Goa

पणजी: दक्षिणेतील प्रसिद्द अभिनेत्री कीर्ती सुरेश आणि तिचा प्रियकर गोव्यात लग्नगाठ बांधणार आहेत. १२ डिसेंबरच्या दिवशी कीर्ती आणि अँटोनी डिस्टिनेशन वेडिंग करतील. काही दिवसांपूर्वीच दोघांची लग्नाची पत्रिका व्हायरल झाली होती. या पत्रिकेमध्ये कीर्ती आणि अँटोनी यांच्याशिवाय त्यांच्या पालकांची नावं आणि लग्नाची तारीख पाहायला मिळतेय. लग्न समारंभासाठी कीर्ती आणि अँटोनी गोव्यात दाखल झाले आहेत, कीर्तीच्या एका मैत्रिणीने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दलची माहिती दिली.

कीर्ती सुरेश घरच्या मंडळींच्या उपस्थितीत आणि काही जवळच्या मित्रांमध्ये लग्नगाठ बांधणार आहे. कीर्ती आणि अँटोनीच्या लग्नासाठी #KAwedding असा हॅशटॅग सुद्धा जबरदस्त व्हायरल होताना दिसतोय. कीर्तीच्या एका मैत्रिणीने चेन्नई ते गोवा असं विमानाचं तिकीट दाखवणारी एक स्टोरी पोस्ट केली होती.

Keerthy Suresh Antony Thattil Goa Wedding: लग्न समारंभासाठी कीर्ती आणि अँटोनी गोव्यात दाखल झाले आहेत, कीर्तीच्या एका मैत्रिणीने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दलची माहिती दिली.
Keerthy Suresh Wedding Card: फक्त सहा दिवस उरले! गोव्यात जय्यत तयारी सुरु, कीर्ती-अँटोनीची लग्नपत्रिका व्हायरल

याशिवाय आणखीन एका मैत्रिणीने गोव्यातील एका हॉटेलमधील व्हिडीओ #KAwedding असं म्हणत पोस्ट केला होता आणि यामुळे कीर्तीच्या लग्नाची लगीनघाई सुरु झालीये याला दुजोरा मिळालाय.

काय सांगते कीर्तीची लग्नपत्रिका?

"आम्हाला कळविण्यात आनंद होत आहे की आमच्या मुलीचे १२ डिसेंबर रोजी एका खासगी समारंभात लग्न होत आहे. आम्ही तुमच्या शुभेच्छा आणि शुभेच्छांचा आदर करतो. तसेच तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना कराल अशी आशा आहे. दोघे एकत्र आयुष्याचा नवीन प्रवास सुरू करतायेत तुम्ही त्यांना आशीर्वाद देऊ शकलात तर आम्ही तुमचे आभारी असू. रेश कुमार आणि मनेका सुरेश कुमार यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि खूप प्रेम," असे या कार्डमध्ये लिहले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com