Goa Election 2022: खाणपट्ट्यातील वाढीव टक्का भाजपच्‍या विरोधात?

तर्क-वितर्क सुरू: लोकांचा संताप मतदानातून उतरल्‍याचा दावा
Mining Belt in Goa
Mining Belt in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: दक्षिण गोव्‍यातील सांगे, सावर्डे, कुडचडे व केपे या चारही खाणपट्ट्यांतील मतदारसंघांत यावेळी 80 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. दुसरीकडे उत्तर गोव्‍यातील मये, डिचोली, साखळी, थिवी, पर्ये या खाणपट्ट्यातही (Mining Belt) मोठ्या संख्‍येने मतदान झाले. हा वाढीव टक्का सत्ताधारी भाजपच्या विरोधात तर नाही ना, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.

भाजपने केवळ लोकांना आश्वासने देऊन झुलवत ठेवले. बंद पडलेल्या खाणी परत सुरू करण्यास काहीच प्रयत्न केले नाहीत.

Mining Belt in Goa
गोवा निवडणूक आयोगाचा ‘रात्रीस खेळ चाले’

त्यामुळे लोक सरकारविरोधात प्रचंड नाराज होते. तीच नाराजी लोकांनी मतदानातून व्यक्त केलेली आहे, असा दावा खाण अवलंबितांचे आंदोलन चालविणारे गोवा मायनिंग फ्रंटचे निमंत्रक पुती गावकर यांनी केली.

दक्षिण गोव्‍यातील सावर्डे मतदारसंघात 86.43 टक्के, सांगेत 86.19 केपेत 83.45 तर कुडचडेत 80.29 टक्के मतदान झाले आहे. यातील कुडचडे मतदारसंघ सोडल्यास अन्य तिन्ही मतदारसंघांत भाजप अडचणीत आल्याचे चित्र दिसून येत आहे. कुडचडेतही ‘सायलंट’ मतदान महत्त्‍वपूर्ण ठरणार आहे.

Mining Belt in Goa
बाबू आजगावकर: दिगंबर कामत मडगावकरांना मूर्ख बनवत आहेत

सावर्डे मतदारसंघात सर्वांत जास्त मतदान झाले आहे. या पार्श्वभूमीवर तेथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्रिबोलो सोझा यांना विचारले असता, हा प्रस्थापितांच्या विरोधात कौल असल्‍याची प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, खाणी भाजपने बंद केल्या आणि पूर्ण दोन टर्म सरकार असतानाही त्या पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे लोक आर्थिक अडचणीत आले. अशा परिस्थितीत लोक सरकारवर नाराज होणे साहजिकच होते.

खाणपट्ट्यातही भाजप कार्यकर्त्यांची फळी मजबूत आणि शिस्तबद्ध आहे. त्‍यांनीच मोठ्या संख्‍येने मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढले. सावर्डेत तर गणेश गावकर एकतर्फीच निवडून येणार आहेत.

संजय नाईक, सावर्डेचे पंच

Mining Belt in Goa
काणकोणमध्ये पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव

सत्ताधारी भाजप सरकारला धडा शिकविण्यासाठीच लोक मोठ्या संख्‍येने मतदानासाठी घराबाहेर पडले. खाणबाधितांच्या या विरोधाच्या वणव्यात खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेही होरपळून निघणार आहेत.

पुती गावकर, गोवा मायनिंग फ्रंटचे निमंत्रक

यावेळी मोठ्या प्रमाणात झालेले मतदान हे सरकारविरोधात आहे. कुडचडे येथे झालेले मतदानही भाजपविरोधात असून लोक केवळ ते बोलून दाखवत नाहीत एवढेच. १० मार्चला ते स्‍पष्‍ट होणारच आहे.

पिंटी होडारकर, कुडचडेचे माजी नगराध्यक्ष

मुख्‍यमंत्र्यांनाही बसणार फटका?

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना खाणबंदीचा फटका बसेल असे चित्र मतदानास चार-पाच दिवस असताना दिसत होते. पण सावंत यांनी नंतर वैयक्तिक गाठीभेटींद्वारे लोकांची समजूत काढण्‍याचा प्रयत्‍न केला. पण सर्वच खाण अवलंबितांचे समाधान झाले असे नाही. त्‍यामुळे हे लोक मुख्‍यमंत्र्यांविरोधात मतदान करण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. विरोधकांनी आगीत तेल ओतण्‍याचे काम केलेच आहे. आता या वणव्‍यातून मुख्‍यमंत्री सहीसलामत बाहेर पडणार का, हे पाहणे औत्‍सुक्‍याचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com