Aamir Khan IFFI Goa Dainik Gomantak
मनरिजवण

Aamir Khan IFFI: ‘गोवा इतनी सुंदर जगह है, की यहां हप्तेभर के लिए आना चाहिए’, आमीरने जागवल्या 'दिल चाहता है'च्या आठवणी

Aamir Khan IFFI Goa Visit: दुपारी अडीच वाजल्यापासून अनेकजण केवळ एकाच हेतूने वाट पाहात होते, आमीरला प्रत्यक्ष पाहायचयं. परिसर क्षणाक्षणाला तुडुंब भरू लागला.

Sachin Korde

दुपारी साडेचारची वेळ. कला अकादमी परिसरात इफ्फी प्रतिनिधींची वाढती गर्दी. थिएटरमध्ये तिकीटधारकांची इतकी गर्दी होती, की विनातिकीट प्रेक्षकांच्या आशा क्षणोक्षणी फिक्या पडत होत्या. रांगेत उभे असलेले लोक सतत फोनवर ‘तू कुठे?’, ‘कहाँ पे भाई?’, ‘आमीर खान आनेवाला है... कला अकादमी आ जाओ!’ अशा उतावीळ संवादात मग्न होते.

दुपारी अडीच वाजल्यापासून अनेकजण केवळ एकाच हेतूने वाट पाहात होते, आमीरला प्रत्यक्ष पाहायचयं. परिसर क्षणाक्षणाला तुडुंब भरू लागला. मागील दरवाजाकडे मीडियाचे कॅमेरे सज्ज, पोलिसही तैनात. तणाव आणि उत्कंठा सर्वोच्च बिंदूपाशी येत होती आणि मग बरोब्बर ४ वाजून २८ मिनिटांनी जीए-०७-टी-४०५० या आलिशान ‘बीएमडब्ल्यू’मधून ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ बाहेर पडला.

गुलाबी हाफ कुर्ता, ब्ल्यू जीन्स, लांबसडक केस पण बांधलेले आणि स्टायलिश चष्मा, अशी झलक पाहताच जल्लोष उसळला. लोक पुढे सरसावले, पण सुरक्षा वलयाच्या आड आमीर काही क्षणांत आत निघून गेला. एवढा मोठा अभिनेता वेळेवर कसा काय येणार? अशी दीर्घकाळ चाललेली कुजबुज संपुष्टात आली. आमीरने पुन्हा सिद्ध केले, की ‘परफेक्ट टायमिंग’ हे त्याचं दुसरं नाव आहे.

माझी ‘कथा-शाळा’

मला लहानपणापासून कथा ऐकण्याची भारी ओढ. आमच्या घरी लेखक-निर्माते सतत यायचे, वडिलांना कथा सांगायचे. पण मी मात्र पडद्यामागून लपून ऐकायचो, समोर बसण्याची हिम्मतच नव्हती. कारण, ते कडक शिस्तीचे होते. मोठा झाल्यावर पहिल्या चित्रपटाच्या कथेसाठी वडिलांसमोर जाण्याची वेळ आली. त्यांनी विचारले, ‘कथा कशाला ऐकतोस? तुला सगळ्या पाठ असतात!’ रात्रीच्या जेवणाच्या टेबलवर कथा, व्यक्तिरेखा आणि चित्रपटांवर चालणाऱ्या चर्चा, हीच माझ्यासाठी पहिली शाळा होती. चांगल्या कथा मी आजही ऐकतो, मनाला भिडली तरच स्वीकारतो. उत्कृष्ट संहितेतून उत्कृष्ट सिनेमा घडतात, असे आमीरने सांगितले.

प्रवास, आठवणी आणि विचार

बरोब्बर ४ वाजून ३५ मिनिटांनी मंचावर आलेला आमीरने पहिल्यांदा मंचाला, मग प्रेक्षकांना अभिवादन केले. त्याच्यातील साधेपणा आणि आत्मीयता डोळ्यांत भरत होती. नंतर भारद्वाज रांगन यांच्या सूत्रसंचालनाखाली प्रश्नोत्तरांची मालिका सुरू झाली. संवादाची सुरुवात धर्मेंद्र यांच्या आठवणींनी झाली. ‘ते महान अभिनेता होतेच; पण त्याहून महान माणूस होते,’ असे आमीरने प्रेमळपणे सांगितले. यातून विषय पुढे सरकत गेला. त्याचा कलात्मक प्रवास, भूमिका निवडण्याचे निकष, अभिनेत्रींसोबतचे अनुभव, सामाजिक दृष्टिकोन प्रत्येक उत्तरात प्रामाणिकपणा स्पष्ट दिसत होता. पडद्यावर जसा, तसाच प्रत्यक्षातही. निर्भीड, विचारशील.

गोव्याच्या आठवणी अन्‌ ‘डायलॉग’

गोवा माझ्यासाठी नेहमीच खास’, असे आमीर म्हणाला. पत्रकाराने विचारलेल्या ‘दिल चाहता है’ या गोव्यात चित्रित झालेल्या चित्रपटातील डायलॉग बोलून दाखवण्याच्या मराठीत केलेल्या विनंतीवर त्याने हसत ‘गोवा इतनी सुंदर जगह है, की यहां हप्तेभर के लिए आना चाहिए’, असे म्हटल्यानंतर प्रेक्षकांनी भरभरून टाळ्या वाजवल्या आणि मग त्याने तो संवाद सादर केला. मराठीतील आमीरचा आवाज, त्याची स्मितरेषा यातून क्षणात सभागृह न्हाऊन निघाले.

अडीच तासांचा संवाद, मिनिटांसारखा!

कला अकादमीचे सभागृह खचाखच भरले होते. आमीरला पाहण्यासाठी, त्याच्या जीवनशैलीच्या गोष्टी ऐकण्यासाठी चित्रपटप्रेमी, विद्यार्थी, निर्माते, इफ्फी प्रतिनिधी मोठ्या उत्साहाने जमले होते. आमीरने प्रत्येक प्रश्नाला साधेपणाने, खुल्या मनाने उत्तर दिले. प्रेक्षकांच्या प्रश्नांनाही त्याने तेवढ्याच आपुलकीने प्रतिसाद दिला, कोणालाही न दुखावता, न कंटाळवता. अडीच तास चाललेले हे सत्र केव्हा सुरू झाले, केव्हा संपले कळलेच नाही. इतका प्रवाही, इतका जीवंत! त्याची कला, त्याचे विचार, त्याची तल्लख संवेदनशीलता, सगळं काही ‘परफेक्ट’.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gautam Gambhir: गौतम गंभीरची हकालपट्टी होणार का? BCCI सचिवांनी दिलं थेट उत्तर; म्हणाले 'त्यांना काढून टाकण्याची बातमीच...'

Ponda Accident: फोंड्यात वातावरण पेटले! डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; संतप्त नागरिकांनी वाहतूक रोखली, ट्रकची केली नासधूस

Cigarette Price Hike: सिगारेट ओढणाऱ्यांसाठी चटका देणारी बातमी! 4 पटीने वाढणार किंमत; धूम्रपान करणाऱ्यांना सरकारचा मोठा धक्का

Rohit Sharma Viral Photo: 'मी रोहित शर्मासारखा दिसतोय हे ऐकून.. ', हिटमॅनसारख्या दिसणाऱ्या खेळाडूने जिंकले फॅन्सचे हृदय; पहा Video

Goa Dhirio: कोलवामध्ये पुन्हा 'धिरिओ'चा थरार; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, प्राणीमित्रांकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT