Michael Lobo  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

काँग्रेसश्रेष्ठी जी जबाबदारी देतील ती पेलू: मायकल लोबो

मायकल लोबो यांची खास मुलाखत

दैनिक गोमन्तक

संतोष गोवेकर

प्रश्न: कळंगुटमधून आपण हॅट्‍ट्रीक साधली. आतापर्यंत कुणालाच जमले नाही, यावर काय सांगाल?

उत्तर: हा विजय आणि हॅट्‍ट्रीक केवळ माझी एकट्याचीच नसून, कळंगुट मतदारसंघातील प्रत्येक सुज्ञ मतदारांची आहे. त्यासाठी स्थानिक मतदारबंधू भगिनींचा मी शतशः आभारी आहे, असे मायकल लोबो यांनी सांगितले.

प्रश्न: ‘टुगेदर फॉर बार्देशचा नारा’ तुम्ही दिलात, यामध्ये आपणास अपयश आले असे वाटते का?

उत्तर: बिल्कुल नाही. बार्देशातील एकूण सात मतदारसंघांपैकी चार मतदारसंघ जिंकण्यात आम्ही (टुगेदर फॉर बार्देश) यशस्वी ठरलेलो आहोत. शिवाय तिसवाडीतील कुंभारजुवा तसेच सांताक्रुझ मतदारसंघावर कॉंग्रेसचा झेंडा फडकावलेला आहे. म्हापसा (Mapusa) मतदारसंघ नियोजनाअभावी आम्ही गमावून बसलो आहोत. सासष्टीत तृणमूल आणि रिव्होल्युशनरी पक्षात कॉंग्रेसच्या (मुळ) मतांचे विभाजन झाल्याने मोठा फटका बसला. जनतेने दिलेला कौल शिरसावंद्य मानून कॉंग्रेसने विधानसभेत विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला आहे, असे लोबो म्हणाले.

प्रश्न: निवडणुकाआधी भाजपचा त्याग केला त्याचे दु:ख वाटते काय?

उत्तर: नो, नॉट एट् ऑल. उलट, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची एकंदर सरासरी पाहाता राज्यातील जनतेने भाजपाच्या विरोधात मतदान केल्याचे स्पष्ट होत आहे. दुर्दैव इतकेच की, संतापाच्या भरात या मतांचे तीन वेगवेगळ्या पक्षांत विभाजन झाले आहे. अन्यथा राज्यात कॉंग्रेस पक्षच सत्तारूढ झाला असता, असे लोबो यांनी मत व्यक्त केले.

प्रश्न: शिवोलीत प्रथमच मतदारांनी कॉंग्रेसचा हात धरला. हा चमत्कार कसा काय घडवून आणलात?

उत्तर: शिवोलीत यंदा चमत्कारच नव्हे, तर इतिहास घडला आहे. हा इतिहास घडविण्याचे श्रेय स्थानिक मतदार तसेच तेथील महिलाशक्तीला जाते. शिवोलीकरांनी दिलेला मतदानरुपी कौल तेथील स्थानिक जनतेच्या मनातील धगधगत्या ज्वाळां होत्या ज्या भाजपच्या विरोधात शिवोलीतून पेटल्या गेल्या आणि नवा इतिहास घडला, असे मायकल लोबो म्हणाले.

प्रश्न: भाजप सत्ता स्थापन करणार आहे, तुमची अर्थातच कॉंग्रेसची भूमिका काय असेल?

उत्तर: निश्चितच विरोधकाची. गेली दहा वर्षे राज्यातील जनतेने विधानसभेत विरोधी पक्ष बघितला नव्हता तो आता जनतेला बघावयास मिळणार आहे. सरकारच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून वेळोवेळी त्यांना घाम काढणाऱ्या कर्तव्यदक्ष विरोधी पक्षाची प्रचिती गोव्यातील (Goa) जनतेला नव्याने उभारी घेणाऱ्या कॉंग्रेस पक्षाकडून पाहावयास मिळणार आहे, अशी ग्वाही लोबो यांनी दिली.

प्रश्न: विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून पदभार सांभाळण्यास तुम्ही इच्छुक आहात काय?

उत्तर: येथे प्रश्न इच्छा-आकांक्षांचा नसून, पक्षाकडून दिलेली जबाबदारी शिरावर घेत ती निभावण्याचा आहे. याबाबतीत मला एवढेच सांगायचे आहे की, मी सध्या कुठल्याच पदाच्या शर्यतीत नसून, कॉंग्रेसचे (Congress) पक्ष श्रेष्ठी जी कुठली जबाबदारी माझ्या खाद्यावर देतील ती पुरेपूर निभावण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन, असे आश्वासन मायकल लोबो यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Friendship Day 2025: फ्रेंडशिप डे स्पेशल! तुमच्या जिगरी मित्राला पाठवा 'हे' खास संदेश

IND vs ENG: फलंदाजीतही 'दीप' चमकला! आकाश दीप विराट-सचिनच्या खास क्लबमध्ये सामील; अशी कामगिरी ठरला चौथा भारतीय खेळाडू

शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा करणाऱ्या पर्रीकरांबाबतही ते खोटे बोलले होते; अरुण जेटलींनी धमकी दिल्याचा राहुल गांधींचा दावा हास्यास्पद - प्रमोद सावंत

Handwriting Competition: 'गोमंतक'तर्फे 40 दिवसांची राज्यस्तरीय हस्तलेखन स्पर्धा; आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

America-Russia Tension: 'रशियासोबत अणुयुद्धासाठी अमेरिका तयार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ; जागतिक राजकारण तापलं VIDEO

SCROLL FOR NEXT