Babu Ajgaonkar and Digambar Kamat  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Assembly Election 2022: मडगावकरांचा कौल कुणाला ?

दैनिक गोमन्तक

सासष्टी: यंदा विधानसभा निवडणुकीत मडगाव मतदारसंघ प्रथमच विशेष चर्चेत आला. पूर्वी कधी नव्हते असे तगडे आव्हान दिगंबर कामत (Digambar Kamat) यांच्या समोर मनोहर उर्फ बाबू आजगावकर (Babu Ajgaonkar) यांनी उभे केले. यंदाची मडगावमधील लढत अटीतटीची झाली, असे काही राजकीय विश्‍लेषकांनी सांगितले.

2017 मध्ये मडगावमध्ये मतदान 78.7 टक्के झाले होते. या वेळेस त्यात 4 टक्क्यांनी घट झाली म्हणजेच एकूण मतदान 74.8 टक्के झाले. एकूण 29,505 पैकी 22,082 एवढे मतदान झाले.

बाबू आजगावकर हे मूळ मडगावचेच व मडगावांतच राहतात. त्यामुळे येथील सर्व माहिती त्यांना होती. त्यांचा संबंधही मडगांवकरांशी होता. त्यामुळे प्रचार करताना त्याचा फायदा त्यांना झाला. दिंगबर कामत यांना सुद्धा बाबू आजगावकर हे भाजपचे उमेदवार असतील, याची कल्पना नव्हती. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मडगावमध्ये सर्वत्र चर्चा एकच होती, की मडगांवकरांनी कौल कुणाच्या बाजूने दिला असेल? दिगंबर कामत की बाबू आजगावकर? मडगावमध्ये 40 मतदान केंद्रे आहेत व सर्वच मतदानकेंद्राबाहेर भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. गेल्या 20-25 वर्षांत प्रथमच हा माहोल पहायला मिळाला. हा उत्साह फसवा असू शकत नाही.

आता मडगावमध्ये कोणाला कशी मते पडली असतील, याचा अंदाज बांधणे कठीणच. तरी शहरी भागात कॉंग्रेसच्या दिंगबर कामत यांनी आपली पारंपरिक मते राखली, असे म्हणता येईल. शिवाय सर्वच मतदान केंद्रांवर भाजपचे पारंपरिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे निकालाच्या बाबतीत संभ्रम निर्माण होणे सहाजिकच आहे.

भाजपचे मतदार या वेळच्या निवडणुकीत दिगंबर कामतच्या बाजूने असतील,अशी हवा होती तरी मोठ्या प्रमाणात भाजपची मते फुटली असतील, असे वाटत नसल्याचे एका भाजपच्या एका प्रमुख कार्यकर्त्याने सांगितले.

तृणमूल काँग्रेसचे उमेदवार महेश आमोणकर यांनी ज्या तीव्रतेने व गंभीरपणाने प्रचार केला, यांचा प्रभाव निकालावर परिणाम करणारा असू शकतो. तरी प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसात आमोणकर यांचा प्रभाव कमी पडल्याचे काही राजकीय जाणकारांनी सांगितले. पेड, खारेबांद, शिरवडे, सारवडे, कोलमोरोड मिळून जवळ जवळ 6500 मतदानझाले आहे.

सिनेलता जवळील भागावर बाबू आजगावकरांचे वर्चस्व असून या भागात जवळ जवळ 2100 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

आम आदमी पक्षाचे उमेदवार लिंकन वाज, रेव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाचे उमेदवार शशिराज नाईक शिरोडकर यांचा प्रचाराच्या काळात मतदारसंघामध्ये प्रभाव शून्य जाणवत होता. त्यामुळे 9500 ते दहा हजार मते घेणारा उमेदवारच निवडणुकीत बाजी मारेल ,असा अंदाज राजकीय विश्‍लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa: 35 अनधिकृत बांधकामांवर पुन्हा चालला बुलडोझर; करासवाडा जंक्शन येथे पालिकेची कारवाई

Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गावर कुटुंबियांसह रात्रीचा प्रवास सुरक्षित आहे का? काय सांगतात प्रवासी

Goa Today's News Live: जीप संघटना दूधसागर पर्यटन हंगामाच्या विरोधात ठाम!

Ranji Cricket Tournament: अर्जुन तेंडुलकरसह हेरंब, शुभमचा भेदक मारा, सुयश आणि रोहणचं 'तूफान'; सिक्कीमचा संघ पत्त्यासारखा कोसळला !

गोव्याच्या भूमीत विकसित झालेली 'श्वेतकपिला' गाय; सरकारने राजाश्रय देण्याची गरज

SCROLL FOR NEXT